आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Coaches Of Suryanagari Express Derailed, 24 Passengers Injured, Fortunately No Loss Of Life

अपघात:सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 10 डबे घसरले, 24 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवित हानी टळली

पाली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांद्रा टर्मिनस येथून राजस्थानच्या जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेस सोमवारी पहाटे रुळावरून घसरली. मारवाड जंक्शन व बोमादडा दरम्यान पहाटे ३.१६ गाडीचे तीन डबे उलटले तर १० रुळावरून घसरले. उलटलेल्या डब्यातील ६० प्रवासी जखमी झाले. त्यापैकी २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डबे ५० फूट लांब पडले होते. सुदैवाने जीवित हानी टळली. रुळावरील फिश प्लेट घटनास्थळी उखडलेल्या स्थितीत दिसून आली आहे. त्यामागे घातपात आहे का हे स्पष्ट नाही. नटबोल्ट तेथे आढळून आलेले नाहीत. दोन-तीन जागी रुळही तुटलेल्या स्थितीत होता.कदाचित रुळ सदोष असावा किंवा एखादा जॉइंट निखळला असावा. असे पूर्वीही घडले होते.

बातम्या आणखी आहेत...