Home >> National >> Madhya Pradesh

Mp News

 • श्योपूर- मध्य प्रदेशातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. श्योपूर येथे झालेल्या मुसळधार पावसात मोरडूंगरी नदीला बुधवारी (ता.26) पूर आला. अंघोळीसाठी गेलेले दोन तरुण नदी पात्रात अडकून पडले. साक्षात मृत्यू आपल्या समोर उभा असल्याचा अनुभव त्यांनी घेतला असावा. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर बचाव पथकाने दोघांना वाचवले. आरिफ (22) आणि प्रेम (28, दोघेही रा. गांधी नगर) हे दोघे मित्रा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. नदीवर पोहोचले तेव्हा पाणी कमी होते. परंतु अचानक मुसळधार पाऊस...
  June 28, 09:08 PM
 • इंदूर - भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनुसार, भय्यू महाराजांच्या जवळच्या मित्राने मंगळवारी डीआयजींना केला केला. तो म्हणाला की, त्याला आत्महत्येच्या कारणांबाबत काही गोष्टी सांगायच्या आहेत. डीआयजींनी त्याला भेटण्यासाठी बोलावले असून त्याचाही जबाब नोंदवला जाणार आहे. तथापि, पोलिसांना हे कळून चुकले आहे की, महाराजांचे कुटुंबीय आणि सेवेकरी आत्महत्येचे खरे कारण लपवत आहेत. त्यांनी तणावाचे कारण सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस मुख्य कारणांचा...
  June 27, 03:50 PM
 • इंदूर - भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांची कन्या कुहूचे मामा औरंगाबादचे मनोज निंबाळकर यांनी महाराजांकडे येणे-जाणे बंद केले होते. रविवारी सीएसपी मनोज रत्नाकर यांना दिलेल्या जबाबात निंबाळकर यांनी स्वत:च हा खुलासा केला आहे. ते असेही म्हणाले की, भय्यू महाराजांनी दुसरे लग्न केले, तेव्हा याची साधी माहितीही आम्हाला दिली नाही. कुहूलाही याबाबत काहीच सांगितले नाही. मग तिलाही वृत्तपत्रात बातम्या वाचून याबाबत कळाले. एवढे जरूर माहिती होते की, कुहू आणि भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ....
  June 27, 01:08 PM
 • ग्वाल्हेर - चारित्र्यावर संशय असल्याने एका तरुणाने पत्नीची गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या दिवशी तो स्वत: पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि हत्येचा गुन्हा कबूल केला. ही घटना मुरारमध्ये मंगलवारी घडली. घटनेपूर्वी महिला एका युवकाशी फोनवर बराच वेळ बोलत होती, यामुळे आरोपी पती चिडला होता. पत्नीची हत्या करून स्वत: गेला पोलिसांत इंद्रराज कोली (32) याचे लग्न 9 वर्षांपूर्वी भावनाशी झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर भावना पतीचे घर सोडून माहेरी गेली होती. यानंतर ती मध्येच काही दिवस येत-जात राहिली....
  June 27, 11:08 AM
 • बैतूल(मध्यप्रदेश) - भोपाळच्या एलएन मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या MBBS च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी हायप्रोफाइल आहेत. 4 विद्यार्थ्यांशिवाय मुख्य आरोपी श्रुती शर्मा विधानसभेचे माजी मुख्य सचिन सत्यनारायण शर्मा यांची मुलगी आहे. पोलिसांनी सांगितले की, श्रुती ड्रग्ससाठी तरुणांशी मैत्री करून त्यांच्यावर घरून पैसे मागवण्यासाठी दबाव आणायची. पैसे मागवले नाही तर ती त्यांना मारहाण करायची. पाचही आरोपींवर ब्लॅकमेलिंगचा आरोप...
  June 26, 11:39 AM
 • ग्वाल्हेर - झांसी रोड परिसरातील विवेक विहारमध्ये आपल्या लहान मुलीसोबत किरायाने राहत असलेल्या प्रेग्नंट महिला सोनम (25) चा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. सोनमचा पती योगेन्द्र चंदेल गुड़गावमध्ये जॉब करतो. मृतदेह जमिनीवर होता आणि साडीचा फास मृत सोनमच्या गळ्यात अडकलेला होता. फासाचा अर्धा भाग कमऱ्यामध्ये लागलेल्या पंख्याला लटकलेला होता. जवळच भाजी कापण्याचा चाकू पडला होता. पोलिसांना महिलेच मुलगी म्हणाली की, घरी मामा आले होते, त्यांचे आईशी भांडण झाले आणि मग त्यांनी आईच्या डोक्यात काठी घातली....
  June 26, 12:00 AM
 • जावरा (मध्य प्रदेश) - येथील एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या निधनानंतर सुनेचा मुलीसारखा सांभाळ करून तिचे दुसरे लग्न लावून दिले. येथील वीज मंडळातील निवृत्त कर्मचारी तुलसीराम नागरू यांचा छोटा मुलगा राजेशचे 2010 मध्ये जयासोबत लग्न झाले होते. 2 वर्षांपूर्वी राजेशचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. जया कुटुंबासोबत राहूनही एकटी पडली होती. तिला अपत्य नव्हते. कुटुंबाने मग जयाचे दुसरे लग्न लावण्याचा विचार केला. जयाचे वडील सतीश आणि आजोबा मांगीलाल यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले जया तुमचीच मुलगी आहे, तुम्ही...
  June 25, 03:27 PM
 • इंदूर (मध्यप्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता, त्या मार्गावरील एका चौकात अॅम्ब्यूलन्सला वाट करुन देणारे पोलिस अधिकारी मनोज रत्नाकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंदूर हायकोर्टचे जज स्वतः पुष्पगुच्छ घेऊन सीएसपी ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी सीएसपी मनोज रत्नाकर यांना पुष्पगुच्छ देऊन वेलडन म्हणत, त्यांनी दाखवलेली समयसुचकतेचे कौतूक केले. दुसरीकडे, ज्या महिला पेशंट्साठी पोलिस अधिकाऱ्याने हे काम केले होते, त्यांची प्रकृती आता चांगली आहे. त्यांनी...
  June 25, 12:53 PM
 • भोपाळ/हैदराबाद - तेलंगणा आणि मध्यप्रदेशात रविवारी झालेल्या दोन रस्ते अपघातांत 17 जणांनी प्राण गमावले. तर 19 जण जखमी आहेत. तेलंगणामध्ये एका बाईकला वाचवण्याच्या नादात ट्रॅक्टरची ट्रॉली कालव्यात कोसळली. त्यात 13 महिलांचा मृत्यू झाला तर 17 जखमी आहेत. दुसरीकडे मध्यप्रदेशच्या इंदूरहून येणारी एक कार ट्रकला धडकली, त्यात दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जखमी झालेत. ट्रॉलीत होते 30 मजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 30 मजूर प्रवास करत होते. ते सर्व यादाद्री भुवनगिरी...
  June 24, 02:10 PM
 • भोपाळ - भारत टॉकीज ब्रिजच्या खाली शुक्रवारी पहाटे तीन वाजता वेगवान इनोव्हा कारने फुटपाथवर झोपणाऱ्या दोन तरुणांना चिरडले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजतोय. अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेला. पण पोलिसांनी त्याला शुक्रवारी संध्याकाळी ताब्यात घेतले. ड्रायव्हरला आली डुलकी.. पोलिसांनी सांगितले की, इनोव्हा कारचा ड्रायव्हर अशोका गार्डनला येत होता. ब्रिजखाली अचानक त्याला डुलकी लागली आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती उजवीकडे वळाली. ड्रायव्हरने गाडी...
  June 23, 05:10 PM
 • मुंबई/इंदूर- आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे संशयाची सुई आणि मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे सेवादार, बांधकाम व्यावसायिक भय्यू महाराजांना वारंवार फोन करत होते, ते आता संशयाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे. जमीन आणि स्टॅम्प हेराफेरीचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिस महासंचालकद्वारा...
  June 22, 07:35 PM
 • औरंगाबाद/इंदूर- भय्यू महाराजांच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. भय्यू महाराजांनी ज्या रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडली, त्याचे लायसन्स महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील आहे. महाराजांनी नंतर ते लायसन्स स्वत:च्या नावाने बुलढाणा जिल्ह्यात2012 मध्ये ट्रान्सफर केले होते, ही माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. भय्यू महाराज यांचे वाशिमशी जवळचे नाते होते. बारसी चाखली हे त्यांचे मूळ गाव. अकोला आणि वाशिम दरम्यान हे गाव आहे. पोलिस रिव्हॉल्वरसह त्यांच्या विसेराची चौकशी करत आहे. विसेरा...
  June 22, 03:42 PM
 • महेश्वर (खरगोन) - भय्यू महाराजांचे दशक्रिया विधी गुरुवारी नर्मदेच्या बड़घाटावर पार पडले. कन्या कुहूने पूजन केले. पं. राजेंद्र जोशी यांनी महाराष्ट्रीय पद्धतीने दशक्रिया विधी पार पाडले. यादरम्यान डॉ. आयुषीही उपस्थित होत्या, परंतु दोघींनी एकमेकींशी बोलणे टाळलेच. परंपरेनुसार एकादश आणि द्वादशचा कार्यक्रमही नर्मदा तटावरच होईल. विदर्भात काढण्यात येणार अस्थि कलश यात्रा ऋषीसंकुल आश्रम, खामगाव (महाराष्ट्र) मधून आलेले प्रमुख एन. टी. देशमुख यांनी इंदुरात भय्यू महाराजांची समाधी स्थापण्याबद्दल...
  June 22, 02:37 PM
 • मुरैना- मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील गंजरामपूर गावात गुरुवारी ट्रॅक्टर ट्राॅली व जीपच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात महिलांसह १५ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. ट्रॅक्टर ट्राॅली वाळूने भरलेली हाेती. गंजरामपूर गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट जीपवर जाऊन धडकले. मृत्युमुखी पडणाऱ्यांत सात महिला व अाठ पुरुषांचा समावेश अाहे. जीपमध्ये एकाच कुटुंबातील २० जण हाेते व ते त्यांच्या एका नातेवाइकाच्या निधनानंतर शाेक कार्यक्रमात सहभागी...
  June 22, 08:37 AM
 • इंदूर - संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा तपास आता त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर केंद्रित झाला आहे. पोलिसांना माहिती मिळाली आहे की, इंदूर व पुण्याच्या आश्रमातील काही असे लोक महाराजांच्या संपर्कात होते, ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते. दुसरीकडे, महाराजांचे विश्वासू बनून ते अनेक प्रकारे फसवणूकही करू लागले होते. ज्यामुळे महाराजांच्या आश्रमात येणारे बडे व्यावसायिक आणि समाजसेवक महाराजांपासून दूर झाले होते. दुसरीकडे, बुधवारी भय्यू महाराजांच्या दोन...
  June 21, 02:10 PM
 • इंदूर - उज्जैनचे एस.पी. सचिन अतुलकर यांना भेटण्याचा हट्ट करणारी चंदिगडची तरुणी 5व्या दिवशी बुधवारी दुपारी परतली. पंजाब पोलिसांत टीआय असलेला तिचा भाऊ सकाळी उज्जैनला पोहोचला आणि समजूत घालून त्याने तिला कारमध्ये बसवून सोबत नेले. एसपीच्या फिटनेसने इम्प्रेस होऊन तरुणी घरातून पळून थेट या आयपीएसच्या उज्जैन येथील घरी पोहोचली. येथे एसपींची भेट घेण्यासाठी तिने मोठा गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना संपर्क करून तिला परत घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. आई आणि इतरांनी 2 दिवस तिला...
  June 21, 12:14 PM
 • इंदूर - भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या आठव्या दिवशी मंगळवारी फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या टीमने पोलिसांना रिपोर्ट सोपवली. यानुसार, भय्यू महाराजांनी क्षणिक आवेशात म्हणजेच एकदम रागात येऊन आत्महत्या केली नाही. त्यांनी 15 ते 20 मिनिटे विचार करून स्वत:वर गोळी झाडली होती. एक्स्पर्टच्या मते, आत्महत्येच्या एक लाख प्रकरणांपैकी एक प्रकरण असे असते. डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्ट सध्या मिळालेली नाही, परंतु तपासात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी जे मुद्दे सांगितले आहेत, त्यावरून...
  June 20, 02:51 PM
 • इंदूर - कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन मध्य प्रदेशचे गृहस्थ संत भय्यू महाराजांनी कथितरीत्या स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांच्या आश्रमातून पिस्तूल आणि एक सुसाइड नोट हस्तगत केली, ज्यात त्यांनी तणावामुळे हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. तथापि, असे म्हटले जात आहे की, ते कन्या कुहू आणि दुसऱ्या पत्नीतील संपत्तीच्या वादामुळे तणावात होते. लग्नाच्या एका महिन्यानंतर दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी लग्न करण्याची पूर्ण कहाणी सांगितली होती. Divyamarathi.Com त्याच मुलाखतीचे अंश...
  June 20, 09:56 AM
 • जबलपूर (मप्र) - शहरात 12 जून रोजी झालेल्या डॉ. शफतुल्ला खान मर्डर प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी पत्नीच निघाली आहे. एसपी शशिकांत शुक्ला म्हणाले, पत्नी आयशानेच 4 जणांसोबत मिळून डॉक्टर पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिने आपला गुन्हाही कबूल केला आहे. मृत राज्य आरोग्य विभागात डेप्युटी डायरेक्टर होते. याप्रकरणी आरोपी पत्नी, पुतणी तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तथापि, पत्नीने स्वत:चा बचाव करताना अनेक दावे केले आहेत. धडा शिकवायचा होता लिंगपिसाट पतीला... - आरोपी आयशा म्हणाली, तिचा पती...
  June 19, 11:59 AM
 • इंदूर - ज्या दिवशी (12 जून) भय्यू महाराजांनी आत्महत्या केली, त्या दिवशी महाराज जेव्हा सकाळी उठले तेव्हा पत्नी आयुषीसोबत ते नॉर्मल वागले होते. कौटुंबिक सूत्रांनुसार, आयुषी यांनी आपली डिग्री आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले होते, डिग्री खूप महत्त्वाची असते. चांगली तयार होऊन जा. त्यांनी आपल्या हातांनी साडी काढून आयुषींना देत म्हटले होते की, ही साडी घालून जा. यानंतर आयुषी तयार होऊन महाराजांचे आवडते जेवण तयार करून घरातून निघाल्या होत्या. 7 दिवसांत 20 हून जास्त...
  June 19, 10:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED