आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील हे छायाचित्र सध्या खूप चर्चेत आहे. या छायाचित्रातील १० वर्षांचा मुलगा फुटपाथवर कुत्र्यासाेबत झाेपलेला दिसत आहे. रात्री एका बंद दुकानाच्या बाहेर घाेंगडी आेढून झाेपलेला मुलगा आणि त्याच्या कुत्र्याचा फाेटाे काही दिवसांपूर्वी काेणीतरी साेशल मीडियावर शेअर केला हाेता. त्यानंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने त्या मुलाचा शाेध घेण्यास सुरुवात केली. अखेर साेमवारी सकाळी हा मुलगा पाेलिसांना सापडला. पाेलिसांनुसार या मुलाचे नाव अंकित आहे.
आपले वडील तुरुंगात असून आईदेखील मला साेडून गेली, असे त्याने सांगितले. सध्या अंकित पाेलिसांच्या संरक्षणात आहे. पाेलिसांनी सांगितले, अंकित फुगे विकून किंवा चहाच्या दुकानावर काम करून आपला उदरनिर्वाह करताे. साेबत कुत्र्यालाही खाऊ घालताे. त्याचे नाव डॅनी ठेवले आहे. आपले वडील तुरुंगात आहेत आणि आईने त्याला साेडून दिले आहे इतकेच अंकितच्या लक्षात आहे. मुझफ्फरनगर एसएसपी अभिषेक यादव म्हणाले, अंकित पाेलिसांच्या देखरेखीखाली आहे. आम्ही त्याची आई आणि नातेवाइकांचा शाेध घेण्याचा प्रयत्न करत आहाेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.