आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 1 Out Of Every 5 Foreign Students Studying In The US Is Indian, This Year 62,000 Visas

दार उघडे:अमेरिकेत शिकणाऱ्या प्रत्येकी 5 मध्ये 1 विदेशी विद्यार्थी असतो भारतीय, या वर्षी 62 हजार जणांना व्हिसा

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांत भारतीयांची संख्या सातत्याने वाढत आहे. अमेरिकी दूतावासाने सोमवारी ओपन डोअर्स रिपोर्ट जारी करून म्हटले की, २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात २०० हून अधिक देशांतील ९,१४,००० वर विद्यार्थी विदेशी आहेत. यात २० टक्क्यांवर भारतीय विद्यार्थी आहेत. अमेरिकेत आता १,६७,५८२ भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. दूतावासातील कौन्सलर मंत्री डॉन हेफ्लिन यांनी म्हटले की, कोरोना महामारीतही या वर्षी ६२,००० हून अधिक विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आले. हे मागील वर्षी दिलेल्या व्हिसाच्या तुलनेत अधिक आहेत. त्यांनी सांगितले की, यावरून स्पष्ट होते की विदेशात शिकण्यासाठी इच्छुक भारतीयांसाठी अमेरिका सर्वात चांगली आहे. उल्लेखनीय म्हणजे दर वर्षी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांत जातात. बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांची पसंती अमेरिकेला आहे. दूतावासातील शैक्षणिक कौन्सलर एंथनी मिरांडा यांच्या मते अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या सुविधा मिळत आहेत. आगामी वर्षात यात वाढच होईल.

४५०० अमेरिकी कॉलेज निवडण्याची संधी
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाऊ इच्छिणारे भारतीय विद्यार्थी ४५०० अमेरिकी कॉलेजांपैकी निवड करू शकतात. दिल्ली, मुंबई, कोलाकाता, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबादेत अमेरिकी सेंटर आहेत. तेथून विद्यार्थी अधिक माहिती घेऊ शकतात. इतर माहिती https://educationusa.state.gov/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...