आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 1 Lakh Corona Victims In India: 5,000 Killed In Lockdown, 1800% Death Toll After Unlock Started

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेकिंग न्यूज:भारतात कोरोनाचे 1 लाख बळी: लॉकडाउनमध्ये 5 हजार तर अनलॉकमध्ये 95 हजार रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनामुळे 1 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा फक्त आकडा नसून, एक लाख श्वास आहेज, जे कोरोनाने आपल्यातून हिरावून घेतले आहेत. देशात परदेशातून 30 जानेवारीला पहिला रुग्ण आला होता. तेव्हापासून 31 मे म्हणजेच लॉकडाउनच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोरोनाची 1.82 लाख प्रकरणे आढळली होती आणि 5,405 मृत्यू झाले होते. त्यानंतर 1 जूनपासून अनलॉक सुरू झाले आणि पुढील 123 दिवसात म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत 61.34 लाख रुग्ण आणि 95 हजार मृत्यू झाले.

लॉकडाउन संपेपर्यंत 193 मृत्यू झाले होते

वेगवेगळ्या राज्यात वाढणाऱ्या रुग्णांमुळे पंतप्रधानांच्या अपीलवर 22 मार्चला जनता कर्फ्यू लावण्यात आला. यानंतर 25 मार्चला देशात टोटल लॉकडाउन लावण्यात आला. 68 दिवसांचा लॉकडाउन 31 मे रोजी संपला. 12 मार्चला देशात पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. 31 मार्चपर्यंत 47 जणांनी जीव गमावला होता. मृत्यूच्या आकडेवारीत सर्वात जास्त वेग जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दिसला. सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त 34,565 मृत्यू झाले.

या एकूण मृतांपैकी 37 टक्के महाराष्ट्रतील आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 37,056 मृत्यू झाले. तर, तमिळनाडु (9.50%) आणि कर्नाटक (9%) दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत. फक्त या तीन राज्यातील मृतांचा आकडा 55 टक्के आहे.

बातम्या आणखी आहेत...