आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय लष्करात ४ वर्षांची भरती असलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध १९ राज्यांपर्यंत पसरला आहे. याचदरम्यान, संरक्षण मंत्रालय म्हणाले, आमच्या सर्व भरतींत माजी अग्निवीरांना १०% आरक्षण देऊ. पहिल्या बॅचच्या माजी अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्याचीही घोषणा केली. तत्पूर्वी गृह मंत्रालयानेही सीएपीएफ भरतीत १०% आरक्षण देण्याची घोषणा केली. सीएपीएफमध्ये भरतीसाठी अर्ज करतील तोपर्यंत अग्निवीर माजी सैनिकांच्या यादीत येतील. पॅरामिलिटरी फोर्समध्ये जातीआधारे आरक्षण मिळत नाही. तथापि, वयोमर्यादेत सूट मिळते. याचा लाभही आरक्षित प्रवर्गातून येणारे माजी अग्निवीर घेऊ शकतात. गृह मंत्रालय कोट्याबाबत फ्रेमवर्क लवकर तयार करेल. २०२६ पासून कोटा लागू होईल आणि दरवर्षी सुमारे ३००० ते ४००० माजी अग्निवीर या कोट्याचा लाभ घेऊ शकतील.
अग्निवीरांसाठी ऑफर; शारीरिक शिक्षकदेखील होऊ शकतील
युवक तथा क्रीडा मंत्रालय अग्निवीरांचा क्रॅश कोर्स सुरू करेल. शारीरिक शिक्षकासाठी अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाईल. अनेक राज्यांत १५ लाख शारीरिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
गृहनिर्माण, पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित कंपन्या आणि विभागांतही नोकरीमध्ये प्राधान्य मिळेल.
नौदलातून येणाऱ्यांना बंदरे व शिपिंग मंत्रालयाशी संबंधित ६ कंपन्यांत नोकरी.
हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मप्र ही राज्ये नोकऱ्यांत प्राधान्य देतील. छत्तीसगडमध्ये १३,४२४, मप्रमध्ये ७,०३२, राजस्थानात ४,९३८, बिहारमध्ये २५,५३२, झारखंडमध्ये १२,५९८, हरियाणात १३,०३० पोलिसांची कमतरता. संबंधित. महाराष्ट्र
बिहार : ५० कोच, ५ इंजिन जाळले. ४ पोलिस कर्मचारी जखमी. २०० कोटींचे नुकसान. रेल्वेगाड्या रात्री ८ ते सकाळी ४ वाजेपर्यंतच चालतील.
उत्तर प्रदेश : बलियामध्ये ४०० जणांवर गुन्हा. २०० जणांना अटक. जौनपूरमध्ये बसला आग लावली.
जयपूर-दिल्ली महामार्ग जाम.
केरळ, हरियाणा, आंध्र आणि कर्नाटकमध्येही योजनेविरोधात आंदोलन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.