आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात बेरोजगारीच्या समस्येशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना दिलेल्या निर्देशांत त्यांनी “मिशन मोड’मध्ये काम करून दीड वर्षात १० लाख नोकर भरती करावी, असे म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाने(पीएमओ) मंगळवारी सांगितले की, सर्व सरकारी विभाग, मंत्रालयांत मनुष्यबळाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले आहेत.
विविध सरकारी क्षेत्रांतील रिक्त पदांचा मुद्दा काही दिवसांपासून तापला आहे. या घोषणेनुसार, १८ महिन्यांत १० लाख पदभरती केल्यास २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्याशी सामना करण्यासाठी भाजपकडे मोठे शस्त्र राहील. या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, ८ वर्षांपूर्वी जसे तरुणाईला दरवर्षी २ कोटी नोकरीचे आश्वासन दिले होते, तसेच ते आता १० लाख सरकारी नोकऱ्यांचे आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या निर्देशानंतर रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, विभाग एका वर्षात १,४८,४६३ उमेदवारांची नियुक्ती करेल. विभाग ८ वर्षांपासून दरवर्षी सरासरी ४३,६७८ नियुक्ती करत आहे.
केंद्र सरकारमध्ये ४० लाख पदे, २१% म्हणजे ९ लाख रिक्त, सर्वाधिक रेल्वे, संरक्षणात
1. केंद्रात ८,७२,२४३ रिक्त पदे आहेत. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, १ मार्च २०२० पर्यंत मंजूर पदे ४०,०४,९४१ आहेत. यामध्ये ३१,३२,६९२ वर कर्मचारी नियुक्त आहेत. एकूण पदांच्या २१% पदे रिक्त आहेत.
2. सर्वाधिक रिक्त पदे संरक्षणात(♦सिव्हिल) २,४७,५०२ आणि रेल्वे विभागात २,३७,२९५
मोठे विभाग एकूण पदे रिक्त
संरक्षण(सिव्हिल) 6,33,139 2,47,502
रेल्वे 15,07,694 2,37,295
गृह मंत्रालय 10,84,430 1,28,842
पोस्ट 267491 90,050
महसूल 178432 76,327
3. ५ वर्षांत (२०१७ ते २०२१) ३ बोर्डांनी ४,४४,८१३ पदे भरली. सर्वाधिक २,१४,६०१ एसएससीने केली. रेल्वे बोर्डाने २,०४,९४५ व यूपीएससीने २५,२६७ पदे भरली.
सैन्यात अग्निपथ योजना
केंद्राने लष्करी भरतीसाठी “अग्निपथ योजना’ जारी केली. यात लष्कर, नौदल व हवाई दलात सैनिकांसाठी ४ वर्षांसाठी भरती होईल. सशस्त्र दलांत “अग्निवीर’ नाव दिले जाईल. या वर्षी ४६ हजार अग्निवीरांच्या भरतीचे उद्दिष्ट आहे. संरक्षणावरील मंत्रिमंडळ समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
नवे किंवा वेगळे काय
-सहा महिन्यांचे प्रशिक्षण,४ वर्षांसाठी भरती
-या वर्षी ४६ हजारांची भरती
- तिन्ही दलांत एक वेगळी रँक बनवली जाईल. वर्दीसह वेगळे प्रतीक चिन्हही परिधान करतील.
- ४ वर्षांनंतर ७५% सेवामुक्त
- ४ वर्षांनंतर ७५% अग्निवीर सेवेतून मुक्त होतील. २५% ना लष्करात पुढे कायम ठेवले जाईल.
काय म्हणतात तज्ज्ञ?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.