Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • वलसाड - गुजरातच्या वलसाडमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच नवऱ्याची हत्या केली. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. तर तिच्या प्रियकराला अजून अटक व्हायची आहे. सूत्रांनुसार, महिलेच्या पतीला तिच्या अवैध संबंधांची माहिती मिळाली होती. यामुळे झालेल्या वादानंतर महिला आणि तिच्या प्रियकराने ही हत्या केली. रिक्षातून येता-जाता जुळले रिक्षावाल्याशी सूत... - पोलिसांनी सांगितले की, फलधरा गावातील जयसुख रामा घोडिया पटेल आपली पत्नी शोभना व दोन मुले वत्सल आणि वंशी...
  January 23, 12:21 PM
 • अहमदाबाद -  माझी हाइट कमी आहे, म्हणून काय झाले? माझ्यासाठी ही काही समस्या नाही. मी माझ्या मेहनतीनेच उंची वाढवली आहे. मला अडचणीच नाहीत मुळी. अपवाद फक्त एवढाच की, समाजातील लोक नेहमी माझ्या उंचीवरून नकारात्मकता ठेवतात. मला अजूनही लहान बाळच समजतात.    वजन फक्त 10 किलो...पण कुशाग्र बुद्धी   20 वर्षीय राजदीप पिपरोतर ड्वार्फिझम या आजाराने ग्रस्त आहे. यामुळे त्याचा शारीरिक विकास होऊ शकला नाही. त्याची उंची 2 फूट 10 इंच असून वजन केवळ 10 किलो आहे. पण तो कुशाग्र बुद्धीचा आहे. डॉक्टर म्हणतात की, लाखातून 10 ते 15...
  January 23, 11:11 AM
 • बडोदा - येथे बडोदा आणि आणंददरम्यान भीमपुरा चौकाजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात एक कार आणि ट्रकमध्ये झाला. यात कारचा ड्राइव्हर आणि दोन मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शिवाय 6 विद्यार्थी जखमी झाले. यात लाजिरवाणी बाब अशी की, डोक्याला गंभीर दुखापत होऊनही एक जखमी विद्यार्थिनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तेथून येणाऱ्या-जाणाऱ्यांना मदत मागत राहिली, पण काही लोकांनी मदतीऐवजी तिला मोबाइलच्या कॅमेऱ्यातच टिपण्यात धन्यता मानली. कारमध्ये अडकलेल्या...
  January 22, 01:14 PM
 • अहमदाबाद -इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी अहमदाबादला आले. पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. दोघांनी रोड शो केला. दोन्ही नेते एकाच कारने साबरमती आश्रमात गेले. तेथे नेतन्याहूंनी पत्नी सारा यांच्यासोबत राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. नेतन्याहूंनी चरखा चालवला आणि पतंगही उडवला. मोदींनी ४ वर्षांत तिसऱ्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला अहमदाबादमध्ये आणले आहे. याआधी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग...
  January 18, 06:08 AM
 • अहमदाबाद- विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांनी आपल्याविरुद्धची पोलिस कारवाई दिल्लीच्या इशाऱ्यावरूनच सुरू असल्याचा गंभीर आरोप बुधवारी केला. मंगळवारी बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्यांनी थेट मोदी सरकारवर आरोप केला. तोगडिया म्हणाले, गुन्हे शाखा बनावट व्हिडिओ करून मला बदनाम करण्याचा कट करत आहेत. या पोलिसांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.पोलिसांनी शोध सुरू केला, तेव्हा तोगडिया बेपत्ता झाले होते. नंतर मंगळवारी ते...
  January 18, 01:07 AM
 • अहमदाबाद - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा आज (बुधवार) गुजरातमध्ये आहेत. त्यांना रिसिव्ह करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर गेले होते. त्यानंतर दोन्ही नेते एकाच कारमधून निघाले. सुरक्षेच्या कारणांमुळे बंद कारमधून त्यांनी 8 किलोमीटर रोड शो केला आणि साबरमती आश्रमात पोहोचले. येथे गांधींजींना श्रद्धांजली वाहिण्यात आली. नेतन्याहूंनी व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी केली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत....
  January 17, 02:44 PM
 • अहमदाबाद - कुबेरनगरात एका तरुणाने आपली पत्नी तसेच आपल्या सख्ख्या बहिणीत लेस्बियन संबंधांमुळे त्रस्त होऊन महिला हेल्पलाइनला फोन करून मदत मागितली आहे. तरुणाने काउन्सेलरला म्हटले की, मी आणि माझे कुटुंब या दोघींच्या संबंधांमुळे त्रस्त झालो आहोत. मी माझ्या सख्ख्या बहिणीला आई-वडिलांकडे जाऊन राहण्यास सांगतो, तेव्हा ती आत्महत्येची धमकी देते. 6 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न... कुबेरनगरातील राकेशचे (बदललेले नाव) लग्न 23 वर्षीय श्वेता (बदललेले नाव) सोबत 6 महिन्यांपूर्वी झाले होते. लग्नानंतर ती...
  January 17, 01:26 PM
 • अहमदाबाद- विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया (६२) मंगळवारी पत्रकार परिषदेत भावुक झाले. अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हणाले, जुने खटले उकरून मला अडकवले जात आहे. सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक आले होते. माझ्या एन्काउंटरची शक्यता होती. मी घाबरत नाहीये, मात्र मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताेगडिया सोमवारी सकाळी अचानक बेपत्ता झाले होते. तब्बल १२ तासांनी ते बेशुद्धावस्थेत सापडले होते. पत्रकार परिषदेत म्हणाले, काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी देशभरात...
  January 17, 03:57 AM
 • अहमदाबाद - सोमवारी गायब झालेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया मंगळवारी सकाळी मीडियासमोर आले. 11 गायब झालेले तोगडिया सोमवारी सायंकाळी बेशुद्धावस्थेत एका पार्कमध्ये सापडले होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मंगळावारी पत्रकार परिषदेत त्यांनी माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गौप्यस्फोट केला. तोगडिया म्हणाले मी घाबरलेलो नाही, मात्र मला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्या घराचे सर्चवॉरंट काढण्यात आले आहे. तोगडियांच्या भेटीसाठी गेला...
  January 16, 03:34 PM
 • राजकोट- गुजरातमधील राजकोट येथे देशभक्तीचा संदेश देण्यासाठी आयोजित राष्ट्रकथा शिबिरात शुक्रवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीत तीन विद्यार्थिनींचा जळून मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाल्या आहेत. एक आठवड्यापूर्वी सुरू झालेल्या स्वामी धर्मबंधू महाराजांच्या या शिबिराचा शनिवारी समारोप होता. यात सुमारे १२ हजार लोकांनी सहभाग घेतला होता. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे विद्यार्थिनींच्या तंबूमध्ये आग लागली. या आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, इतर तंबूंमध्येही...
  January 14, 12:58 AM
 • राजकोट - पद्मावती चित्रपटाच्या मुद्द्यावरून राजकोटमध्ये करणी सेनेने गॅलेक्सी सिनेमासमोर विरोध व्यक्त केला. त्यात करणी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी चित्रपट आणि संजय लीला भंसाळींच्या विरोधात घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे तर 12 जानेवारीलाकरणी सेनेचे कार्यकर्ते भंसाळींच्या घरात घुसून त्यांना मारतील अशी धमकीही देण्यात आली आहे. काय म्हटले करणी सेनेने गुजरात करणी सेनेचे उपाध्यक्ष जोगेंद्र सिंह चंपावते यांनी सांगितले की, 12 जानेवारीला आम्ही मुंबईला जात आहोत. 12...
  January 10, 05:36 PM
 • नर्मदा/सूरत -समलैंगिकतेला गुन्हा मानावे की नाही? सुप्रीम कोर्ट यावर पुनर्विचारासाठी तयार आहे. दोन प्रौढांमध्ये सहमतीने बनलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा न मानण्याविषयी दाखल याचिकेला कोर्टाने घटनापीठाकडे पाठवले आहे. केंद्रालाही याबाबत त्यांची भूमिका विचारण्यात आली आहे. DivyaMarathi.Com यानिमित्ताने अशा भारतीय राजकुमाराची स्टोरी सांगत आहे ज्यांनी स्वत:हून जाहीर स्वीकारले की ते गे (समलैंगिक) आहेत. - वास्तविक, आपण गे असल्याची बाब स्वत:हून स्वीकारल्यानंतर राजपीपला (गुजरातच्या नर्मदा...
  January 9, 10:16 AM
 • सुरत - कापोद्रामध्ये ठाकोरद्वार सोसायटीतील श्री नचिकेता विद्याभवन शाळेच्या प्रिन्सिपलने एका शिक्षिकेची छेडछाड करण्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या घटनेनंतर पीडित शिक्षिकेचे नातेवाइक शाळेत पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घातला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी शिक्षिकेच्या तक्रारीवरून प्रकरणाची नोंद करून आरोपी ट्रस्टी कम प्रिन्सिपलला अटक केली आहे. लोकांचा राग पाहता पोलिसांनी शाळेच्या बाहेर पोलिसांना तैनात केले आहे. घरच्यांनी जोर देऊन विचारल्यावर सांगितली आपबीती... - सूत्रांनुसार,...
  January 8, 11:17 AM
 • इंदूर- बुऱ्हानपूरमध्ये जेलमधून सुटलेल्या आरोपीने शेतात काम करणारी महिला दरांतीवर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने महिलेला अर्धनग्न करून शेतात पळू-पळू मारहाण केली. महिलेच्या हात, पाय आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाण होत असताना महिलेने 20 मिनिटांपर्यंत संघर्ष केला आणि नंतर अर्धनंग्न अवस्थेत जवळापास अर्धा किलोमीटरपर्यंत जिव वाचवण्यासाठी पळत होती. दरम्यान, शेतात काम करणाऱ्या इतर महिलांनी तिला अशा अवस्थेत पळाताना पाहून तिची मदत केली. तिचे कपडे शेतातच पडून होते....
  January 8, 12:35 AM
 • राजकोट - गुजरातच्या राजकोटमध्ये एका प्रोफेसरने त्याच्या आईची छतावरून पेकून हत्या केली. त्यांची आई तीन महिने ब्रेन हॅमरेजमुळे अंथरुणावर पडून होती. आईच्या उपचार आणि देखभालीमुळे मुलगा त्रस्त झाला होता. ही घटना सप्टेंबर महिन्यातील आहे. पण त्याचा खुलासा गुरुवारी झाला. आदी पोलिसांनी आत्महत्या समजून ही फाईल बंद केली होती. एका निनावी चिठ्ठीनंतर पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मुलगा आईला छतावर घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा...
  January 5, 12:23 PM
 • सुरत- पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे आंबेडकर अनुयायींवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता गुजरातमध्येही उमदटले आहेत. दलित संगटनांच्या कार्यकर्त्यांनी उधना रेल्वे स्टेशन ते रिंगरोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत रॅली काढली. दुसरीकडे, आक्रमक आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत राजकोट-सोमनाथ राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केला. भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी; बाजारपेठ बंद... - उधना स्टेशनवर आंदोलकांनी दोन रेल्वे गाड्या अडवल्या. बाजारपेठ बंद करण्यात आली. तसेच रिंगरोडवर...
  January 4, 11:36 AM
 • कामरेज/सुरत- एका तरुणाने बार डान्सर गर्लफ्रेंडची गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रीतेश याला गर्लफ्रेंडच्या दुसर्या अफेअरची माहिती मिळाली होती. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले होते. - सूत्रांनूसार, पंजाबमधील भटिंडा येथील राहाणारी ज्योति उर्फ निशा भट्टी ही मुंबईतील बारमध्ये डान्सर होती. - दोन वर्षांपूर्वी भीमराड रोड बारमध्ये कामरेजमधील टींबा गावातील रहिवाशी प्रीतेश पटेल याच्यासोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम जुळले. नंतर ती भटिंडा...
  January 4, 10:21 AM
 • सूरत- बुडिया येथील चौकात एका युवतीने नशेत असे काही वर्तन केले की तिला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.याबाबतची सुचना पोलिसांना देण्यात आली. या युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नशेत झाली होती बेशुध्द - बुडिया गावातील चौकात महामार्गावर मंगळवारी दुपारी एका परदेशी युवतीला कारमधुन एका कार चालकाने उतरवले. त्यानंतर हा कारचालक निघुन गेला. ही युवती त्यावेळी नशेत होती. काही जण तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होते. पण ती त्यांना मारहाण करत होती. ती रस्त्याच्या मधोमधच उभी होती. यामुळे...
  January 3, 04:56 PM
 • गांधीनगर- गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाल्यानंतर विजय रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील भावनगरचे राज्यमंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर आता सोळंकी यांनी नाराजी व्यक्त केली. सोळंकी कोळी समाजाचे आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपली व्यथा मांडली. राज्यमंत्री सोळंकी यांनी कोळी समाज नाराज असल्याचे सांगत निशाणा साधला. यानंतर मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा...
  January 3, 01:05 AM
 • अहमदाबाद - शहरात सोशल साइट्सच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या जल्लोषाच्या नावावर तरुणी सप्लाय करण्याचे प्रकरण समोर आले आहे. 31 डिसेंबरच्या जल्लोषाला पाहून पोलिसांनी शहरात क्राइम कंट्रोलची मोठी तयारी केली होती. कंट्रोल करण्याची तयारी केली होती, परंतु सोशल साइटवर दारूसह तरुणी पुरवण्याची नवी पद्धत शोधून काढली आहे. करत आहेत इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफरचा वापर  - यासाठी सोशल साइट्सवर विविध पेजेस बनवण्यात आले आहेत. या पेजेस जोडताच प्रत्येक एजेंट्स आणि एस्कॉर्ट्स कस्टमर्सशी पर्सनल चॅटवर...
  January 2, 12:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED