आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 100 Leaders Wrote Letters To Sonia Gandhi To Change The Leadership; Claim Of A Suspended Congress Leader

लीडरशिपमुळे पक्षात नाराजी ?:नेतृत्वात बदल करण्यासाठी 100 नेत्यांनी सोनिया गांधींना लिहीले पत्र; काँग्रेसच्या निलंबित नेत्याचा दावा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे निलंबित नेते संजय झा यांनी सोमवारी पक्ष नेतृत्वाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, पक्षातील 100 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे. परंतू, झा यांच्या दाव्याचे पक्षाकडून खंडन करण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, फेसबुक-भाजप लिंकवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी हे प्रकरण आणले जात आहे.

संजय झा यांचा दावा

संजय झा यांनी ट्वीट करुन सांगितले की, पक्षातील 100 नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना एक पत्र लिहीले आहे, ज्यात पॉलिटिकल लीडरशिप बदलण्याची मागणी केली आहे. पत्रात काँग्रेस वर्किंग कमेटी (सीडब्ल्यूसी) मध्ये पारदर्शी निवडणुका करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे सर्व पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे नाराज आहेत. झा यांच्या दाव्यानुसार पत्र लिहण्यामध्ये काही खासदारांचाही समावेश आहे.

‘भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत’

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी असे कोणतेही पत्र असल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, भाजप-फेसबुक लिंकवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी केले जात आहे. काही नेते भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...