आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक vs फॅक्ट्स:बिल गेट्स शरीरात चिप लावताय? कोरोनाने झाला दाऊद इब्राहिमचा मृत्यू? व्हायरसच्या नावाने खोट्या बातम्या होताय व्हायरल, वाचा 10 अफवांमागील सत्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या तीन महिन्यात शेकडो बातम्या झाल्या व्हायरल आणि लॉकडाऊनमध्ये विचार न करताच केल्या फॉरवर्ड
  • काही लोकांच्या मूर्खपणातून निर्माण झालेल्या या बातम्यांनी भिती निर्माण केली, तसेच लोकांमध्ये भ्रम आणि तणाव निर्माण झाला

भारतात कोरोना रुग्णांची संख्या 5 लाखांपार गेली आहे. जगभरात कोविड-19 संक्रमित लोकांची संख्या 1 कोटींच्या पुढे गेली आहे. हे आकडे लोकांमध्ये भिती निर्माण करणारे आहेत. लोकांना प्रत्येक क्षणाला कोरोनासंबंधीत अपेडट्स जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 

मार्चमध्ये कोविड-19 ने भारतात पाऊल ठेवले. मात्र कोरोनासोबतच अनेक भ्रामक दावे आणि अफवाही आल्या. हे दावे काही वेळा कोरोना उपचारांवरील होते तर कधी एखाद्या व्यक्तीसंबंधीत होते. तर कधी संस्थांच्या नावाने एखादे वक्तव्य व्हायरल करण्यात आले.

दैनिक भास्करच्य फॅक्ट चेक टीमने या दाव्यांची पडताळणी करुन योग्य फॅक्ट्स आणि सत्यता पडताळत आहे. जाणून घ्या कोरोना व्हायरसंबंधीत असेच 10 मोठ्या अफवांचे सत्य...

1. व्हायरल दावा - डब्ल्यूएचओने म्हटले की, कोरोना व्हायरस कमकुवत होत आहे 

समोर आलेले सत्य - डब्ल्यूएचओचे महानिर्देशक टेड्रोस अडेहनोम ग्रेबेयसस यांनी स्वतः हे वृत्त फेटाळून लावले. 

2. व्हायरल दावा - गृह मंत्रालयाने देशभरातील शाळा उघडण्याची परवानगी दिली. 

समोर आलेले सत्य - गृह मंत्रालयाने काही अटींसह केवळ 10 वी आणि 12 वीच्या काही परिक्षा घेण्याची परवानगी दिली होती. शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. 

3. व्हायरल दावा - बिल गेट्स लोकांवर नजर ठेवण्यासाठी कोरोना टेस्टसोबतच लोकांच्या शरीरावर चिप लावत आहेत.

समोर आलेले सत्य - बिल गेट्स यांनी लोकांना डिजिटली सर्टिफाइड करण्याविषयी भाष्य केले होते. शरीरावर चिप लावण्याविषयी नाही. 

4. व्हायरल दावा - रिसर्च संस्था आयसीएमआरच्या नावाने व्हॉट्सअप मॅसेज, यामध्ये म्हटले जात आहे की, तुम्ही एक वर्ष बाहेर जाऊ शकत नाही, असेच एकूण 21 दिशा-निर्देश आहेत. 

समोर आलेले सत्य - आयसीएमआरच्या कोरोना टीमचे सदस्य डॉ. सुमित अग्रवाल यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले.

5. व्हायरल दावा - डॉ. रमेश गुप्ता यांच्या 'मॉडर्न अ‍ॅनिमल सायन्स' या पुस्तकात वर्षांपूर्वी कोरोना विषाणूची माहिती दिली गेली होती.

समोर आलेले सत्य - सर्दी आणि सर्दीची लक्षणे दूर करण्यासाठी डॉ. गुप्ता यांच्या पुस्तकात औषधे लिहिलेली आहेत, भारत सरकारनेही हा दावा खोटा ठरविला आहे.

6. व्हायरल दावा - एका वर्तमानपत्राचे कटिंग शेअर करून, असा दावा केला गेला की मद्यपान करणाऱ्यांना कोरोना विषाणू होणार नाही.

समोर आलेले सत्य - तपासणीत अशी कोणतीही बातमी आढळली नाही. डब्ल्यूएचओने कोरोना मद्यपान करून बरा होतो असे सांगितलेले नाही. तर अल्कोहोल-आधारित हँडवॉश वापरण्यास सांगितले आहे. 

7. व्हायरल दावा - डेटॉलला कोविड -19 बद्दल आधीच माहिती होती, कोरोनाव्हायरसचे नाव त्यांच्या बाटलीच्या मागील बाजूस लिहिलेले आहे.

समोर आलेले सत्य - कंपनीच्या काही उत्पादनांना कोरोना व्हायरस फॅमिलीविरुद्ध प्रभावी असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, कोविड -19 संबंधीच डेटॉलच्या कोणत्याही प्रोडक्टची टेस्टिंग करण्यात आलेली नाही.

8. व्हायरल दावा - चीनचा कोरोना विशेषज्ञ ली वेनलिंग मृत्यूपूर्वी असे म्हणाले की चहामधील रसायने कोरोनव्हायरस नष्ट करू शकतात.

समोर आलेले सत्य- डॉ. ली वेनलिंग एक कोरोना व्हायरस तज्ञ नसून डोळ्यांचे तज्ञ होते. त्यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले. त्यांच्या नावाने व्हायरल केलेला दावा खोटा ठरला.

9. व्हायरल दावा - ताज्या उकळलेल्या लसूणच्या पाण्याने कोरोना व्हायरसवर उपचार करता येतो. सात कप पाण्यात लसूण उकळवा आणि प्या.

समोर आलेले सत्य - डब्ल्यूएचओने ट्वीट करुन म्हटले - लसूणपासून कोरोना व्हायरसवर उपचार होतात. याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही.

10. व्हायरल दावा - कराची येथील रूग्णालयात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या पत्नीचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले.

समोर आलेले सत्य - दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे की दाऊद आणि त्याची पत्नी दोघांनाही कोरोना संक्रमण झाले नाही किंवा त्याचा मृत्यू झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...