आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केरळमध्ये सुरक्षादलाने शुक्रवारी एका महिला प्रवाश्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. कोझिकोड रेल्वे स्थानकावर एका महिलेकडून 100 जिलेटिनच्या कांड्या आणि 350 डेटोनेटर जप्त करण्यात आल्या आहेत. एवढे स्फोटके मिळाल्यानंतर स्फोटाचा मोठा कट रचला जात असल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान आतापर्यंत अधिकाऱ्यांनी या संबंधित कोणतेही वक्तव्य केले नाही.
निवडणूका आणि बालाकोट एअरस्ट्राइकचा संबंध जोडला जातोय
कोझिकोड रेल्वे स्थानकावर आढळलेल्या स्फोटकांचा संबंध बालाकोट एअरस्ट्राइकशी जोडला जात आहे. 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामामध्ये CRPF जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यामध्ये 40 जनाव शहीद झाले होते. यानंतर एअरफोर्सने 26 फेब्रुवारीला POK मध्ये एअरस्ट्राइक केल्यानंतर अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते. यामध्ये 400 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले होते. अशा वेळी आज बालाकोट एअरस्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाल्यावर स्फोटके सापडणे हा मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय बळावला आहे. दुसरीकडे केरळमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा वेळी याचा संबंध निवडणुकांशी देखील जोडला जात आहे.
अंबानींच्या घराबाहेर सापडल्या 20 जिलेटिनच्या कांड्या
गुरुवारी संध्याकाळीच रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घर एंटीलिया जवळ 200 मीटर अंतरावर एक संशयित SUV मधून गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी जिलेटिनच्या 20 कांड्या जप्त केल्या होत्या. या SUV च्या आत काही नंबर प्लेट मिळाल्या आहेत. यामध्ये काही नंबर अंबानींच्या सुरक्षेमध्ये लावलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटशीसंबंधीत आहेत. चौकशीदरम्यान या कारचा नंबर बनावट असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.