Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • औरंगाबाद/इंदूर- भय्यू महाराजांच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. भय्यू महाराजांनी ज्या रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडली, त्याचे लायसन्स महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील आहे. महाराजांनी नंतर ते लायसन्स स्वत:च्या नावाने बुलढाणा जिल्ह्यात2012 मध्ये ट्रान्सफर केले होते, ही माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. भय्यू महाराज यांचे वाशिमशी जवळचे नाते होते. बारसी चाखली हे त्यांचे मूळ गाव. अकोला आणि वाशिम दरम्यान हे गाव आहे. पोलिस रिव्हॉल्वरसह त्यांच्या विसेराची चौकशी करत आहे. विसेरा...
  03:42 PM
 • महेश्वर (खरगोन) - भय्यू महाराजांचे दशक्रिया विधी गुरुवारी नर्मदेच्या बड़घाटावर पार पडले. कन्या कुहूने पूजन केले. पं. राजेंद्र जोशी यांनी महाराष्ट्रीय पद्धतीने दशक्रिया विधी पार पाडले. यादरम्यान डॉ. आयुषीही उपस्थित होत्या, परंतु दोघींनी एकमेकींशी बोलणे टाळलेच. परंपरेनुसार एकादश आणि द्वादशचा कार्यक्रमही नर्मदा तटावरच होईल. विदर्भात काढण्यात येणार अस्थि कलश यात्रा ऋषीसंकुल आश्रम, खामगाव (महाराष्ट्र) मधून आलेले प्रमुख एन. टी. देशमुख यांनी इंदुरात भय्यू महाराजांची समाधी स्थापण्याबद्दल...
  02:37 PM
 • मुरैना- मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील गंजरामपूर गावात गुरुवारी ट्रॅक्टर ट्राॅली व जीपच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात महिलांसह १५ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. ट्रॅक्टर ट्राॅली वाळूने भरलेली हाेती. गंजरामपूर गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट जीपवर जाऊन धडकले. मृत्युमुखी पडणाऱ्यांत सात महिला व अाठ पुरुषांचा समावेश अाहे. जीपमध्ये एकाच कुटुंबातील २० जण हाेते व ते त्यांच्या एका नातेवाइकाच्या निधनानंतर शाेक कार्यक्रमात सहभागी...
  08:37 AM
 • इंदूर - संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा तपास आता त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर केंद्रित झाला आहे. पोलिसांना माहिती मिळाली आहे की, इंदूर व पुण्याच्या आश्रमातील काही असे लोक महाराजांच्या संपर्कात होते, ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते. दुसरीकडे, महाराजांचे विश्वासू बनून ते अनेक प्रकारे फसवणूकही करू लागले होते. ज्यामुळे महाराजांच्या आश्रमात येणारे बडे व्यावसायिक आणि समाजसेवक महाराजांपासून दूर झाले होते. दुसरीकडे, बुधवारी भय्यू महाराजांच्या दोन...
  June 21, 02:10 PM
 • इंदूर - उज्जैनचे एस.पी. सचिन अतुलकर यांना भेटण्याचा हट्ट करणारी चंदिगडची तरुणी 5व्या दिवशी बुधवारी दुपारी परतली. पंजाब पोलिसांत टीआय असलेला तिचा भाऊ सकाळी उज्जैनला पोहोचला आणि समजूत घालून त्याने तिला कारमध्ये बसवून सोबत नेले. एसपीच्या फिटनेसने इम्प्रेस होऊन तरुणी घरातून पळून थेट या आयपीएसच्या उज्जैन येथील घरी पोहोचली. येथे एसपींची भेट घेण्यासाठी तिने मोठा गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना संपर्क करून तिला परत घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. आई आणि इतरांनी 2 दिवस तिला...
  June 21, 12:14 PM
 • इंदूर - भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या आठव्या दिवशी मंगळवारी फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या टीमने पोलिसांना रिपोर्ट सोपवली. यानुसार, भय्यू महाराजांनी क्षणिक आवेशात म्हणजेच एकदम रागात येऊन आत्महत्या केली नाही. त्यांनी 15 ते 20 मिनिटे विचार करून स्वत:वर गोळी झाडली होती. एक्स्पर्टच्या मते, आत्महत्येच्या एक लाख प्रकरणांपैकी एक प्रकरण असे असते. डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्ट सध्या मिळालेली नाही, परंतु तपासात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी जे मुद्दे सांगितले आहेत, त्यावरून...
  June 20, 02:51 PM
 • इंदूर - कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन मध्य प्रदेशचे गृहस्थ संत भय्यू महाराजांनी कथितरीत्या स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांच्या आश्रमातून पिस्तूल आणि एक सुसाइड नोट हस्तगत केली, ज्यात त्यांनी तणावामुळे हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. तथापि, असे म्हटले जात आहे की, ते कन्या कुहू आणि दुसऱ्या पत्नीतील संपत्तीच्या वादामुळे तणावात होते. लग्नाच्या एका महिन्यानंतर दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी लग्न करण्याची पूर्ण कहाणी सांगितली होती. Divyamarathi.Com त्याच मुलाखतीचे अंश...
  June 20, 09:56 AM
 • जबलपूर (मप्र) - शहरात 12 जून रोजी झालेल्या डॉ. शफतुल्ला खान मर्डर प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी पत्नीच निघाली आहे. एसपी शशिकांत शुक्ला म्हणाले, पत्नी आयशानेच 4 जणांसोबत मिळून डॉक्टर पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिने आपला गुन्हाही कबूल केला आहे. मृत राज्य आरोग्य विभागात डेप्युटी डायरेक्टर होते. याप्रकरणी आरोपी पत्नी, पुतणी तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तथापि, पत्नीने स्वत:चा बचाव करताना अनेक दावे केले आहेत. धडा शिकवायचा होता लिंगपिसाट पतीला... - आरोपी आयशा म्हणाली, तिचा पती...
  June 19, 11:59 AM
 • इंदूर - ज्या दिवशी (12 जून) भय्यू महाराजांनी आत्महत्या केली, त्या दिवशी महाराज जेव्हा सकाळी उठले तेव्हा पत्नी आयुषीसोबत ते नॉर्मल वागले होते. कौटुंबिक सूत्रांनुसार, आयुषी यांनी आपली डिग्री आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले होते, डिग्री खूप महत्त्वाची असते. चांगली तयार होऊन जा. त्यांनी आपल्या हातांनी साडी काढून आयुषींना देत म्हटले होते की, ही साडी घालून जा. यानंतर आयुषी तयार होऊन महाराजांचे आवडते जेवण तयार करून घरातून निघाल्या होत्या. 7 दिवसांत 20 हून जास्त...
  June 19, 10:05 AM
 • मुरेना (ग्वाल्हेर) - हुंडाबंदीचे पालन गुर्जर समाजामध्ये सुरू झाले आहे. विनाहुंड्याचे लग्न करायलाही तरुण तयार असल्याचे दिसते. याची सुरुवात एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नापासून केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव इन्द्रसिंह गुर्जर असून ते आपल्या मुलीच्या लग्नात कोणताही हुंडा देणार नाहीत. याचा पुरावा त्यांच्या मुलीची लग्नपत्रिकाच आहे. 20 जूनला आहे लग्न... - पूजाच्या लग्नपत्रिकेत संत हरिगिरी महाराजांनी ठरवलेल्या खर्चाचा पूर्ण उल्लेख आहे. ज्यात लिहिले आहे की, लग्न लावायला...
  June 18, 11:52 AM
 • भोपाळ- मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यात जवळपास 384 वर्षांपूर्वी भारतातील सर्वात सुंदर महिला आणि मुगल बादशाह शाहजहांची पत्नी मुमताजची ममी प्रथमच बनविण्यात आली होती. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील जैनाबादमध्ये मुमताजची खरी कबर आहे. चौदाव्या बाळांतपणात मुमताजचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बऱ्हाणपूरमध्येच तिचा दफनविधी झाला. सहा महिन्यानंतर मुमताजची ममी आगऱ्यात नेण्यात आली आणि जवळपास 22 वर्षांनंतर मुमताजची ममी ताजमहालात ठेवण्यात आली. इतिहासकारांच्या मते 1631 मध्ये मुमताजच्या मृत्यूनंतर तिची...
  June 17, 12:03 AM
 • सागर (मध्यप्रदेश) - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे, की मी कधीही हिंदू दहशतवादाबद्दल बोललो नाही. ते म्हणाले, मी संघी दहशतवादाबद्दल बोलत आलो आहे. दहशतवादाला कोणत्याच धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. कोणत्याही दहशतवादी घटनेला धर्माशी जोडता येणार नाही. कोणताही धर्म हा दहशतवादाचे समर्थन करत नाही, असेही दिग्विजय सिंह म्हणाले. जे लोक मला मुस्लिम समर्थक म्हणतात, अशा लोकांकडून मला हिंदू असण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी हिंदू म्हणून जे काही केले त्याची ते...
  June 16, 05:13 PM
 • पन्ना/अजयगड (म.प्र.) - अजयगडमध्ये पदस्थ एका न्यायाधीशांवर महिला पटवारीने बलात्कार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. अजयगढ़ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर गुरुवारी न्यायाधीशांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. रिवा जिल्ह्यातील महिला पटवारीने जजवर लग्नाचे आमिष दाखवून 2 महिन्यांपर्यंत लैंगिक शोषण केल्याचा आणि लग्नासाठी 50 लाख हुंडा मागितल्याचा आरोप केला असून, त्याची हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने दुसऱ्या तरुणीशी लग्न निश्चित केले असे सांगितले. एफआयआरनंतर अजयगढ़ पोलिसांनी याप्रकरणी...
  June 15, 05:01 PM
 • संत भय्यू महाराजांनी मंगळवारी आत्महत्या केली होती. महाराजांनी सिल्व्हर स्प्रिंग्ज स्थित घरात रिव्हॉल्व्हर कानशिलावर ठेवून गोळी झाडली, जी आरपार झाली. इंदूर - भय्यू महाराज (50) यांच्या आत्महत्येचे कोडे सोडवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या सिल्व्हर स्प्रिंग स्थित घरातून जप्त 10 सीसीटीव्हींचे डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) सिस्टिम गुरुवारी रात्री पाहिले. डीव्हीआरमध्ये एका महिन्याचे फुटेज आढळले आहे. घटनेच्या दिवशी महाराज रूममध्ये जाताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव...
  June 15, 10:52 AM
 • इंदूर - भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी भंवरकुवा परिसरातील एका होस्टेलमध्ये पोहोचून चौकशी केली. भय्यू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. आयुषी लग्नापूर्वी याच होस्टेलमध्ये राहत होत्या. पोलिसांनी भय्यू महाराजांच्या सुसाइड नोटला तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवणार असल्याचे सांगत आहेत. भय्यू महाराजांनी मंगळवारी (12 जून) स्प्रिंग व्हॅली येथइील आपल्या बंगल्यातच गोळी झाडून आत्महत्या केली होती. बुधवारी भय्यू महाराजांच्या पार्थिवावर भमोरी मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. -...
  June 14, 06:40 PM
 • इंदूर (म.प्र.) - आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज सुसाइड केसला खळबळजनक वळण लागले आहे. इंदूर पोलिसांना जी दुसरी सुसाइड नोट आढळली आहे त्यातील हस्ताक्षर आधी सापडलेल्या सुसाइड नोटपेक्षा वेगळे आहे. एवढेच नाही, पोलिसांना संशय आहे की, दोन्ही सुसाइड नोट वेगवेगळ्या पेनने लिहिण्यात आल्या आहेत. तथापि, दुसऱ्या सुसाइड नोटमध्ये भय्यूजी महाराजांनी आपली सर्व संपत्ती आणि बँक खात्यांचा मालकी हक्क आपला 15 वर्षे जुना विश्वासू सेवेकरी विनायकच्या नावे केला आहे. तथापि, या कथित सुसाइड नोटवरही प्रश्न उपस्थित...
  June 14, 11:18 AM
 • इंदूर -स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलेले भय्यू महाराज (उदयसिंह देशमुख) यांच्या पार्थिवावर बुधवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजयनगरस्थित मुक्तिधामात महाराजांची मुलगी कुहू हिने मुखाग्नी दिला. त्यांची पत्नी डॉ. आयुषी आणि आई मात्र आश्रमातच थांबल्या. मध्य प्रदेशातील कोणतेही बडे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रतिनिधी इंदूरला पाठवला. शिवसेनेचे एक खासदार व दोन आमदारही उपस्थित होते. दरम्यान, भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी...
  June 14, 10:43 AM
 • - 50 लाखांच्या प्रॉपर्टीवरूनही विवाद समोर येत आहे, यामुळेही ते तणावात होते. - तणावमुक्तीसाठी वडिलोपार्जित घरी जाणार होते, तेथेच दीर्घ काळा थांबण्याचा त्यांचा विचार होता. इंदूर - भय्यू महाराजांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार पार पडले. दुसरीकडे, आत्महत्येप्रकरणी पोलिस अनेक बाबींवर तपास करत आहेत. भय्यू महाराज अनेक दिवसांपासून कौटुंबिक तणावात होते. पत्नी आयुषीशी त्यांचे वाद होत असल्याच्या मुद्द्यावर पोलिस चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा...
  June 14, 10:14 AM
 • अध्यात्मिक संत आणि सामाजिक कार्यकर्ते भय्यू महाराज अनंतात विलीन झाले आहेत. बुधवारी दुपारी 3.48 वाजता मुलगी कुहूने पित्याला मुखाग्नी दिला. यावेळी वातावरण शोकाकूल झाले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत स्नेहपूर्ण संबंध असलेल्या भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी सकाळपासून रिघ लागली होती. भय्यू महाराज यांनी मंगळवारी दुपारी इंदूर येथील राहात्या घरी मुलगी कुहूच्या रुममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. 13 महिन्यांपूर्वी 30 एप्रिल 2017 रोजी त्यांनी...
  June 13, 04:52 PM
 • इंदूर - भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून भक्तांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. येथे येणारे भक्त म्हणतात की, महाराज असे करू शकत नाहीत. भय्यू महाराजांचा मृतदेह बुधवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी बापट चौकातील त्यांच्या सूर्योदय आश्रमात ठेवण्यात आला. दुपारी 2 वाजता येथून अंत्ययात्रा निघाली. भमोरी येथील स्मशानघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. भय्यू महाराजांनी मंगळवार दुपारी आपल्या स्प्रिंग व्हॅली येथील घरी स्वत:वर गोळी...
  June 13, 02:25 PM
 
जाहिरात

RECOMMENDED