आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 100 Kg Heroin And 5 Pistols Found From The Boat From Pakistan, 6 People From Sri Lanka Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोस्ट गार्डची मोठी कारवाई:पाकिस्तानातून आलेल्या बोटीत सापडले 100 किलो हेरोइन आणि 5 पिस्तुल, 6 जण ताब्यात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच बोटीतून हेरॉइनचा साठा जप्त करण्यात आला आहे. - Divya Marathi
याच बोटीतून हेरॉइनचा साठा जप्त करण्यात आला आहे.

इंडियन कोस्ट गार्डने तमिळनाडुच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका बोटीतून ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला. पाकिस्तानातून आलेल्या श्रीलंकेच्या या बोटीतून 100 किलो हेरोइन आणि सिंथेटिक ड्रग्सचे 20 पॅकेट आढळले. याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 5 पिस्तुल आणि सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आला आहे.

अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले की, क्रू मेंबरची चौकशी सुरू आहे. त्यांना ही हिरोइन कराचीतून दिल्याचे त्यांनी कबुल केले आहे. हे ड्रग्स बोटीत रिकाम्या टँकमध्ये लपवण्यात आले होते. बोटीचा मालक श्रीलंकेच्या नेगोम्बोचा रहिवासी आहे.

सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू

इंडियन कोस्ट गॉर्ड 17 नोव्हेंबरपासून समुद्रातून होणाऱ्या तस्करी विरोधात मोठे अभियान चालवत आहे. यादरम्यान गस्त घालणाऱ्या 'वैभव' जहाजाने ही मोठी कारवाई केली. कोस्ट गार्डकडून सांगण्यात आले आहे की, सर्व तपास सुरक्षा यंत्रणांकडून अटक केलेल्या सहा जणांची चौकशी सुरू आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser