आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 100 Percent Audience In Cinemas From Today; Sanitization After Each Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटगृहांसाठी एसओपी जारी:आजपासून चित्रपटगृहांत 100 टक्के प्रेक्षक; प्रत्येक शोनंतर सॅनिटायझेशन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटगृहे १ फेब्रुवारीपासून १००% प्रेक्षक क्षमतेसह सुरू राहू शकतील. केंद्राने त्याबाबतचे दिशानिर्देश जारी केले. दोन मीटर अंतराचा नियम लागू करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल.

एसी/कूलिंग
- चित्रपटगृह आणि कॉमन एरियात तापमान २४ ते ३० अंश सेल्सियसदरम्यान ठेवावे लागेल.
- चित्रपटगृहात आर्द्रता ४० ते ७०% यादरम्यान राहील याची खबरदारी घ्यावी लागेल. क्रॉस व्हेंटिलेशनही आवश्यक असेल.
पण

बुकिंग/पेमेंट
- तिकीट आणि खाण्यापिण्यासाठी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन द्यावे लागेल. क्यूआर कोड अनिवार्य असेल.
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शक्य व्हावे यासाठी फोन नंबर घेतले जातील. बुकिंग काउंटर दिवसभर खुले ठेवावे लागतील.

दोन मीटरचे अंतर
- पार्किंग एरिया ते हॉलपर्यंत दोन मीटर अंतराचे पालन करण्यासाठी मार्किंग. लिफ्टमध्ये संख्या मर्यादित असेल.
- इंटरव्हल दीर्घकाळ असेल. यादरम्यान सर्व लोकांना एकत्र कॉमन एरियात येण्यापासून रोखावे लागेल.

सॅनिटायझेशन
- प्रत्येक शोनंतर हाॅल सॅनिटाइझ करावा लागेल. टॉयलेट/कॉमन एरियासाठीही हाच नियम राहील. {‘प्रेक्षकांनी काय करावे, काय करू नये’चे बोर्ड हॉलच्या आत आणि बाहेर ठिकठिकाणी लावावे लागतील.

एंट्री/एक्झिट पॉइंट
- प्रेक्षकांचे थर्मल स्क्रीनिंग आवश्यक. खोकला-सर्दी-ताप असल्यास प्रवेश नाही. वेगवेगळ्या रांगा.
- एंट्री गेटशिवाय ठिकठिकाणी टच फ्री हँड सॅनिटायझरची व्यवस्था असेल. हॉलमध्येही अनिवार्य.

- जर एखादे चित्रपटगृह कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर ते पूर्वीप्रमाणेच बंद ठेवण्यात येईल.