आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 10 Lakh Health Workers Do Not Come For Second Dose ... This Delay Gives Corona 'second Chance'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगाच्या आशा लसीवर:10 लाख हेल्थ वर्कर्स दुसरा डोस घेण्यास आलेच नाहीत... हा विलंब कोरोनाला देतोय ‘दुसरी संधी’

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या रांगेतील आपल्या योद्ध्यांचे पाऊल मागे का?

आजपासून १० हजार सरकारी आणि ११ हजार खासगी केंद्रांवर लसीकरण सुरू होईल. पण चिंतेची बाब म्हणजे ९.८४ लाख हेल्थ वर्कर्स आतापर्यंत लसीचा दुसरा डोस घेण्यास आले नाहीत. दुसरा डोस १३ फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. २६ फेब्रुवारीपर्यंत १४ दिवसांत २५.१६ लाख जणांनी दुसरा डोस घेतला. एवढ्याच दिवसांत ३५ लाख लोकांनी पहिला डोस घेतला होता.

दुसरा डोस घेतला नाही तर पहिला डोस वाया जाईल, संसर्गाचाही धोका - डॉ. रमण गंगाखेडकर माजी शास्त्रज्ञ, आयसीएमआर
ज्याने पहिला डोस घेतला आहे, पण दुसरा डोस घेतला नाही, तर हा केवढा मोठा धोका आहे?

खूप मोठा. दुसरा डोस घेतल्यावरही १२-१५ दिवसांपर्यंत संसर्गाचा धोका कायम राहतो. कारण, पूर्ण रोग प्रतिकारशक्ती येण्यास ४० पेक्षा जास्त दिवस लागतात. त्यामुळे दुसरा डोस घेण्यास विलंब केला तर संसर्गाचा धोका कायम राहतो. त्यामुळे पहिला डोसही वाया जाईल.

ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी आता काय करावे? म्हणजे पहिला डोस वाया जाऊ नये म्हणून दुसरा डोस घेण्यासाठी त्यांच्याकडे किती अवधी आहे?
खरेतर पहिल्या डोसनंतर २८ व्या दिवशी दुसरा डोस घ्यायला हवा. पण एखादा आठवडा उलटला तरीही काळजीचे कारण नाही. त्वरित दुसरा डोस घ्यावा.

काही वृत्तांनुसार एक डोस जरी घेतला तरी रोगप्रतिकारशक्ती येते, त्यात किती तथ्य आहे?
ही गोष्ट खरी नाही. कारण, त्याला आतापर्यंत मजबूत वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही. त्यामुळे कुठल्याही स्थितीत दुसरा डोस घ्यायलाच पाहिजे.

काही कारणास्तव राहिलेल्या हेल्थ वर्कर्सना दुसरा डोस मिळावा यासाठी सरकारने काय करायला पाहिजे?
लॅन्सेटच्या एका अहवालात म्हटले होते की, दुसरा डोस तीन महिन्यांतही घेऊ शकता. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे दुसरा डोस किती दिवसांच्या आत घ्यायला पाहिजे याचे स्पष्ट दिशानिर्देश सरकारने दिले पाहिजेत.

कोरोनाच्या नव्यानव्या प्रकारांवर लसीच्या परिणामाबाबत काही लोकांमध्ये विविध प्रकारचा संभ्रण आहे. दुसरा डोस न घेण्याचे हेही कारण असू शकते का?
हे कारणही असू शकते, पण असा विचार करणे चुकीचे आहे. कारण, आतापर्यंत ज्या लसी आल्या आहेत त्या कोरोना विषाणूच्या आतापर्यंतच्या ज्ञात सर्व प्रकारांवर परिणामकारक आहेत.

शाबास अरुणाचल; सर्व सक्रिय रुग्ण बरे झाले, राज्य काेराेनामुक्त घोषित केले गेले
इटानगर| अरुणाचल प्रदेश रविवारी कोरोनामुक्त राज्य घोषित झाले. राज्यात कोरोनाचे तीन सक्रिय रुग्ण होते, ते बरे झाले. राज्यात एकूण १६,८३६ रुग्ण आढळले होते. १६,७८० बरे झाले. उर्वरित रुग्णांना वाचवता येऊ शकले नाही.

नवी लस; अमेरिकेने जाॅन्सन अँड जाॅन्सनच्या ‘सिंगल डाेस’च्या लसीला दिली मंजुरी
अमेरिकेने जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. तिचा फक्त एक डोस दिला जाईल. तिचे नाव जानसीन कोविड-१९ लस आहे. ही लस १८ वर्षांवरील लोकांना दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...