जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • राजकोट- गुजरातचे नागरी उड्यान मंत्री जयेश रदाड़िया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हयरल होत आहे. व्हिडीओत साफ दिसत आहे की, रदाड़िया आणि त्यांचे काही साथी एका संगीत कार्यक्रमातील गायिकेवर पैसे उडवत आहेत. त्या कार्यक्रमात गायन करणारी गायिका गीता रबारी आहेत, ज्यांच्यावर हा नोटांचा पाऊस पडत आहे. उडवले लाखो रूपये - मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात उडवल्या जाणाऱ्या पैशांचा उपयोग सामाजिक कामासाठी होणार होता. डायरो सांस्कृतिक कार्यक्रमत अनाथ मुले, विधवा महिला यांच्यासाठी हे पैसे...
  January 6, 01:05 AM
 • नवापूर- महाराष्ट्र-गुजरात सीमेवर डांग जिल्ह्यातील आंबापाडा गावात असलेल्या शाळेत सहावी व आठवीतील तीन विद्यार्थी शाळेत आले की विचित्र हालचाली करू लागतात. सरपटत वर्गात प्रवेश करतात. पंधर दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे अन्य विद्यार्थ्यांत भीती पसरली असून पालकांसह शिक्षकही चिंतेत आहेत. महाराष्ट्र सीमेपासून १० किमी अंतरावर गुजरात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील आश्विन, सुमित आणि राहूल असे तीन विद्यार्थी शाळेत आले की दोन तास विचित्र हालचाली करतात. त्यांना शरीरिक...
  January 5, 07:10 AM
 • सूरत : येथील हेल्थ क्लबसमोर सर्व्हिस रोडवर एका कारने झोपलेल्या निष्पाप जीवाला चिरडण्याची घटना घडली. वेसूत व्हीआयपी रोडवर सुशोभिकरणाचे काम सूरू आहे. याठिकाणी 12 लोकांसोबत मुलाचे आई-वडील रस्त्यावर ब्लॉक लावण्याचे काम करत होते. बुधवारी सकाळी 11 वाजेच्यासुमारास सर्व्हिस रोडवरील सीवेज लाइनच्या झाकणावर मुलाच्या आईने त्याला झोपवले होते. दरम्यान अचानक एक कार आली आणि मुलाला चिरडून निघून गेली. यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर...
  January 4, 12:20 PM
 • अहमदाबाद- हे छायाचित्र गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील आहे. येथे सोमवारी नववर्षाच्या निमित्ताने दारू ढोसणाऱ्या ६०० दारूड्यांना पोलिसांनी पकडले. पारडी पोलिस ठाण्यात त्यांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक उरली नाही. त्यांना कसेबसे कोंबण्यात आले होते. मंगळवारी शाळेच्या बसमधून त्यांना पाठवावे लागले. सोमवारी गुजरातमध्ये पोलिसांनी ९०० लोकांना अटक केली होती. गुजरातमध्ये दारूबंदी असूनही लोक नशेत रस्त्यावर फिरत होते.
  January 3, 10:58 AM
 • जामनगर- गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राथमिक तपासात समोर आल्यानुसार, घरातील आर्थिक तंगीमुळे फरसाण व्यापाऱ्याने पत्नीसह कुटुंबातील आणखी तीघांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे समोर आले आहे. पाच मृतांमध्ये दिपकभाई साकरिया (वय35), आरती (वय32), जयाबहन साकरिया (वय70), कुमकुम (वय10) आणि हेमंत (वय5) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सर्व मृत देहांना शवविच्छेदनासाठी पाठवले असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे....
  January 2, 02:51 PM
 • सूरत : एका महिलेने आपल्या पतीविरूद्ध घरगुती हिंसा केल्याची तक्रार दाखल केली आहे. पती हुंदाई शोरूमचा मालक आहे. पत्नीच्या मते, पतीचे शोरूममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारीसोबतच्या अवैध संबंधानंतर पती-पत्नीचे रोज भांडण होत होते, याचदरम्यान पतीने तिच्यासाठी पत्नीला मारहाण देखील केलेली आहे. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील गेहरीलाल जैन यांचा 2000 मध्ये संगीतासोबत विवाह झाला होता. सुरुवातीला मुकेश जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. 2003 मध्ये जैन परिवार व्यापाराच्या दृष्टीने...
  January 1, 01:06 PM
 • अहमदाबाद - गुजरातच्या भचाऊ तालुक्यात भीषण अपघातामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले 10 जण एकाच कुटुंबातील असून इतर 5 जण जखमी आहेत. भचाऊ तालुक्यातील महामार्गावर एका भरधाव ट्रकचे टायर फुटले. यानंतर तो ट्रक दुभाजक तोडून दुसऱ्या दुसऱ्या बाजूला उलटला. याच दरम्यान समोरून येणारी कार त्यामागच्या ट्रकला जाऊन भिडली आणि दोन ट्रकमध्ये अडकून कारचा चेंदामेंदा झाला. लग्जरी कारमध्ये एकूणच 15 जण प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उलटलेल्या ट्रकमध्ये...
  December 31, 11:32 AM
 • सुरत - शाळेची वेळ 7 वाजताची होती. मुले-मुली तयार होऊन शाळेच्या गणवेशात ऑटो ड्रायव्हरची वाट पाहत होते. ठीक 7 वाजता ऑटो ड्रायव्हर आला. त्यांना मुलांना उशीर होतोय, लवकर निघा अशी घाई लावली. सर्वच मुलांना ऑटो रिक्शामध्ये बसवले आणि सुसाट निघून गेला. ऑटोची फायरिंग ऐकूणच पालकांच्या हृदयाचा ठोका वाढला. आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले. अवघ्या काही मिनिटांत संबंधित ऑटोचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. या अपघातात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 5 चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. ज्या मुलाचा...
  December 29, 05:24 PM
 • अहमदाबाद- गुजरातच्या बडोदा पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, नव्या वर्षाच्या स्वागतार्थ तरुणी तोकडे कपडे व स्कीन टच शॉर्ट कपडे वापरून पार्टीत सहभागी झाल्या तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. लोकांना अश्लील नाच करता येणार नाही. रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर व डीजेचा वापर करणाऱ्यांवर बंदी राहील. पोलिस आयुक्त अनुपमसिंह गहलोत यांनी सांगितले, अश्लील नृत्याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम हाेतो. खासगी ठिकाणी डान्सचा कार्यक्रम ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे...
  December 28, 06:34 PM
 • बडाेदा- गुजरातच्या बडाेद्यात डिस्ने लँडच्या संकल्पनेवर अाजवा पार्कमध्ये अातापी वंडरलँड पार्क साकारण्यात अाले अाहे. या पार्कवर सुमारे १२५ काेटी रुपये खर्च झालेत. हे पार्क ८० एकर क्षेत्रात बनले असून, त्यातील ७५ एकरमध्ये ४० प्रकारचे अॅडव्हेंचर्स झोन अाहेत. त्यात विविध खेळांची सुविधा अाहे. हा मनपा व पर्यटन विभागाचा संयुक्त प्रकल्प अाहे. हे पार्क आतापी नावानेही अाेळखले जाते. आतापी हा पाली भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ संतुलित राहणे असा अाहे, तर अधिकृत नाव आजवा अॅम्युझमेंट थीम अॅंड...
  December 28, 09:50 AM
 • अहमदाबाद- गुजरात राज्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वर्गात शिकविता आपल्याला टार्गेट करते म्हणून एका विद्यार्थ्याने प्राध्यापिकेचा मोबाईक क्रमांक पॉर्नसाइडवर टाकला. त्यानंतर संबंधित प्राध्यापिकेला अश्लील फोन येऊ लागल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. काय आहे प्रकरण? अहमदाबाद शहरातील एका कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. वर्गात शिकविताना प्राध्यापिका एका 24 वर्षीय विद्यार्थ्यावर ओरडत होती. सारखी त्यालाच प्रश्न विचारत होती. याचा राग मनात ठेवून त्यान...
  December 27, 12:48 PM
 • अहमदाबाद. शहरातील वासणामध्ये सोमवारी एका बंगल्यावर छापा टाकून तिथे सुरु असलेल्या दारु आणि हुक्का पार्टीमधून 15 लोकांना अटक करण्यात आली. शहरातील नामांकित उद्योगपती, बिल्डरांची मुलं दारु आणि हुक्का पार्टीमध्ये पकडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मिळालेल्या सूचनेनुसार लावण्य सोसायटी येथील एका बंगल्यावर छापा मारण्यात आला. या बंगल्याच्या छतावर बर्थडे पार्टीमध्ये दारु आणि हुक्क्याची मैफील सुरु होती. निलांश शाह त्याचे वडील अंकुरभाई शाह आणि कॉलेजचे मित्र आणि हुक्का देण्यासाठी आलेले 3...
  December 27, 12:13 PM
 • अहमदाबाद- गुगलकडून आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कोडिंग स्पर्धेत उद््गम स्कूलच्या दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या फ्रेया शहा या विद्यार्थिनीस विजेता घोषित करण्यात आले आहे. गुजरातमधील फ्रेया शहा विद्यार्थ्यांच्या वाढत्या ताणावावर अॅप्लिकेशन तयार करणारी एकमेव विद्यार्थिनी आहे. या अॅप्लिकेशनची सर्व कोडिंग फ्रेयाच करते. गेल्या वर्षी फ्रेया या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. विद्यार्थ्यांत तणाव : प्रश्नांतून उपाय फ्रेयाकडून तयार केलेल्या अॅप्लिकेशनमध्ये तणाव अनुभवणाऱ्या...
  December 27, 09:22 AM
 • सूरत- तुम्ही स्पेशल 26 सिनेमा पाहिला असेल, त्यात खोटे आधिकारी बनून यायचे आणि लोकांना लुटायचे. तशाच प्रकारची घटना गुजरातच्या सूरतमध्ये घडली आहे.पोलिसांनी 7 महिन्यांपासून फरारा असलेल्या महिला चोराला पकडले आहे. ही महिला स्वत:ला डिप्टी कलेक्टर सांगायची आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरायची. तिने खोट्या सरकारी कार्डावर एक घर किरायावर घेतले होते. त्यानंतर घर मालकाना झींगा मत्स्य पालनाचा व्ययसाय करण्यात भागीदारी देते असे सांगून त्याच्याकडून 32.20 लाख रूपये लुटले. घराचा 4.32 लाखांचा किरायपण दिला नाही...
  December 26, 12:05 AM
 • पालनपूर - गुजरातमध्ये पालनपूर जिल्ह्यातील जेतवास गावात एका कुटुंबाने ८ वर्षे काळू या कुत्र्याच्या नावे रेशन उचलले. पण कुत्र्याचा मृत्यू झाला अन्् नव्या सुनेचे नाव नोंदवण्यासाठी तहसील कार्यालयात महिला पोहोचली तेव्हा कुत्र्याच्या नावाचा उलगडा झाला. याबाबत माहिती अधिक अशी की, या कुटुंबाची अार्थिक परिस्थिती चांगली नाही. काही दिवसांपूर्वी घरात आलेल्या मुगली या नव्या सुनेचे नाव नोंदवण्यासाठी कार्यालयात खेटे मारत होते. परंतु कोणी ऐकून घेण्यास तयार नव्हते. तेव्हा स्वत: मोगलीबाई स्वत:...
  December 25, 11:51 AM
 • सूरत : सूरतमध्ये पिकनिकला गेलेल्या मुलांच्या बसला अपघात झाला. या अपघातात 7 मुले, दोन मुली आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमरोली येथील सोसायटीमधून तीन अंतयात्रा निघाल्या. 18 वर्षीय तृषासोबत 4 वर्षीय ध्रुवा आणि तिची आई होती. हेमाक्षीच्या लग्नानंतर अनेक नवस केल्यावर ध्रुवाचा जन्म झाला होता. रविवारी तिला अखेरचे कुशीत घेतले होते.....पण शाळेत जाण्यासाठी नव्हे तर...जीवनाच्या अखेरच्या प्रवासावर नेण्यासाठी कुशीत घेतले होते. तिच्यासोबतच तिची आई पण होती. अमरोली येथील एका सोसायटीमधून दोन...
  December 24, 02:41 PM
 • सूरत - पांडेसरा येथे महेश भूरा प्रसाद शर्मी यांना मृ्त्यूनंतर शनिवारी न्याय 11 वाजता न्याय मिळाला. येथील भाजपा नगरसेवक डॉ. डीएम वानखेडे यांच्या साई क्लिनीकमध्ये इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी महेशची पत्नीने उपोषण करत कँडल मार्ज काढला होता. त्यानंतर डॉक्टर वानखेडे यांनी याप्रकरणामध्ये तडजोड करण्याची सहमती दर्शविली होती. मृतकाच्या पत्नीला 3 लाख आणि त्यासोबतच पेंशनसाठी 8 लाख रूपये एसआयमध्ये जमा करण्यासाठी तयार झाले. नर्सने इंजेक्शन...
  December 24, 02:41 PM
 • नवापूर- गुजरातमधील एका खासगी काेचिंग क्लासेसची सहलीसाठी गेलेली बस दाेनशे फूट दरीत काेसळली. शनिवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात ७ विद्यार्थ्यांसह १० जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले. मृतात पाच मुलींचा समावेश आहे.महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील बर्डीपाडा (जि. डांग) परिसरात हा भीषण अपघात झाला. आसनक्षमता ३६ असताना या बसमध्ये ८७ जण बसवले हाेते. बसचालक नशेत गाडी चालवत असल्याचा जखमींचा आरोप आहे. अंकल, बस सावकाश चालवा असे आम्ही सांगत होतो. परंतु त्यांनी ऐकले नाही, असे जखमी विद्यार्थी सांगत...
  December 24, 07:14 AM
 • बडोदा- गुजरातच्या बडोद्यात एका पित्याने अडीच वर्षांच्या मुलीचा जन्म दाखला मागितला. त्याने अर्ज दिला तेव्हा त्यांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. मुलीचे वडील मिथिलभाई पटेल यांनी सांगितले, मुलीला शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्म दाखला इंग्रजीत हवा होता. त्यासाठी एक आठवडा आधी अर्जही दिला. २० डिसेंबरला प्रमाणपत्र घरी आले. प्रमाणपत्र पाहिले तेव्हा धक्काच बसला. प्रशासनाने त्यांच्या घरी मृत्यू प्रमाणपत्र पाठवून दिले होते. या बेजबाबदारपणाचा जाब विचारण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार केली....
  December 23, 11:30 AM
 • अहमदाबाद- अहमदाबादेत एका वाहतूक पोलिस चौकीवर रेमंड कंपनीने केलेली ब्रँडिंग पोलिसांसाठी डोकेदुुखी ठरली आहे. या चौकीत तक्रार देण्यासाठी जसे लोक येतात तसेच आता रेमंड शाॅप समजून कपडे घेण्यासाठी लोक पोलिस ठाण्यात येत आहेत. कारण या पोलिस चौकीला रेमंडने शोरूमप्रमाणे सजवले आहे. पोलिस चौकीवर रेमंड शॉप असा नामफलकही लावला आहे. सीजी रोडवरील ही चौकी कंपनीने शिटीच्या आकारात बांधली आहे. भिंतीवर काचेचे आवरण असून ती शोरूमसारखीच दिसते आहे. एक दांपत्य बुधवारी वाहतूक पोलिस चौकीस रेमंड शॉप समजून कपडे...
  December 22, 09:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात