आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Days Before Holi, Lord Shriram Celebrated Rangotsav With Enthusiasm In Sasari Janakpur

रंगोत्सव:होळीच्या 10 दिवस आधीच प्रभू श्रीरामांनी सासरी जनकपूरमध्ये उत्साहात साजरा केला रंगोत्सव

कंचनवन, नेपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जनकपूर मंदिरातून निघालेला श्रीराम व जानकी यांचा डोला शनिवारी दुपारी कंचनवनला पाेहोचल्यानंतर रंग-गुलालाची उधळण सुरू झाली. त्याचबरोबर त्रेतायुगापासून सुरू असलेल्या परंपरेअंतर्गत मिथिला होळी उत्सवाला सुरुवात झाली. म्हटले जाते की, श्रीराम लग्नानंतर सीतेसोबत मिथिलेच्या दर्शनासाठी निघाले होते. १५ दिवसांच्या प्रवासाच्या सातव्या दिवशी ते कंचनवनला पोहोचले त्या दिवशी होळी होती. कंचनवनमध्येच नवदांपत्य होळी खेळले.

या फागोत्सवात मिथिलेतील लोकही सहभागी झाले. तेव्हापासून दरवर्षी हजारो साधू-संत, महिला- पुरुष कंचनवनला जात फगुआला (होळी) सुरुवात करतात. जानकी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी सांगितले की, श्रीराम दरवर्षी जानकी व तिच्या मैत्रिणींसोबत होळी खेळण्यासाठी कंचनवनला येतात, असे मानले जाते. यानिमित्त मोठ्या संख्येने भाविक येथे जमतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविक कंचनवनला येतात. श्री मिथिला बिहारी व किशोरीजी यांची डोली येताच एकमेकांवर रंग-गुलालाची उधळण करतात.

रामदुलार यादव सांगतात की, लोक भगवान राम व आई जानकीच्या पहिल्या होळीची परंपरा पाळतात. अजूनही लोक स्वत: रंग व गुलाल तयार करतात. गहू व तांदळाच्या पिठात हळद व झेंडूचे फूल मिसळून पिवळा, गुलाबाच्या पाकळ्यांनी लाल, सिंघाड्याच्या फुलापासून गुलाबी व बेलाच्या पानांनी हिरवा रंग तयार केला जातो.

बातम्या आणखी आहेत...