आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी:वृंदावनमध्‍ये 10 मिनिटाचे अंतर गाठण्यास लागला 1 तास, 800 हॉटेल फुल्ल

प्रमोद कल्याण | वृंदावनहून लाइव्हएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीकृष्णाचे लीला स्थळ वृंदावनात रविवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी झाली. ब्रज सर्किट-(मथुरा, वृंदावन, बरसाना, गोवर्धन)मध्ये ५ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. बांकेबिहारीजींच्या दर्शनासाठी सुमारे दीड लाख भाविक आले. कुंज गल्यांत भाविकांची २ किमी रांग होती. मंदिर दर्शन सकाळी ७.३० पासून सुरू होणार होते. मात्र, पहाटे ५.०० पासून भाविक आले. दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी एक तास लागला तरीही हजारो लोक दर्शन घेऊ शकले नाहीत. सायंकाळ होता-होता भाविकांची गर्दी आणखी वाढली. व्हीआयपींना रोखण्यात आले. पर्यटन अधिकारी डी.के. शर्मा म्हणाले, गेल्या वर्षी १८ लाख पर्यटक आले होते. या वेळी २ जानेवारीपर्यंत ७ लाख पर्यटक येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...