आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 To 15% Of People Who Have Overcome Corona Still Have Problems; More Complaints Like Weakness, Depression, Insomnia

लाँग कोविड:कोरोनावर मात केलेल्या 10 ते 15% लोकांना अजूनही समस्या; अशक्तपणा, नैराश्य, निद्रानाशसारख्या अधिक तक्रारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्थापन केला तज्ज्ञांचा गट, नवे निर्देश जाहीर करणार

देशात कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या ३ कोटींहून अधिक आहे. यातील अनेक लोक अजूनही लाँग कोविडमुळे त्रस्त आहेत. म्हणजे त्यांच्यात बरे होऊनही कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. दिल्लीतील लोकनायक रुग्णालयाचे मेडिकल कन्सल्टंट प्रो. नरेश गुप्तांनुसार, देश-विदेशात झालेल्या अभ्यासातील निष्कर्ष सांगतात की, कोरोनातून बरे झाल्यानंतरही १० ते १५ टक्के रुग्णांत लाँग कोविडची लक्षणे राहतात. सीरो सर्व्हेत लक्षणे नसलेल्या रुग्णांतही एवढेच लोक समस्यांचा सामना करताना आढळले आहेत. अर्थात, देशाच्या दोन प्रतिष्ठित रुग्णालय समूहांनी केलेल्या सर्व्हेनुसार, अशा रुग्णांची संख्या सुमारे ४० टक्के आहे.

प्रो. गुप्ता यांच्यानुसार, बरे झाल्यानंतरही एक-दोन महिन्यांनी रुग्णांत कोरोनाची लक्षणे पुन्हा आढळत असल्याचे दिसत आहे. यात थकवा, पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास, निद्रानाश या लक्षणांचा समावेश आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य महासंचालक प्रो. सुनीलकुमार यांनी म्हटले आहे की, लाँग कोविडवर उपचारांसाठी लवकरच मार्गदर्शक निर्देश जारी केले जातील. यासाठी तज्ज्ञ गटाची स्थापना करण्यात आली आहे.

पर्यटनस्थळांवरील गर्दी धोकादायक, तिसरी लाट येईल : नरेंद मोदी
ईशान्येतील राज्यांचा कोविड-१९ विषयी आढावा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सर्व पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीबाबत आणि कोरोना नियमांची तमा न बाळगणाऱ्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, डोंगरी भागांत, बाजारांत विनामास्क फिरणे, सुरक्षित अंतर ठेवणे पाळणार नसाल तर चिंतेची बाब आहे. या बेजबाबदारपणातून देशात तिसरी लाट येऊ शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्वासाचे व्यायाम करा आणि चाला, भरपूर पाणी प्या, प्रोटिन वाढवा
लाँग कोविड आहे काय?

अनेक कोरोना रुग्ण घरीच बरे झाले होते. ते पूर्ण बरे झाल्यावर काेरोनारसाख्या लक्षणांची तक्रार करत आहेत. याला पोस्ट कोविड सिंड्रोम किंवा लाँग कोविड म्हटले जाते. ही लक्षणे बरे झाल्यावर ४ ते १२ आठवडे जाणवतात. काही लोकांना यापेक्षा अधिक काळ त्रास होतो. आपल्याला पुन्हा कोरोना झाला आहे, असे त्यांना वाटते. कोरोना होऊन गेल्यावरही लस न घेणारे किंवा पहिला डोस घेतल्यावर संसर्ग झालेले व दुसऱ्या डोसची वाट पाहणाऱ्यांना हा त्रास.

कोणती लक्षणे दिसतात?
ताप, अंगदुखी, धाप लागणे, कफ, छाती आवटळणे, सांधेदुखी, डोकेदुखी, स्मृतिभ्रंश, निद्रानाश. तज्ज्ञांनुसार, अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि कामात सक्रिय राहावे.

असे का होते?
कोरोनाचा केवळ फुप्फुसांवर नव्हे, इतर अवयवांवरही परिणाम होतो. यात यकृत, फुप्फुसे, हृदय, मूत्राशय अशा अवयवांचा समावेश आहे. या अवयवांशी संबंधित जुन्या तक्रारी असलेल्यांना याचा अधिक त्रास होतो. त्यांना बरे होण्यास वेळ लागतो.

सक्रिय जीवनशैली गुणकारी आहे?
अर्थातच. डॉक्टरनुसार, दुसऱ्या लाटेनंतर लाँग कोविडच्या समस्या भेडसावणाऱ्यांची संख्या अनेक पटीत वाढू शकते. यात लसीकरण फायद्याचे ठरू शकते. एम्स दिल्लीनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्वासाचे व्यायाम, दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने चालणे यामुळे फुप्फुसांची क्षमता वाढेल. पौष्टिक अन्न घ्या, भरपूर पाणी प्या. प्रोटिनयुक्त अन्नाचे सेवन करत राहा.

हृदयविकार असेल तर?
एम्स, दिल्लीचे हृदयविकार तज्ञ डॉ. संदीप मिश्रा म्हणतात, निरोगी वयस्कांनी रोज १० ते १५ हजार पावले (सुमारे ५ किमी) चालावे. आठवड्यात ५ दिवस ४०-४० मिनिटे व्यायाम करता येईल. व्यायामानंतरही सामान्यपणे प्रेडिक्टेड मॅक्झिमम हार्ट रेट ५०- ६० टक्के आवश्यक. हार्ट रेट २२० मध्ये वयानुसार कमी करून नोंदवता येतो. तो समजा ८५% आला तर काळजीचे कारण नाही. ईसीजी योग्य असेल तर त्याच्या हृदयाची काळजी करण्याचे कारण नाही. जर हृदयविकाराच्या तक्रारी असतील तर रोज ३० मिनिटे किंवा आठवड्यात १५० मिनिटांपेक्षा जास्त फिरू नका. एवढेच नव्हे, प्रेडिक्टेड मॅक्सिमम हार्ट रेट ५०-६०% वर नसावा.

थकवा हे सर्वाधिक लक्षण आढळून आले. देशभरात सर्वाधिक १२.५ टक्के रुग्णांनी ही तक्रार केली. {९.३% लोकांनी मांसपेशींमध्ये वेदना असल्याची तक्रार. गंभीर लक्षणे असलेल्या बहुतांश लोकांची धाप लागत असल्याची तक्रार. {न्यूरोसायकियाट्रिक लक्षणांसारखे नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश अशी लक्षणे सांगितली. {३७.३% म्हणजे एक तृतीयांश लोकांना रुग्णालयात भरती करण्यापूर्वी किमान एक आजार होता. २३.७% लोकांना मधुमेह, २०.४% लोकांना उच्च रक्तदाब होता. : हैदराबाद येथील एआयजी हॉस्पिटल आणि दिल्लीतील मॅक्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष

बातम्या आणखी आहेत...