आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 States Including Uttarakhand And Haryana Register Double Digit In Unemployment In September 2020

CMIE ची रिपोर्ट:देशात नोकऱ्या वाढल्या, पण 10 राज्यांमध्ये बेरोजगारी दर डबल डिजिटमध्ये, उत्तराखंड-हरियाणा टॉपवर; जाणून घ्या महाराष्ट्राचा कितवा नंबर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ओव्हरऑल बेरोजगारी दर कमी होऊनही 10 राज्यांमध्ये नोकऱ्यांची परिस्थिती अंत्यत वाईट आहे. या राज्यांमध्ये सप्टेंबरमध्येही बेरोजगारी दर डबल डिजिटमध्ये असेल. बेरोजगारीच्या बाबतीत उत्तराखंड आणि हरियाणा टॉपवर आहे. उत्तराखंडमध्ये बेरोजगारी दर 22.3% आणि हरियाणामध्ये 19.7% आहे.

या राज्यात बेरोजगारी दर डबल डिजिटमध्ये

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE)च्या आकडेवारीनुसार, उत्तराखंड आणि हरियाणाशिवाय त्रिपुरा (17.4%), जम्मू-काश्मीर (16.2%), गोवा (15.4%), राजस्थान (15.3%), दिल्ली (12.5%), हिमाचल प्रदेश (12.0%), बिहार (11.9%), पुडुचेरी (10.9%) मध्ये बेरोजगारी दर डबल डिजिटमध्ये आहे. यात मोठे उद्योग धंदे असलेले हरियाणा, राजस्थान, दिल्लीदेखील सामील आहे.

ग्रामीणांनुसार शहरात बेरोजगारी जास्त

सप्टेंबर महिन्यात शहरांपेक्षा ग्रामीण भागात जास्त बेरोजगारी आहे. CMIE च्या डेटानुसार, शहरी भागात बेरोजगारी दर 8.45% आहे. तर, ग्रामीण क्षेत्रात 5.86% आहे. यादरम्यान राष्ट्रीय बेरोजगारी दर 6.67% आहे.

बिहारमध्ये बेरोजगारी महत्वाचा मुद्दा ठरू शकतो

बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण आहे, राज्याचा बेरोजगारी दर 11.9 % आहे. अशात बेरोजगाचीचा मुद्दा बिहार निवडणुकीत सर्वात पुढे असू शकतो. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्व निवडणुक लढवणाऱ्या महागठबंधनने आपल्या घोषणापत्रात सत्तेत आल्यावर 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

13 राज्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त बेरोजगारी दर

सप्टेंबरमध्ये देशात सरासरी बेरोजगारी दर 6.67% होता.तर, 13 राज्यांमध्ये बेरोजगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. डबल डिजिट राज्यांऐवजी पश्चिम बंगाल (9.3%), पंजाब (9.6%) आणि झारखंड (8.2%) मध्येही बेरोजगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

चार राज्यांमध्ये 3% पेक्षा कमी बेरोजगारी दर

देशातील 4 राज्यांमध्ये बेरोजगारी दर 3% पेक्षा कमी आहे. या राज्यात असम, छत्तीसगड, ओडिशा आणि कर्नाटक आहेत. 3 ते 5% बेरोजगारी दर असलेल्या राज्यात तेलंगाणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश आहेत.

सर्वात कमी बेरोजगारी दर असलेली पाच राज्ये

राज्यदर
असम1.2%
छत्तीसगड2.0%
ओडिशा2.1%
कर्नाटक2.4%
तेलंगाणा3.3%

इतर राज्यातील बेरोजगारी दर

राज्यदर
आंध्र प्रदेश6.4%
गुजरात3.4%
झारखंड8.2%
केरल5.9%
मध्य प्रदेश3.9%
महाराष्ट्र4.5%
मेघालय4.3%
पंजाब9.6%
सिक्किम5.7%
तमिलनाडु5.0%
उत्तर प्रदेश4.2%
पश्चिम बंगाल9.3%
बातम्या आणखी आहेत...