Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • इंदोर : भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावर कृती करण्यास राजकीय पक्षांना अपयश आल्यामुळेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे व योगगुरू बाबा रामदेव यांना पुढाकार घ्यावा लागला, असे मत भाजपाचे उपाध्यक्ष शांता कुमार यांनी व्यक्त केले आहे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा प्रश्न हाताळण्यास सर्वच राजकीय पक्षांना अपयश आले, हे कबूल करण्यात मला काहीही कमीपणा वाटत नाही, असे शांताकुमार म्हणाले. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून हे प्रश्न प्रभावीपणे लावून धरण्यास भाजपाही अपयशी ठरला काय, असे...
  June 11, 03:52 AM
 • भोपाळ - अयोध्या प्रकरणात निकाल देणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व वकील स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया (सिमी) व इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर होते. या अतिरेक्यांनी लखनौमध्ये राहून न्यायाधीश व वकिलांच्या घराची रेकी केल्याची धक्कादायक कबुली मध्य प्रदेशात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी एटीएसला दिली आहे. या अतिरेक्यांनी महाराष्टातील अकोला, अमरावती, भुसावळलाही भेट दिल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेश एटीएसचे पोलिस महासंचालक विपिन माहेश्वरी यांनी ही...
  June 9, 04:35 AM
 • भोपाळ - मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रविवारी सिमीचे पाच व इंडियन मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांना अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्तुल, 23 काडतुस आणि रोख दोन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात भीषण हल्ल्याचा या अतिरेक्यांचा कट उधळला गेला आहे. जबलपूर आणि भोपाळमध्ये प्रत्येकी चार अतिरेकी पकडण्यात आले. जबलपूरहून जनशताब्दी एक्स्प्रेसने आलेले हे अतिरेकी भोपाळ स्टेशनवर उतरताच एटीएसने त्यांना पकडले. त्यात मुंबई येथील अबू फैजल, खांडवा येथील गुड्ड ऊर्फ महेबूब आणि...
  June 6, 03:37 AM
 • भोपाल- मध्यप्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने आठ अतिरेक्यांना रविवारी अटक केली. यामध्ये बंदी घातलेल्या सिमीचे ५ आणि इंडियन मुजाहिदीनच्या ३ अतिरेक्यांचा समावेश आहे.यातील ४ अतिरेक्यांना जबलपूरमधून आणि ४ अतिरेक्यांना भोपाळ मधील हबीबगंज रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले असे पोलिसांनी सांगितले.यामध्ये अहमदाबाद बॉम्बस्फोटातील तीन फरार आरोपींचा समावेश आहे.
  June 5, 07:03 PM
 • भोपाळ- भ्रष्ट्राचार आणि काळा पैसा भारतात आणण्याच्या मागणीसाठी चार जूनपासून उपोषणाला बसणारे योग गुरु रामदेवबाबा यांच्या विरोधात आता बॉलिवूड स्टार शाहरुख खान आता उतरला आहे.भोपाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना शाहरुख म्हणाला, जे आपण काम करतो त्यातच आपण लक्ष घालावे. रामदेव बाबा योग गुरु आहेत तर त्यांनी योगच शिकवावा. त्यांनी रस्त्यावर उतरणे योग्य नाही. उद्या जर मी कोणत्याही मागणीसाठी रस्त्यावर उतरले तर योग्य असेल का असे सांगत तो म्हणाला, रामदेव बाबांच्या या...
  June 2, 06:07 PM
 • उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि भुस्खलनमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर वाहतुकीचिही कोंडी झाली आहे. त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे अडकले असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, ते केदारनाथला सुरक्षित असल्याचे मध्य प्रदेश राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. चौहान यांना आज सायंकाळपर्यंत दिल्लीत पोहोचायचे आहे. परंतु, ते अद्याप केदारनाथ येथून निघाले नाहीत. ते दिल्लीमार्गे लखनऊला जाणार आहेत. लखनऊला होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
  June 2, 02:01 PM
 • भोपाल- योग गुरू रामदेव बाबांनी त्यांच्या ४ जून पासून नवी दिल्ली येथून सुरू होणार्या भ्रष्टाचार विरोधी उपोषणात लोकांनी सामील व्हावे असे आवाहन केले. सिहोर येथे योग शिबिरास जाताना भोपाल येथे त्यांनी काही वेळ लोकांना मार्गदर्शन केले.
  June 1, 12:00 AM
 • भोपाळ - पॅन नंबरबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) नियमांत काही बदल केले असून आता विमा पॉलिसीसाठी वर्षभरात 50 हजार रुपयांहून अधिक प्रिमियम भरणार्यांना पॅन नंबर द्यावा लागणार आहे. याशिवाय पाच लाख रुपयांच्या दागिने खरेदीवरही पॅन नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.ही खरेदी रोख, उधार किंवा चेकच्या रूपाने असली तरी पॅन नंबर द्यावाच लागणार आहे.1 जुलैपासून हे नवे नियम लागू होत आहेत: नव्या नियमांनुसार 25 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे विदेशी चलन मिळविण्यासाठीही पॅन नंबर...
  May 30, 06:41 AM
 • राजनांदगाव (मप्र) - नक्षलवाद्यांनी आपले सदस्य रोजगाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील कारखान्यात पेरले आहेत. हे सदस्य रोजगाराच्या नावाखाली अशा ठिकाणी राहून जंगलात परतल्यानंतर शहरातील सर्व माहिती पुरवितात, असा गौप्यस्फोट मध्य प्रदेशातील महिला नक्षलीने केला आहे. शिबा साहू असे नाव असलेल्या या महिला सदस्य नक्षलवाद्यांच्या शिक्षिका व डॉक्टर आहेत.छुरिया या भागात राहणार्या शिबा यांनी शनिवारी जिल्हा पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाला ही माहिती दिली. महाराष्ट्र व...
  May 30, 05:32 AM
 • भोपाल- माध्यमिक शिक्षा मंडल (माशिमं) ने शनिवारी संध्याकाळी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.(निकाल पाहण्यासाठी दिलेल्या रिलेटेड आर्टिकल च्या लिंकवर क्लिक करा) या परीक्षेसाठी मध्य प्रदेशमधून ८ लाख ८५ हजार ८८३ विद्यार्थी बसले होते. बालाघाट येथील आरूषि पारधी ही ५७८ गुण घेऊन राज्यात पहिली आली आहे आणि ५७७ गुण घेऊन सागर जिल्हयातील प्रस्तिवा राय हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. जबलपूरचा सिध्दांत गौतम ५७४ गुण मिळवून तिसरा आलेला आहे.यावेळेस भोपाळचा एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकू शकलेला...
  May 28, 07:51 PM
 • उज्जैन- नागदा जिल्हयातील स्थानिक विहिंप नेत्यावर मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला आहे.बेहरूलाल डांक हे येथील विहिंपचे नेते असून ते वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय ही करतात. ते स्वत वृत्तपत्र वितरण करण्यास गेल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले.दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी देशी कट्टयातून त्यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून ते पळून गेले.जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक...
  May 27, 09:22 PM
 • भोपाळ - जमिनीच्या व्यवहारात गैरकारभार करणाऱयांना तातडीने थेट तुरुंगात पाठविण्यासाठी कायदा करण्याची मागणी भोपाळचे पोलिस आयुक्त मनोज श्रीवास्तव यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. आयुष्यभराच्या पुंजीतून एखादे घर किंवा जागा घेणाऱयांची फसवणूक टाळण्यासाठी या कायद्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. सरकारने यावर गांभीर्याने विचार करून कायदा केल्यास गैरकारभार करणाऱयांना सुनावणी सुरू होण्याअगोदरच तुरुंगाची हवा खावी लागेल. त्यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास संबंधितांना एक...
  May 25, 03:58 PM
 • इंदूर - हुंड्यासाठी सासऱयांनी केलेल्या छळामुळे विजयनगरमधील एक महिलेवर आपला आवाज गमाविण्याची वेळ आली. हुंड्याच्या मागणीसाठी सासरकडचे लोक त्या महिलेला उपाशी ठेवत होते. शेजाऱयांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना बोलवून तिची सासरच्या जाचातून मुक्तता केली. चार वर्षांपूर्वी रेणू हिचा मालवीयनगरमधील कैलाश शर्मा यांच्याबरोबर विवाह झाला. त्यानंतर काही दिवसांनीच तिच्या सासुबाई रत्ना आणि नणंद ममता यांनी हुंड्याची मागणी करण्यास सुरवात केली. त्यावरून तिचा छळ...
  May 25, 03:56 PM
 • भोपाळ - पोलिस प्रशिक्षण विभागाचे उपमहानिरीक्षक आर. एल. बोरना यांनी फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेची माहिती कळताच सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी रुग्णालयात पोचले. गेल्या काही दिवसांपासून बोरना मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती पुढे आली आहे. जहांगीराबादमधील पोलिस अधिकाऱयांच्या मेसमध्ये बोरना फाशी घेताना पडल्याची माहिती सकाळी सहा वाजता मिळाली. त्यानंतर त्यांना तातडीने हमीदिया...
  May 25, 03:53 PM
 • इंदूर - अहिल्याबाई होळकरांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. सार्वजनिक देवी श्री अहिल्या जन्मोत्सव समितीने या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी आठ वाजता राजवाड्यातील अहिल्याच्या प्रतिमेवर फुले वाहण्यात आली. यावेळी महापौर कृष्णमुरारी मोघे, सुदर्शन गुप्ता आणि एमआईसी सदस्य उपस्थित होते. अहिल्या नाट्य मंडळाच्या बालकलाकारांनी यावेळी स्फूर्तीगीतांचे गायन केले.
  May 25, 03:51 PM
 • इंदूर - येथील एमवाय रुग्णालयात एका महिलेला मृत मुलगी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी त्या मुलीला जवळील एका बागेत ठेवून तिच्यावर निर्दयीपणाने दगड ठेवून दिले. बागेत आलेल्या एका व्यक्तीने ही गोष्ट बघितल्यावर ती सुरक्षारक्षकांना सांगितली. संबंधित मुलीच्या हातावर लावलेल्या टॅगमुळे तिच्या आईचे नाव समजले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्याकडे तो मृतदेह देण्यात आला.
  May 25, 03:50 PM
 • जबलपूर - भोज विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणी गैरव्यवहाराची चौकशी करणारे गुन्हे शाखेचे पथक बुधवारी भोपाळला जाणार आहे. वैद्यकीय शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणाऱया सर्व बनावट शिक्षकांची तेथे चौकशी करण्यात येणार आहे. या सर्व प्रकरणात विद्यापीठाचे माजी कुलसचिव विजय शर्मा यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यांच्यावर भोज विद्यापीठात फायली चोरण्याचा आरोप करण्यात आला होता, अशी माहिती तपासात पुढे आलीये. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए. के. शुक्ला यांनी या तपासाला नवी दिशा...
  May 25, 03:45 PM
 • भोपाळ - मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर नागरिकांनी दगडफेक केली आणि अनेक गाड्या जाळल्या. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल नागरिकांवर लाठीमार केला. यामुळे त्या भागातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.शहरातील मीनाल रेसिडन्सी भागात अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मीनल मॉलचे बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेचे लोक आले होते. या कारवाईला विरोध करताना नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली आणि महापालिकेच्या काही गाड्या पेटवून दिल्या. काही...
  May 21, 03:06 PM
 • ग्वाल्हेर - बॉलीव़ूडच्या रंगीत दुनियेचे आकर्षण नाही असा तरुण सापडणे कठीणच. मात्र, सगळ्यांच्याच घरातून त्यासाठी पाठिंबा मिळतोच असे नाही. अभिनयाची पार्श्वभूमी नसतानाही ग्वालियरच्या कार्तिकला अभिनयात आवड निर्माण झाली, फेसबुकवरच्या फोटोचे निमित्त झाले आणि चित्रपटात अभिनयाची संधी त्याच्याकडे चालून आली. वास्तविक घरातले सर्व वैद्यकीय व्यवसायात आहेत. मात्र, आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी कार्तिकने अभ्यासोबतच मॉडेलिंगही करायला सुरुवात केली. फेसबुकवरचा त्याचा फोटो पाहून चित्रपट...
  May 20, 01:14 PM
 • जबलपूर - बेलखेडा भागात आमदार प्रतिभा सिंह यांचा मुलगा नितीन सिंह याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे. यातील प्रमुख आरोपी दुर्गेश सिंह याला तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आणखी एक आरोपी गोपाळ याच्या शोधासाठी पोलिस शोधमोहिम राबवित असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नितीन सिंह याच्या हत्येमुळे बेलखे़डा आणि मातनपुर भागात शांतता आहे. पोलिसांनी दुर्गेश सिंह याच्याकडून एक...
  May 19, 03:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED