आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Mandir Temple Update | Delhi Ram Mandir Udpate | 10 Thousand Square Feet Stage, 70 Feet Replica Of Ram Mandir | Marathi News

दिल्लीत जय्यत तयारी:10 हजार चौरस फुटांचा मंच, राम मंदिराची 70 फुटी प्रतिकृती; लव-कुश रामलीलेचे सादरीकरण

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानीत दिल्लीत अडीच वर्षांनंतर लव-कुश रामलीलेचे सादरीकरण भव्य स्वरूपात होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. रामलीलेसाठी यंदा राम मंदिराची ७० फूट प्रतिकृती उभारली जाणार आहे. सोबत तीन मजली व्यासपीठ, बॉलीवूड स्टंटमन, कलाकारांना हवेत उचलण्यासाठी १५० क्रेन व थ्री-डी इफेक्टचादेखील वापर केला जाणार आहे. रामलीला लाल किल्ला मैदानावर २६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत चालेल. लव-कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुनकुमार म्हणाले, यंदा मुंबई, कोलकाता, लखनऊ, मथुरा, वृंदावनसह २५० कलाकारांचा त्यात समावेश असेल. रामलीलेचे भव्य आयोजन, अयोध्येतील राम मंदिर उभारणी आणि स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष असा सगळा योग जुळून आलेला आहे. आनंद द्विगुणित झाला आहे. प्रेक्षकांना आनंद घेता यावा म्हणून व्यासपीठ पूर्वीच्या तुलनेत दुप्पट आहे.

४० हजार प्रेक्षकांची व्यवस्था
मैदानावर ४० हजार प्रेक्षकांची व्यवस्था असेल. १५ हजार लोकांसाठी आसन व्यवस्था केली जात आहे. ३० फुटांची कैलास पर्वताची प्रतिकृती असेल. त्यामुळे वनात असल्यासारखे भासेल. व्यासपीठावर एलईडीची व्यवस्था असेल. पाच प्रवेशद्वार असतील. विजयादशमीच्या दिवशी दहनाचे पुतळेही जास्त मोठे असतील.