जाहिरात
जाहिरात
Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • भोपाल: देशातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून प्री-मेडिकल टेस्ट (पीएमटी) घेतली जाणार नाही. त्याऐवजी नॅशनल एंट्रन्स अँड एलिजिबिलिटी टेस्ट फॉर यूजी (एनईईटीयूजी) द्वारे विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश देण्यात येईल. याबाबत मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया (एमसीआय)लवकरच अधिसूचना जारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेशासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. एनईईटीयूजी परीक्षा...
  October 22, 07:30 AM
 • भोपाळ: देशभरातील प्राणिसंग्रहालयांमध्ये असलेल्या आशियाई सिंहांचे पुनर्वसन मध्य प्रदेशातील जंगलांमध्ये करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली मोहीम बारगळल्यात जमा आहे. राज्यातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात या सिंहांच्या दुस-या किंवा तिस-या पिढीच्या डरकाळ्या आज घुमल्या असत्या; पण प्राणिसंग्रहालयांना पत्रे पाठवण्याव्यतिरिक्त पुढे काहीच झाले नाही. गुजरात सरकारने गीरच्या अभयारण्यातील आशियाई सिंह मध्य प्रदेशला देण्यास नकार दिल्याने देशभरातील प्राणिसंग्रहालयांमधील...
  October 22, 07:27 AM
 • आलीराजपूर (म.प्र.) - मुलांच्या तुलनेत मुलींचे घटते प्रमाण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विविध सोनोग्राफी सेंटर्सवर धाडी टाकून लिंगपरीक्षण करणाऱयांना शिक्षा केली जात आहे. बेटी बचाओसारख्या अभियानांमार्फत समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र ज्या ठिकाणी प्रचार-प्रसार आणि सरकारी अभियानाचे वारेही पोहोचत नाही अशा भागातील एका आदिवासी दाम्पत्याने नवा आदर्श ठेवला आहे. कपड्यात गुंडाळलेले हे अर्भक एका दाम्पत्याला सापडले. सगळ्या ग्रामस्थांनी तातडीने वैद्याकडे नेऊन...
  October 20, 10:36 AM
 • खंडवा: हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आदींमध्ये भेदभाव न करता मानवतेचा संदेश देणा-या मध्य प्रदेशातील एका ख्रिश्चन दाम्पत्याने नुकतेच एका मुस्लिम मुलीचे लग्न लावून दिले. होशंगाबादमधील सी रॉबर्ट आणि त्यांची पत्नी सिंथिया मीना यांची 11 वर्षांची एकुलती एक मुलगी वारली. त्या वेळी मुलगी गमावल्याचे दु:ख कुरवाळत न बसता त्यांनी शेजारील बाबू शेख यांची तीन वर्षांची मुलगी ताहेरा हिला दत्तक घेतले. आई-वडिलांचे प्रेम देऊन तिला मोठे केले. एम.ए पर्यंत शिकवले. इतकेच नाही तर ताहोला कुराण-ए-पाक शिकवले. रविवारी...
  October 19, 08:42 AM
 • भोपाळ: वैद्यकीय आणि कायदा विद्यापीठांच्या धर्तीवर मध्य प्रदेशात पोलिस विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, मुख्यमंत्री आणि गृह खात्याने या संदर्भातील प्रस्तावास तत्त्वत: संमती दिली आहे. पोलिस खात्यात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.गुन्हेशास्त्राचे जाणकार जी. एस. वाजपेयी यांनी पोलिस विद्यापीठाच्या स्थापनेबाबत एक पत्र शासनाला पाठविले होते. त्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि गृहमंत्र्यांनी पोलिस मुख्यालयातील...
  October 19, 08:29 AM
 • भोपाळ: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेचा पॅटर्न पुढच्या सत्रापासून म्हणजेच 2012 पासून बदलला जाऊ शकतो. आधी हा बदल 2013पर्यंत करण्यात येणार होता. त्यानुसार प्रीलिमनरीप्रमाणेच मुख्य परीक्षेतूनही ऐच्छिक विषयाचे पेपर बंद होतील. दोन्ही ऐच्छिक पेपरऐवजी नव्याने एखादा पेपर ठेवायचा किंवा काय याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.केंद्रीय कार्मिक प्रशासन यासंदर्भात गांभीर्याने विचार करत असल्याचे या खात्याच्या सचिव अलका सिरोही यांनी सांगितले. येणाया सत्रापासूनच हा बदल होणे...
  October 18, 05:41 AM
 • इंदूर: एमबीएची पदवी मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करणा-या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. आशियातील एकही बिझनेस स्कूल जगातील टॉप-30 यादीत स्थान मिळवू शकले नाही. द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाने जगातील सर्वोत्तम एमबीए संस्थांची यादी नुकतीच जाहीर केली असून, अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम-ए) या यादीत 78 व्या स्थानावर आहे. या यादीत समावेश असलेली ही भारतातील एकमेव आणि सर्वात कमी शुल्क आकारणारी संस्था आहे. अमेरिकेतील डार्टमाउथ टक स्कूल आॅफ बिझनेस यात पहिल्या...
  October 18, 04:57 AM
 • भोपाळ: अभ्यासात गती नसलेल्या विदिशा येथील एका तरुणाने इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्ध्यातच सोडून दिले. दरम्यान, एका खेडूताला आपल्या दहा वर्षांच्या मुलाला ओ निगेटिव्ह गटाचे रक्त मिळावे म्हणून फिरताना या तरुणाने पाहिले तेव्हा अशा गंभीर परिस्थितीत रक्त मिळवताना येणा-या अडचणींची जाणीव या तरुणाला झाली. यानंतर त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले आणि त्याने लोकांना मदत करण्याचा मार्ग निवडला. सहा महिने रात्रंदिवस झटून त्याने इंटरनेटवर एक सोशल पोर्टल तयार केले. या पोर्टलच्या माध्यमातून...
  October 18, 04:49 AM
 • रेवा: स्फोटकांचा मोठा साठा असलेल्या एका कारला रविवारी पोलिसांनी जप्त केले. या वाहनात 5 हजार डेटोनेटर्स, 10 पेट्या जिलेटिन इत्यादी साहित्य पोलिसांना आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी हा छापा टाकला. ही कार एका घराजवळ उभी होती. दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत कारचालकाला अटक केली आहे.चालकाकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित घरावरही छापा टाकला.तेथेही स्फोटक साहित्याचा साठा आढळून आला.
  October 17, 02:31 AM
 • होशंगाबाद: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना घशाचा त्रास जाणवत असल्यामुळे आपले भाषण काही मिनिटांतच थांबवावे लागले. ही घटना शनिवारी रात्री येथे घडली.जनचेतना यात्रेत मोर्चाला मार्गदर्शन करताना अडवाणींना अचानक घशाला त्रास होत असल्याचे जाणवले. तरीही त्यांनी काही मिनिटे उपस्थितांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्रास वाढल्याने त्यांना भाषण थांबवावे लागले.तत्पूर्वी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणाले, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलताना...
  October 17, 02:22 AM
 • भोपाळ: भेलच्या अवधीपुरी परिसरात साईधामच्या स्थापनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आर. के. महाजन या साईभक्ताने 8000 किलो खिचडीचा प्रसाद वाटला. जवळपास 15000 लोकांना खिचडी वाटण्यात आली. भल्या मोठ्या आकाराच्या पातेल्यात खिचडी तयार करण्यासाठी आणि परतविण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. महाजन यांनी गेल्या तीन वर्षांत हातावर साईधाम मंदिर परिक्रमा पूर्ण करून 660 किलो मीटर अंतर पूर्ण केले.
  October 17, 01:50 AM
 • रीवा- अंबाला पाठोपाठ मध्य प्रदेश मधील रीवा येथे रविवारी मोठया प्रमाणात स्फोटके मिळाली. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी गंगोत्री कॉलनीतील एका घरावर छापा मारला. छाप्यात त्यांना अमोनिअम नायट्रेट, जिलेटीन, डिटोनेटर आणि तारा आढळून आल्या.याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. तर घरात राहणारा राजेश पटेल अद्याप फरार आहे. राजेश पटेल या घरात भाडयाने राहतो. पोलिस कारवाईवेळेस घर मालक अनुज प्रताप सिह उपस्थित होता. राजेश पटेलने परवान्याशिवाय ही स्फोटके घरात लपवून...
  October 16, 05:43 PM
 • भिवानी- जर तुमच्या अवतीभोवती एखाद्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असेल आणि त्याची तक्रार कुठे, कशी करावी हे तुम्हाला समजत नसेल तर आता अण्णा कॉल सेंटर तुमच्या मदतीला धावून येईल. भ्रष्टाचारविरोधी लढा पुढे नेण्यासाठी राजधानी नवी दिल्लीत कॉल सेंटर सुरू करण्याचा निर्णय टीम अण्णाने घेतला आहे. विशेष म्हणजे या कॉल सेंटरचा क्रमांक टोल फ्री असेल. नवी दिल्लीत झालेल्या टीम अण्णाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या 15 दिवसांत हे कॉल सेंटर सुरू होणार आहे.
  October 16, 03:10 AM
 • ग्वाल्हेर- वाजत-गाजत मिरवणुकीतून घोड्यावर बसून नवरदेव येणार, स्टेजवर जाणार, तिथे ठेवलेले असेल एक पुस्तक, नवरदेव पुस्तकांची पाने उलगडणार, शेवटचे पान उघडल्यावर त्यातून नवरी बाहेर येणार.. हो.. खरोखरची नवरी पुस्तकातून बाहेर येणार अन् नवरदेवाला वरमाला घालणार.. आपल्या लग्नाचा दिवस अविस्मरणीय करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी कित्येक पटींनी पैसा ओतण्याचीही तयारी असते. लोकांच्या अशा प्रकारच्या वाढत्या मागणीला मॅरेज गार्डनही तोडीस तोड उत्तर देत आहेत. नवनवीन कल्पना साकारून लग्नासाठीचे...
  October 16, 12:10 AM
 • भोपाळ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघांने अण्णा हजारे यांच्यावर पलटवार केला आहे. संघाने म्हटले आहे की, अण्णासारख्या व्यक्तिने राजकारणाच्या कुटील डावाचे शिकार व्हावे ही दुःखदायक बाब आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सल्ला देतांना म्हटले आहे की, अण्णांनी खालच्या दर्जाच्या राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. सध्या गोरखपूरमध्ये संघाच्या देशभरातील प्रतिनिधींचे तीन दिवसीय संमेलन सुरु आहे. अण्णांना सल्ला देतांना संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी म्हणाले, आंदोलनाला खालच्या पातळीवर जाऊ देता...
  October 15, 09:14 PM
 • भोपाळ- दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे अपघात पाहता मध्यप्रदेशातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फटाके वाजवताना काय काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फटाक्यांपासून होणारे वायूप्रदूषण आणि इतर दुष्परिणामांचीही माहिती तसेच मुलांच्या पालकांनाही पत्रे पाठवून फटाके वाजवताना काय काळजी घ्यावी याच्या सूचना या प्रशिक्षणादरम्यान देण्यात येणार आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये एक जादा तास घेऊन...
  October 15, 02:51 AM
 • भोपाळ- मागील वर्षी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आंध्र प्रदेशातील 40 हजार शेतकयांनी या वर्षी भाताचे पीकच लावले नाही. त्यांचे अनुकरण करून देशभरातील शेतकयांनीही असा पीक-हरताळ (क्रॉप हॉलिडे) केला तर गंभीर परिस्थिती ओढवेल, असा इशारा अन्न सुरक्षा तज्ज्ञ डॉ. सुमन सहाय यांनी दिला आहे. भोपाळ येथे एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. देशातील 70 टक्के शेतकरी आज संकटात आहेत. शेतकयांसाठी असणाया सबसिडीचा फायदा काही शेतकयांनाच होतो. त्याऐवजी शेतमालाचे भाव वाढवून माल विकत घेणाया ग्राहकाला ती सबसिडी...
  October 15, 02:49 AM
 • सतना- काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला ते पाहता भाजपचे सरकार आल्यास त्याचे संपूर्ण श्रेय काँग्रेसला जाईल, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले आहे. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, या पदाचा निर्णय पक्ष घेईल, असे त्यांनी सांगितले. जनचेतना यात्रा मैहरला रवाना होण्यापूर्वी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.अडवाणी म्हणाले की,भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या दोनच पक्षांमध्ये घराणेशाहीला थारा नाही. पक्षातील सर्व...
  October 15, 12:16 AM
 • भोपाल- लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा वादात सापडली आहे. मध्य प्रदेशच्या स्थानिक नेत्यांवर पत्रकारांना पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.गुरूवारी मध्य प्रदेश येथील रीवा येथे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत अडवाणी यांच्या जनचेतना यात्रेच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. भाजप खासदार गणेश सिंह, सार्वजनिक बांधकाम मंत्री नागे्रंद सिंह यांनी अडवाणी यांच्या यात्रेची माहिती दिल्यानंतर पत्रकारांना पाकिटे...
  October 14, 11:19 AM
 • भोपाळ - डीबी सिटीत चाहत्यांची भेट घेतल्यानंतर शाहरुख दैनिक भास्करच्या कार्यालयात आले. अनेक मुद्दय़ांवर त्यांनी विचार मांडले. ते त्यांच्याच शब्दांत..माहिती देणारी अनेक माध्यमे आहेत, वर्तमानपत्रांतील विश्लेषणांची बरोबरी कोणी करू शकत नाही. वाचकाच्या हिताचे नसेल असे वृत्तपत्रांमध्ये काहीही नसावे. किंबहुना असे काही असावे की, ती त्यांच्या जीवनाचा भाग व्हावीत. वर्तमानपत्रे संभाषणाचे माध्यम ठरावीत, केवळ संवादाची नव्हे. दैनिक भास्कर ही जबाबदारी खुबीने पार पाडत आहे. वर्तमानपत्रे...
  October 14, 04:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात