आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ख्रिसमस व नव्या वर्षासाठी पर्वतही सज्ज:गुलमर्ग-पहलगाममध्ये 100% हॉटेल बुक, हिमाचल-उत्तराखंडात आगाऊ बुकिंग

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाचल प्रदेशात रविवारी पुन्हा हिमवर्षाव झाला. वीकएंड असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. - Divya Marathi
हिमाचल प्रदेशात रविवारी पुन्हा हिमवर्षाव झाला. वीकएंड असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
  • कोरोना काळ अखेरच्या टप्प्याकडे जात असताना पर्यटक पर्वतांकडे आकर्षित होत आहेत

भारताचे स्वित्झर्लंड म्हटल्या जाणाऱ्या गुलमर्गच्या हॉटेल्समध्ये जागा शिल्लक नाही. अशीच स्थिती पहलगामचीही आहे. नोव्हेंबर मध्यात खोऱ्यात पहिल्यांदा बर्फवृष्टी झाली होती. त्यानंतर ख्रिसमस व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक बुकिंग करत आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर लावलेले प्रतिबंध आणि कोरोनाच्या दोन कडक लॉकडाऊनमुळे राज्याच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. मात्र, लॉकडाऊन उठवल्यानंतर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये १० हजार पर्यटक आले. हॉटेल्सना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे.

महिलांसाठी स्की कोर्ससाठी वेगळी सोय
काश्मीरचे पर्यटन संचालक निसार अहमद वाणी यांच्यानुसार गुलमर्गमध्ये हिवाळी खेळ सुरू झाले आहेत. स्की कोर्सही केले जात आहेत. जम्मू-काश्मीरचे चार आणि दुसऱ्या राज्यातील दोन गटांसाठी प्रशिक्षण सुरू होईल. दोन गट केवळ महिलांचे असतील.

हिमाचलात अटल टनल आकर्षण, उत्तराखंडात होम स्टे झाले सुरू
हिमाचल : अटल टनलचे आकर्षण, येथून रोज एक हजार गाड्यांची ये- जा

९ किमी लांब अटल टनल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. यामुळे कुलू-मनालीतही पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. लोक तीन ते चार दिवसांचे पॅकेज करून कुलूहून रोहतांग टनल जात आहेत. टनलमधून पर्यटक लाहौल-स्पिती जातात त्यामुळे तेथेही पर्यटन वाढले आहे. लाहौलचे एसपी मानव वर्मा यांच्यानुसार वीकेंड आणि इतर सुटीच्या दिवशी टनलमधून सुमारे १५०० गाड्या जातात.

उत्तराखंड : नूतन वर्षासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू, गेस्ट हाऊस ८०% बुक
डेहराडून | महामारीमुळे राज्याच्या पर्यटन महसुलात ८५% घट झाली. मात्र, डिसेंबर मध्यात पहिला हिमवर्षाव होताच पर्यटक येऊ लागले. गेल्या शनिवारी दुसरा हिमवर्षाव झाला. गढवाल मंडळ विकास परिषदेचे गेस्ट हाऊस व्यवस्थापक प्रदीप मंद्रवाल यांच्यानुसार ८०% बुकिंग वाढली आहे. मसुरी- नैनितालमध्ये ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आहे. होम स्टे संचालक रवींद्र रावत यांच्यानुसार त्यांच्याकडे बुकिंग फुल्ल झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser