आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 100 Crore Doses Of Corona Vaccine Completed, PM Modi Arrives At RML Hospital In Delhi And Interacts With Healthcare Workers

ऐतिहासिक:​​​​​​​कोरोना लसीचे 100 कोटी डोस पूर्ण, पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या RML रुग्णालयात पोहोचून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा आकडा आज सकाळी 9.45 वाजता पूर्ण झाला आहे. शेवटचे 20 कोटी डोस 31 दिवसात घेतले गेले आहेत. लसीचे 100 कोटी डोस पूर्ण झाल्याची घोषणा करण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे. यासाठी ट्रेन, विमाने आणि जहाजांवर लाऊडस्पीकरद्वारे घोषणा करण्याची योजना आहे. तसेच, ज्या गावांनी 100% लसीकरण पूर्ण केले आहे त्यांना सांगण्यात आले आहे की त्यांनी पोस्टर आणि बॅनर लावून आरोग्य कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 कोटी डोस पूर्ण करण्याच्या निमित्ताने दिल्लीतील राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात पोहोचले. ते येथे सुमारे 20 मिनिटे थांबले. या दरम्यान त्यांनी आरोग्यसेवकांशी चर्चा केली.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज 100 कोटी डोस पूर्ण करण्याच्या संदर्भात एक गाणे आणि एक चित्रपट लाँच करणार आहेत. हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर दुपारी 12.30 वाजता ठेवण्यात आला आहे. या गाण्यात कैलाश खेरने आवाज दिला असल्याचे सांगितले जात आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, 1400 किलोचा देशातील सर्वात मोठा तिरंगा लाल किल्ल्यावर लावण्याची अपेक्षा आहे.

असे सांगितले जात आहे की, भाजप नेत्यांना लसीकरण केंद्रांना भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यास सांगितले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा गाझियाबाद, सरचिटणीस अरुण सिंह कोईमतूर आणि सरचिटणीस दुष्यंत गौतम लखनौला जातील.

बातम्या आणखी आहेत...