आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 100 Types Of Sweets Offered To 7 year old Lord Bal Shrikrushna At Nathdwara In Rajasthan Today News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:राजस्थानातील नाथद्वारात 7 वर्षीय भगवान बाल श्रीकृष्णाला आज 100 प्रकारच्या मिष्टान्नांचा नैवेद्य, रात्री 12 वाजता तोफांची 21 वेळा सलामी

जयपूर/राजसमंद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोड आलेल्या मुगाचा नैवेद्य दाखवले जाणारे देशातील एकमेव श्रीकृष्ण मंदिर, ऋतूनुसार असतात विविध पदार्थ

कृष्ण जन्माष्टमीला पंजिरी, पंचामृत असा प्रसाद तर प्रत्येक मंदिरात असतो. पण राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिर असे एकमेव आहे, जेथे दोन दिवसीय जन्मोत्सव आणि नंदोत्सवादरम्यान १०० पेक्षा जास्त पदार्थांचा नैवेद्य दाखवला जाईल. येथे वर्षभर रोज ३५ ते ४० प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य असतो. भगवान श्रीकृष्ण ७ वर्षांच्या बालरूपात आहेत. त्यामुळे येथील नैवेद्य सेवा वेगळी आहे. हे एकमेव श्रीकृष्ण मंदिर आहे, जेथे जन्माष्टमीला मध्यरात्री दोन तोफांनी २१ वेळा सलामी देऊन जन्माचा आनंद साजरा केला जातो.

दुसऱ्या दिवशी नंदोत्सवात भाविकांसोबत होळी खेळली जाते. तीत अनेक क्विंटल केसरमिश्रित दूध-दही वापरले जाते. दोन दिवसांच्या महोत्सवात गुजरात, महाराष्ट्रासह देशभरातील हजारो भाविक येतात. येथे देवाला कधी मोड आलेले मूग-चवळी तर कधी लोणचे, मुरब्बा, गोड दशमी-भाजी, वेग‌वेगळ्या प्रकारचे भात, मनुकांची कोशिंबीर, खवा-दुधाच्या मिठाया, जिरे भात, वरण-भात, तुपात तळलेला सुका मेवा, बदाम, मनुकांच्या मिठायांचा नैवेद्य दाखवतात.

येथील पदाधिकारी सुनील भाटिया यांनी सांगितले की, महाप्रभूंच्या आज्ञेनुसार अनेक वर्षांपासून मंदिरात नैवेद्य, सेवेची जी पद्धत ठरवण्यात आली होती, तिचे आजही पालन केले जाते. ऋतूनुसार नैवेद्यात बदल होतो. हिवाळ्यात सुंठ, केशर, खवा यांची मिठाई, मुगाच्या डाळीचा शिरा, तुपात तळलेल्या बदामाचा शिरा असा नैवेद्य असतो, तर उन्हाळ्यात थंड रबडी, श्रीखंड, आमरस असतो. जन्माष्टमी-नंदाेत्सवात केशरमिश्रित रबडी-घेवर, मलईची बासुंदी, पाच प्रकारचा भात, केशरी पेढा, जिलेबी, खव्याची बाटी, फळांचा रस, श्रीखंड असा नैवेद्य असतो.

द्वारकेतील जगतमंदिरात जन्मोत्सवानंतर रात्री अडिच वाजता विशेष नैवेद्य
गुजरातच्या द्वारकेत सोमवारी ३.५० लाख श्रद्धाळू येण्याची आशा आहे. महोत्सव सकाळी ६ वा. सुरू होईल. रात्री १२ वा. श्रद्धाळूंच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा होईल. रात्री २.३० वा. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष नैवेद्य असेल.

मथुरेतील ७५० हॉटेल, १० हजार सदनिका भरल्या, २० टन मिठाई विक्री होण्याचा अंदाज
बृज मंडळात उत्साह आहे. सोमवारी रात्री भगवान श्रीकृष्ण अवतार घेतील. रात्री १२.०५ वा. भक्तांना श्रीकृष्णाच्या बाल रूपाचे दर्शन होईल. श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराच्या गर्भगृहाला कारागृहाचे रूप देण्यात आले आहे. जन्माभिषेक चांदीच्या शंखाने होत असतो. हा प्राचीन शंख जन्माष्टमीच्या दिवशीच वापरला जातो. मथुरा- वृंदावन भाविकांनी भरले आहे. ७५० हॉटेल, धर्मशाळा व गेस्ट हाउससह १० हजारापेक्षा जास्त सदनिका भरल्या आहेत. श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे सचिव कपिल शर्मा यांच्यानुसार, राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्लीहून २५ लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याचा अंदाज आहे. जन्माष्टमीच्या दिवशी होणाऱ्या वृंदावनच्या बांकेबिहारी मंदिरात मंगलाचे दर्शन रात्री १.५५ वाजता होईल.

बातम्या आणखी आहेत...