आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिर बांधकामासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला आतापर्यंत १०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी रविवारी ही माहिती दिली. राय म्हणाले, ‘मुख्यालयाला अंतिम आकडे मिळालेले नाहीत, पण आमच्या कार्यकर्त्यांना जवळपास १०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याची माहिती मिळाली आहे.’
राम मंदिर बांधकामासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने १४ जानेवारीपासून (मकरसंक्रांत) देशात निधी जमा करण्याची औपचारिक मोहीम सुरू केली आहे. ती २७ फेब्रुवारीपर्यंत चालेल. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राम मंदिर बांधकामासाठी दिलेल्या देणगीबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राय म्हणाले, ‘त्यात काहीही चुकीचे नाही. ते भारतीय आहेत आणि भगवान श्रीराम भारताचा आत्मा आहेत. त्यामुळे रामाच्या कामासाठी कोणीही दान देऊ शकतो.’ राष्ट्रपतींनी शुक्रवारी ५ लाख १०० रुपयांची देणगी धनादेशाद्वारे दिली होती. मंदिराच्या पायाचे काम सुरू झाले आहे आणि मंदिर २०२४ पूर्वी ३ वर्षे ३ महिन्यांत पूर्ण होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.