आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप:बँकांत 1 हजार कोटींचा घोटाळा; 40 टक्के कमिशनचे सरकार गप्प

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले, ३१ मार्च रोजी आयकर विभागाने राज्यातील सहकारी बँकांच्या १६ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १ हजार कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचे उजेडात आले. या गंभीर प्रकरणांत ४० टक्के कमिशन घेणाऱ्या भाजप सरकारने काहीही कारवाई केलेली नाही. सहकारी बँकांनी अस्तित्वात नसलेल्या अनेक संस्थांच्या नावे चेक दिले आहेत.

‘मतदार यादीत बोगस लोक’ कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी मतदार यादीत बोगस नावांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, एका विधानसभा मतदारसंघात १ लाखांहून जास्त बोगस नावे समाविष्ट आहेत. बंगळुरूत ४२ हजार बनावट मतदार आहेत.