Home >> National >> Gujarat

Gujarat News

 • इशरत जहॉं चकमकप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष चौकशी पथकाचे (एसआयटी) अध्यक्षपद महाराष्ट्राचे आयपीएस अधिकारी सत्यपालसिंह यांनी अखेर स्वीकारले आहे. सुरवातीला हे पद स्वीकारण्यास सिंह यांनी नकार दिला होता. परंतु, त्यांनी अहमदाबादमध्ये या पदाची सूत्रे स्वीकारून "एसआयटी'चे सदस्य मोहन झा आणि सतीश वर्मा यांच्यासोबत चर्चा केली.
  June 19, 10:51 AM
 • सायन (गुजरात): येथून २० कि. मी. अंतरावरील ओलपाड तालुक्यात गेल्या १२ दिवसांपासून जमिनीतून आपोआप पाणी येत आहे. येथील कोरड्या पडलेल्या विहिरी १० जूनच्या रात्री अचानक पाण्याने भरल्या. कूपनलिकांतूनही काहीही प्रयत्न न करता पाण्याचे फवारे निघायला लागले. दिव्य भास्करमध्ये ११ जूनला बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन कामाला लागले. या पाण्याचा वापर करण्याला मनाई करण्यात आली आहे. १४ जूनपासून लोकांच्या घरांमध्ये फरशीतून पाणी यायला सुरुवात झाली. या प्रदेशात ओएनजीसीच्या पाच तर नाइको कंपनीच्या ११ साईट्स...
  June 19, 05:25 AM
 • सुरतमध्ये जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर येत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून ओलपाड या गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या गावातील विहीर अचानक भरल्या. बोअरवेलमध्येही पाण्याची पातळी वाढली अनेक ठिकाणाहून पाणी बाहेर पडू लागले. घरांमध्येही पाणी साचले आहे. भुजल पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे हा प्रकार झाला आहे. परंतु, जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके काही कळत नसल्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला. या भागात...
  June 18, 05:41 PM
 • चीनी बनावटीचा मोबाईल फोन वापरत असाल तर जरा सावध्च रहा. चीनी बनावटचा मोबाईल वापरतांना गुजरातमध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंचमहल जिल्ह्यातील धानजी दामोर या युवताचा मोबाईलच्या शॉकमुळे मृत्यू झाला आहे. धानजी दामोर हा मोबाईल चार्जिंगला लावलेला असतांना फोनवरून कॉल करत होता, तेव्हा त्याला शॉक लागला. युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. चीन निर्मित कमी किमतीच्या चायनीज फोन भारत सरकारनं सुरक्षा कारणास्तव बंद केले आहेत. तरीही काळ्या बाजारात चीन...
  June 18, 09:23 AM
 • अहमदाबाद : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने सरदार सरोवराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. या सरोवराच्या सुरक्षेसाठी गुजरात सरकारने सरोवराच्या डॅम साईट जलमार्ग सुरक्षेसाठी १.३५ कोटी रुपये खर्चून नम्रता ही पाच टन वजनी बोट दिली आहे. चार बंदूकधारी, दहा गार्ड, असलेल्या या बोटीची क्षमता साडेपाचशे हॉर्सपॉवर इतकी आहे. नम्रता ही बोट सरोवराच्या मागच्या भागात सतत गस्त घालणार आहे. बुलेटप्रूफ आणि आॅटोमॅटिकच्या सुविधेबरोबरच या बोटीमध्ये नाईट व्हिजन कॅमेरा, वॉकी-टॉकी, सायरन,...
  June 17, 02:15 AM
 • अहमदाबाद: भारतीय रेल्वे अतिशय अस्वच्छ आणि घाण अशा स्वच्छतागृहांमुळे नेहमीच ओळखली जाते. हा विषय नेहमीच चर्चेत असतो. मात्र, याच अस्वच्छतेमुळे काही चांगली गोष्ट होऊ शकते यावर विश्वास बसणार नाही. आधुनिक तांत्रिकी उपकरणाच्या साहाय्याने रेल्वेच्या स्वच्छतागृहांना हायटेक बनवण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे प्रोफेसर रघुरमन यांनी आपल्या संशोधन पत्रिकेत म्हटले आहे. रेल्वेच्या स्वच्छतागृहांचा उपयोग करून विजेचे उत्पादन करता येऊ शकते. रेल्वेचे...
  June 17, 01:45 AM
 • नरेंद्र मोदी हे फक्त गुजरात मध्येच लोकप्रिय नसून त्यांची लोकप्रियता आता महाराष्ट्रातील सरकारी बांबूपर्यंत पोहोचली आहे. नुकताच महाराष्ट्र गॅझेटेड ऑफिसर्स फेडरेशनचे शिबिर झाले. त्यात नरेंद्र मोदींची देशातील सर्वात कर्तव्यनिष्ठ नेते म्हणून महाराष्ट्रातील राजपत्रित अधिका-यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड केली. राजपत्रित अधिका-यांच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली.महाराष्ट्र गॅझेटेड ऑफिसर्स फेडरेशनने ४ ते ६ जून या कालावधीत एक शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात...
  June 15, 05:16 PM
 • जावयाने सासूची निघृण हत्या केल्याच्या घटनेने भावनगर हादरले आहे. सासूची हत्या केल्यानंतर जावयाने तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन तीन बॉक्समध्ये भरले आणि फेकून दिले. भावनगरमध्ये गुन्हेगारीचा आलेख घसरता होता. पंरतु, या घटनेने खळबळ उडाली आहे. कथुबेन अशी या महिलेचे नाव आहे. भावनगरच्या चावडीगेट भागात त्या राहत होत्या. दोन महिन्यांपुर्वीच त्यांच्या मुलीचा विवाह मोहित परमार याच्यासोबत झाला होता. मोहित हा मीरानगर मस्तराम बापू भागात राहतो. मोहितने कथुबेनची त्यांच्याच घरी हत्या केली. मृतदेहाचे...
  June 15, 03:02 PM
 • अहमदाबाद- मांगरोण तालुक्यात काल रात्री झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटूंबातील सात जणांचा दुदैवी मृत्यू झाला. सावा पाटिया येथे रविवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मारूती वॅनला ट्रकने मागून जोराची धडक दिली. धडकेनंतर ट्रक चालकाने ट्रक न थांबवता तो तसाच पुढे नेला व समोर थांबलेल्या टँकरला त्याने धडक दिली. टँकर आणि ट्रकच्यामध्ये मारूती वॅन पूर्णपणे दबली गेली. या वॅनमध्ये असलेल्या १२ पैकी ७ सदस्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.सूरत येथील मिनेशभाई भगत...
  June 14, 10:32 PM
 • बडोदा - बडोद्याचे किरीटकुमार अंबालाल देशातल्या सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना दररोज एक रुपया मनिऑर्डर पाठवतात. ५ नोव्हेंबर २००७ पासून त्यांचा हा उद्योग चाललाय! मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत त्यांच्या कुठल्याही मनिऑर्डरला उत्तर दिलेले नाही. पण, लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने मात्र किरीटकुमार यांची दखल घेतली आहे. किरीटकुमार अशाप्रकारची गांधीगिरी करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाकडे मुकेश अंबानींचे लक्ष वेधून घेऊ इच्छितात. तथापि, त्यांचा आवाज अजूनही अंबानींपर्यंत...
  June 11, 04:09 AM
 • अहमदाबाद । ढोल्का-बागोदरा हायवेवर पदपथावर झोपलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले. यात १६ जणांचा जागीच तर चौघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. १० जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिलांचा समावेश आहे. एका गावात असलेल्या उरुसात निघालेले हे भाविक रात्री हाय वेवर फुटपाथवर झोपले होते. मध्य प्रदेशातून राजकोटकडे भरधाव निघालेल्या या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक फुटपाथवर चढला. यात लोक चिरडले गेले. अपघातानंतर ट्रकचालक व क्लिनर फरार झाला आहे.
  June 10, 03:43 AM
 • अनियंत्रित ट्रकने 16 यात्रेकरुंना चिरडल्याची घटना आज पहाटे गुजरातमध्ये घडली. अहमदाबादपासून जवळ डोलका-बगोडरा हायवेवर बेजवा क्रॉसरोड येथे हा दुर्दैवी अपघात झाला. हे सर्व यात्रेकरु बगोडरा येथे बाबा पीरच्या दर्ग्यावर वार्षिक उर्ससाठी जात होते. मार्गामध्ये ते एका धाब्याजवळ रस्त्याच्या कडेला झोपले होते. रात्री 2च्या सुमारास एक ट्रक अनियंत्रित झाला आणि कडेला झोपलेल्या यात्रेकरुंच्या अंगावर गेला. घटनेनंतर ट्रकचालक फरार आहे. ट्रकचा क्रमांक एचजी-4606 असा आहे. या ट्रकची नोंदणी मध्यप्रदेशमधील...
  June 9, 08:21 AM
 • अहमदाबाद - आयटीआयमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या प्राचार्याने मृत्यू अनुभवण्यासाठी चक्क नर्मदा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. रमेशभाई देवमणी (४९) असे या प्राचार्याचे नाव असून आपल्या मृत्यूकडे आत्मा, आनंदानुभव म्हणून पाहवे, असे त्यांनी त्यांच्या आत्महत्यापत्रात म्हटले आहे.गांधीनगर येथील प्राचार्य देवमणी हे बडनगर आयटीआयमध्ये कार्यरत होते. काल सकाळी ते महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले. त्याच दिवशी त्यांचा मुलगा डॉ. किरण यांना त्यांच्या कपाटात एक पत्र सापडले. त्यात मृत्यूचा...
  June 9, 04:22 AM
 • गुजरातमध्ये मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेने दिलेल्या धडेत एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. भुज शहराजवळ रेल्डी गावातील रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. गावात राहणारा बाबु नायक नावाचा व्यक्ती त्याचा ट्रॅक्टर हे क्रॉसिंग पार करित होता. त्याची पत्नी साजी, मुली विनिता, जया आणि मुलगा विजय हेदेखील ट्रॅक्टरमध्ये बसले होते. परंतु, त्यांच्या ट्रॅक्टरला भुज-बरेली आलाहजरत एक्स्प्रेसची धडक बसली. या अपघातात नायकची पत्नी आणि मुलांचा जागीच मृत्यू झालॉ नायक यांना भुज शासकीय रुग्णालयात दाखल...
  June 7, 11:21 PM
 • गांधीनगर- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) गुजरातमध्ये हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उभरण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने राज्य सरकारकडे 600 हेक्टर जमिनीची मागणी केली आहे. सरकारने त्याची पूर्तता केल्यास गुजरातमध्ये लवकरच हेलिकॉप्टर प्रकल्प आकार घेईल.हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी राज्यात 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रकल्पातून हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर निर्मितीची शाखा स्थापन केली जाईल, असे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. प्रस्तावित प्रकल्पासाठी...
  June 6, 03:07 AM
 • अहमदाबाद - सध्या गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये दाम तिप्पट योजनांच पेव फुटले आहे. अहमदाबादसह प्रमुख शहरांमध्ये चालू असलेल्या खुलेआम फसवेगिरीची ओरड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी इम्तियाज सय्यद याला अटक केली आहे; परंतु अभय गांधी आणि हरेश पांचाळ यांच्यासरखे ठग अजूनही पोलिसांना सापडू शकलेले नाहीत.एका अंदाजानुसार अहमदाबादेत सध्या दाम तिप्पट देण्याचे आमिष दाखवून व्यवहार करीत असलेल्या जवळपास पंधरा कंपन्या असून यातील एक कंपनी एका कॉन्टेबलचा जवळचा नातेवाईकच चालवत आहे. थेट पोलिसाचेच संबंध...
  June 6, 03:05 AM
 • अहमदाबाद- भारतातील प्रमुख उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे काम चालू आहे. पण त्याआधीच या कार्यालयाच्या बांधकामाबद्दल जोरात चर्चा चालू आहे. कारण हे जे कार्यालय बांधले जाणार आहे ते व्हाईट हाऊस सारखेच आहे. एकूण पाच लाख चौरस फूट जागेत हे कार्यालय उभारले जाणार आहे. हे कार्यालय गांधीनगर महामार्गावर होणार आहे.या इमारतीची वास्तूरचना मुंबई येथील प्रसिध्द वास्तूतज्ञ हाफिज कॉन्ट्रक्टर यांनी केली आहे असे समजते.
  June 4, 11:38 PM
 • अहमदाबाद- लोकांच्या पैशावर र्शीमंतीचे इमले बांधण्याचे स्वप्न पाहणार्या महाठक अभय गांधीविरुद्धच्या कारवाईला पोलिसांनी वेग घेतला आहे. गांधीची विदेशात बँक खाती असण्याच्या शक्यतेमुळे तपास यंत्रणेने केंद्र सरकारच्या आर्थिक गुप्तचर संस्थेकडे (एफआययू) मदत मागितली आहे. मात्र, अभय गांधी प्लास्टिक सर्जरी करून गुंगारा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विदेशाशी संबंधित आर्थिक घोटाळ्याच्या तपासकामात एफआयए मदत करते. आरोपीच्या बँक खात्यांच्या चौकशीसाठी एएफआयची मदत घेतली जात आहे. दुसरीकडे अभय...
  June 4, 04:10 AM
 • वन्य प्रेमींसाठी ही खूशखबर आहे. नुकत्याच झालेल्या पशुगणनेत राज्यातील बिबट्यांची संख्या 8.41 टक्क्यांनी वाढली आहे. हा आकडा 1150 वर पोहचला आहे. जुनागड जिल्ह्यात ही संख्या 365 एवढी आढळून आली आहे. देशात मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड ही राज्ये बिबट्यासाठी ओळखली जातात. दरम्यान, गुजरातमध्ये 1984 साली केवळ 498 इतके बिबटे होते. ते आता 1150 वर पोहचले आहेत. आशिया खंडामध्ये सर्वात जास्त बिबटे भारतातच आढळतात. त्यात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि उत्तराखंड या राज्यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. या...
  June 2, 12:31 PM
 • हवा होता बिग बी अमिताभ बच्चनचा बंगला जलसा बंगला आणि अभिनेत्री दिपिका पादुकोणसोबत लग्र करायचे होते त्याला... जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत टॉप टेनमध्ये आपले नाव त्याला आणायचे होते. पण, हे स्वप्र पुर्ण करण्यासाठी त्याने अनेकांच्या स्वप्रांचा चुराडा केला. कोट्यवधी रुपयांनी त्याने अनेकांना फसविले. अभय गांधी हे त्या महाठकाचे नाव. गुजरातमध्ये गांधीच्या नेटवर्कचा नुकताच भांडाफोड झाला आहे. अभय गांधी याने गुजरातमध्ये हजारो गुंतवणुकदारांना मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून सुमारे 5000 कोटी...
  June 2, 08:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED