आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन दिवसांपासून आरक्षणासाठी सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. शुक्रवारी राज्यात हिंसाचाराची एकही मोठी घटना घडली नाही. कर्फ्यू कायम आहे. इंटरनेटही बंद आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पुन्हा मुख्यमंत्री बीरेन सिंह व प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मणिपूरच्या स्थितीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय म्हणाले, मणिपूरमध्ये घटनेचे कलम ३५५ लागू करण्यात आलेले नाही.
राज्यात लष्कराचे १० हजार जवान तैनात आहेत. सर्वाधिक प्रभावित चूराचांदपूरमध्ये आरएएफच्या ५ तुकड्या सज्ज आहेत. सीआरपीएफ व बीएसएफच्या १० तुकड्या दंगलरोधक वाहनांसह शुक्रवारी मणिपूरला पोहोचल्या. मणिपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रोखल्या आहेत. मेघालय पोलिसांनी कुकी व मैतेई समुदायाच्या १६ लोकांना अटक केली आहे. एका वृत्तानुसार, हिंसाचारात १२ लोकांचा मृत्यू झाला. तर १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
कोब्रा कमांडो आणि आयकर अधिकाऱ्याची हत्या
चुराचांदपूर जिल्ह्यातील एका गावात सीआरपीएफचा कोब्रा कमांडो चोंखोलेन हाओकिपची गोळी घालून हत्या करण्यात आली. तो सुट्यांमध्ये आला होता. तर इम्फाळमध्ये कार्यरत आयकर अिधकारी लेमिनथांग हाओकिप यांचीही सरकारी निवासस्थानातून बाहेर काढत बेदन मारहाण करत हत्या करण्यात आली. भारतीय महसूल सेवा संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. तथापि, मणिपूरचे डीजीपी पी. डोंगल म्हणाले, समाजकंटकांनी एका ठाण्यातून शस्त्रे लुटली. त्यांना दारूगोळा परत करण्यास सांगितले आहे.
डोंगराळ भागात गोळीबार : राज्याच्या डोंगराळ भागात आश्रय घेतलेले अतिरेकी व सुरक्षा दलांमध्ये शुक्रवारी पहाटे गोळीबार झाला. ते कोणत्या संघटनेचे आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.