आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 10 Peole In Andra Pradesh And 21 People In Punjab Dies After Consuming Poisonous Liquor And Hand Sanitiser

आंध्र प्रदेश/ पंजाब:आंध्रात सॅनिटायजर पिल्याने 10 जणांचा, तर विषारी दारू पिल्याने पंजाबमध्ये 30 जणांचा मृत्यू

अमृतसर/अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशात सॅनिटायजर पिल्याने 10 जणांचा तर विषारी दारू पिल्यामुळे पंजाबमध्ये दोन दिवसात 21 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विषारी दारुमुळे अमृतसरजवळील मुच्छल गावात गुरुवारी 8 जणांचा तर शुक्रवारी 4 जणांचा मृत्यू झाला. तर, तरनतारनमध्ये 7 जणांचा आणि बटालामध्ये दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पंजाब सरकारने याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी एका एसएचओला सस्पेंड करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू पिल्याने अमृतसरजवळील मुच्छल गावात गुरुवारी 5 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर, शुक्रवारी 25 जणांनी प्राण सोडले. यात तरनतारनमधील 15 , बटालामधील 6 जणांचा आणि मुच्छलधील 4 जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पंजाब सरकारने याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

आंध्रात दारू न मिळाल्याने सॉफ्ट ड्रिंकमध्ये सॅनिटायजर टाकून पिले

आंध्रातील प्रकाशम जिल्ह्यातील कुरिचेडु गावात हँड सॅनिटायजर पिल्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. एसपी सिद्धार्थ कौशलने शुक्रवारी सांगितले की, मागील काही दिवसांपासून लोक सॉफ्ट ड्रिंकमध्ये सॅनिटायजर मिसळून पित होते. लॉकडाउनमध्ये दारु न मिळाल्यामुळे त्यांनी हे केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर शहरातील सॅनिटायजरच्या स्टॉकची तपासणी केली जाणार आहे.