आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 100% Increase In Tourism In The Jammu Kashmir After Removal Of Lockdown; Houseboats, 50% Discount In Hotels, Tourists Will Increase

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमध्ये पुन्हा लगबग सुरू:लॉकडाऊन हटवल्यावर राज्यातील पर्यटनात 100 % वाढ; हाऊसबोट, हॉटेलमध्ये 50% सूट, पर्यटक वाढणार

मुदस्सिर कुलू |श्रीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही आहेत पृथ्वीच्या स्वर्गावरील नवीन पर्यटनस्थळे

पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरात काश्मीरने दाेन लाॅकडाऊन अनुभवले आहेत. पहिला कलम ३७० हटवल्यानंतर व दुसरा काेविड -१९ नंतरचा. काश्मीरमधील हिरवागार निसर्ग, हिमाच्छित पर्वत पुन्हा एका पर्यटकांना खुणावू लागले आहेत. राज्याच्या पर्यटन विभागाने दिलेली आकडेवारीही तीच साक्ष देत आहे. विभागाच्या मते गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबरमध्ये ४३ हजार पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली. या वर्षी आॅगस्टमध्ये १६ हजार पर्यटकच काश्मीरमध्ये येऊ शकले. पण लाॅकडाऊन हटवल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ६ हजारांपेक्षा जास्त पर्यटक आले. लाॅकडाऊन हटवल्यावर पर्यटनात १०० % वाढ झाल्याचे हे द्याेतक आहे. पर्यटन अधिकाऱ्यांच्या मते नोव्हेंबरमध्ये १० हजारांपेक्षा जास्त लोक येण्याची शक्यता आहे. हाऊसबॅट मालक बशीर अहमद म्हणाले, पर्यटकांना ५० % सूट दिली आहे. हॉटेल मालक ३० ते ५० % सूट देत आहेत. गुलमर्गच्या हॉटेल मालकांच्या मते सध्या ३० % हाॅटेल भरलेली आहेत. नाेव्हेंबरअखेरपर्यंत हाॅटेल व हाऊसबाेट ५०% पर्यंत भरण्याचा अंदाज आहे.

ही आहेत पृथ्वीच्या स्वर्गावरील नवीन पर्यटनस्थळे

> दक्सुम : दक्सुम दक्षिण काश्मीरमधील अछबल येथे मुघल गार्डनच्या पुढे भृंगी नदीच्या खाेऱ्यात समुद्रसपाटीपासून २,४३८ मीटर उंचीवर आहे.

> दूधपाथरी : हे ‘व्हॅली ऑफ मिल्क’ समुद्रसपाटीपासून २,७३० मीटरच्या उंचीवर आहे. येथे नद्या व झऱ्यांचे पाणी दुधासारखे दिसते.

> काेलाहाय : हे हिमनदीसाठी प्रसिद्ध आहे. ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे. प्रदूषणमूक्त काेलाहायमध्ये नीरव शांततेचा अनुभव मिळताे.