आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचा आँखो देखा हाल:तेलंगणच्या 33 जिल्ह्यांच्या तीन कोटी लोकसंख्येसाठी 1 कोरोना रुग्णालय, येथेच देशातील सर्वाधिक 110 डॉक्टरांना झाला संसर्ग

तेलंगण10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादची दैन्यावस्था - कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांचीही टेस्ट नाही, तेही रुग्णालयाबाहेर उभे आहेत

तेलंगणचे काय होणार, हे थोड्याच दिवसांत कळेल. संपूर्ण राज्याच्या ३३ जिल्ह्यांच्या ३ कोटी लोकसंख्येसाठी केवळ एक कोरोना रुग्णालय आहे. हैदराबादच्या या गांधी ह़स्पिटलमधील व्यवस्था अतिशय वाईट आहे. डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची करमतरता तर आधीपासूनच होती, आता इथल्या ४५० पैकी ११० डॉक्टर कोरोना संसर्गित झाले आहेत. १५० पेक्षा जास्त डॉक्टर-स्टाफ संसर्गत झालेले हे देशातील एकमेव रुग्णालय आहे.

सरकारी डेटानुसार राज्यात आतापर्यंत ५ हजारपेक्षा जास्त लोक संसर्गित झालेले आहेत. यातील १९१ जणांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर खुद्द डॉक्टरच ही आकडेवारी चुकीची असल्याचे सांगतात. नाव न छापण्याच्या अटीवर एका वरिष्ठ डॉक्टरने ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, फक्त हैदराबादेतच रोज २० ते २५ मृत्यू होत आहेत. काहींचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला. मृत्यूंटी संख्या आकडेवारीत समाविष्ट केलेली नाही. सरकार स्वत:ची प्रतिमा वाचवण्यासाठी खरे आकडे सांगत नाही. हेल्थ रिफॉर्मिंग डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेश सांगतात, ‘इथे मनुष्यबळ खूप कमी आहे. डॉक्टर आणि स्टाफ १२-१२ तास काम करतोय. पीपीई किट बदलणे तर दूरच, डॉक्टर व्यवस्थित हातही धुऊ शकत नाहीत. डॉक्टर वेळेवर जेवूही शकत नाहीत. इथले ११० डॉक्टर संसर्गित झाले आहेत.

गांधी हॉस्पिटलच्या डॉ. झैनब सांगतात की खाटा वाढवल्या आहेत. एक हजार बेड्सच्या या रुग्णालयाचा तिसरा आणि सातवा मजला आयसीयूत परिवर्तित केला आहे. एक इतर इमारतही आईसीयूत रूपांतरित केली आहे. तळमजल्यावर ऑक्सिजन पोर्ट लावले जात आहेत. अशा प्रकारे १४५ अतिरिक्त बेड लावले आहेत. परंतु, रुग्णांच्या वाढत्या संख्येसमोर ही व्यवस्था तोकडी आहे. कारण डॉक्टर्स, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ खूप कमी आहे. यामुळेच गांधी हॉस्पिटलचे डॉक्टर दोन दिवस संपावर गेले होते. या प्रकरणात सार्वजनिक आरोग्य संचालक जी. श्रीनिवास राव सांगतात की, सुरुवातीला कोरोना संसर्ग गावांमध्ये नव्हते. म्हणून गांधी हॉस्पिटलला उपचार केंद्र केले. परंतु, आता रुग्ण वाढताहेत म्हणून आम्ही राज्यात ३० नवी उपचार केंद्रे सुरू केली आहेत. यावर गांधी हॉस्पिटलचे डॉ. लोहित तजूटा सांगतात, सरकारने प्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र सुरू करण्याचे मान्य केले, पण परिस्थिती जशीच्या तशी आहे. आमच्याकडे प्रत्येक जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत.

कोरोना रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यामुळे असहाय होत आहेत. हैदराबादच्या नीना गेल्या चार दिवसांपासून गांधी हॉस्पिटलसमोर बसून आहेत. त्यांची ६४ वर्षीय आई १३ दिवसांपासून इथे दाखल आहे. त्या सांगतात, आईबद्दल काहीही माहिती दिली जात नाही. ती जिवंत आहे की नाही, हेही माहिती नाही. अन्य एका व्यक्तीने सांगितले की, त्यांच्या आईलाही कोरोना झाला. कुटुंबातील सदस्यांनाही लक्षणे दिसत आहेत. त्यांनी दहा वेळा आरोग्य विभागाला सांगितले की, त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी घ्या, परंतु कोणीही त्यांचे ऐकत नाही.

रुग्णालयात मृतदेह बदलले जातात, दोन रुग्ण बेपत्ता
स्थलांतरित आणि इतरांना लोकांना मदत करणाऱ्या हैदराबादच्या खालिदा प्रवीण सांगतात की, गेल्या दहा दिवसांत गांधी हॉस्पिटलमध्ये चार वेळा मृतदेह बदलले गेले आहेत. एकाचा मृतदेह दुसऱ्याच्यात कुटुंबीयांना दिला. आपल्या नातेवाइकाला या रुग्णालयात दाखल केले, पण त्यानंतर त्यांचे काय झाले, ते जिवंत आहेत की नाही, हे इथे कुणीही सांगायला तयार नाही, अशा दोन तक्रारी पोलिस दाखल झाल्या आहेत.

हैदराबादच्या गांधी हॉस्पिटलबाहेरचे हे छायाचित्र. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे कुटुंबीय आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी आले आहेत. यातील अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. (फोटो : ताराचंद गवारिया)

बातम्या आणखी आहेत...