आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Job Threats In ChatGPT Sectors Make It An Alternative Tool By Upskilling New Skills

कन्झ्युमर अॅप:चॅटजीपीटीचा 10 क्षेत्रांतील नोकऱ्यांना सर्वात जास्त धोका, नवी कौशल्ये वाढवून ते पर्यायी साधन बनवा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाच्या जगात एका शब्दाची धूम पाहायला मिळत आहे. तो म्हणजे ‘चॅटजीपीटी’. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित चॅटबॉट चॅटजीपीटी गतवर्षी ३० नोव्हेंबरला लाँच झाले. जानेवारीत त्याचे मासिक अॅक्टिव्ह युजर १० कोटींवर गेले. याबरोबरच ते इंटरनेटच्या इतिहासातील सर्वात वेगाने प्रसार झालेले कन्झ्युमर अॅप्लिकेशन ठरले आहे. जानेवारीत दररोज १.३ कोटी यूजर त्याच्याशी जोडले गेले. एवढा वापर असूनही गदारोळ का..? कारण चॅटजीपीटीमुळे अनेक व्हाइट कॉलर जॉब संकटात आहेत. शैक्षणिक संस्थांतही ही चिंता दिसते. तथापि, निकटच्या भविष्यात त्यापासून धोका नाही.

चॅटजीपीटी क्रांती अटळ, उत्पादकता वाढणार चॅटजीपीटीला मर्यादा आहेत. उदाहरणार्थ सध्या याद्वारे २०२१ पर्यंतचा डेटा मिळतो. क्रिएटरने त्यास आपल्या पद्धतीने घडवले आहे. म्हणजेच माहिती पूर्वग्रहदूषित आहे. अनेक गोष्टींची उत्तरेही चुकीची देते. त्यामुळे विश्वासार्हता कमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅटजीपीटीकडे मानवाकडे असलेला कॉमन सेन्स नाही. हे तंत्रज्ञान नवीन काहीही विकसित करत नाही. ते उपलब्ध डेटावर आधारित नमुना तयार करते. परंतु आगामी काळात त्यात वेगाने विकास होईल.

त्यामुळेच अनेक नोकऱ्यांवर संकट येऊ शकते. हे संकट भारतातही आहे. मानवी कौशल्ये विकसित करण्यावर आपला भर हवा. चॅटजीपीटीशी स्पर्धेचा उद्देश असू नये. कारण ही क्रांती आहे. ती अटळ आहे. संगणक आले. नोकऱ्या जातील असे म्हटले जात होते. परंतु उलट. संगणकाच्या वापराने कामे झटपट होऊ लागली. चॅटजीपीटी देखील वेळेसाठी मदत करेल. कौशल्य वाढवावे लागेल. कारण चॅटजीटीपी टूलद्वारे उत्पादकता खूप वाढणार आहे.

चॅटजीपीटी कसे काम करते? चॅटजीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेंट ट्रान्सफॉर्मर) अॅप्लिकेशन एक मशीन लर्निंग सिस्टिम आहे. ही प्रणाली डेटाद्वारे शिकून रिसर्च करते आणि त्याचे परिणाम देण्याचे काम करते. डाल-इ टूलही टेक्स्टच्या बदल्यात थ्री-डी इमेज बनवते.

असा चांगला वापर शक्य {शिक्षक कंटंेटचा तुटवडा दूर करू शकतात. उर्वरित वेळेत अध्यापनावर भर देता येऊ शकतो. {शिक्षणात एआयचा वापर अतिरिक्त साधनाच्या रूपात शक्य आहे. अन्यथा सध्याची शिक्षण पद्धती कालबाह्य ठरेल.

सॅम आल्टमॅनने बनवले अॅप सॅम आल्टमॅनने ८ व्या वर्षापासून कोडिंग शिकली. १६ व्या वर्षी घर सोडले होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठ दोन वर्षांनंतर सोडून मोबाइल अॅॅप बनवू लागला.

बातम्या आणखी आहेत...