आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या विमानांमध्ये बिघाड:गुजरातमध्ये अडकून पडले 10,000 अनिवासी भारतीय

अहमदाबाद / भाविन पटेल8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने एनआरआयचे हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड आणि कर्मचाऱ्यांच्या (क्रू) कमतरतेमुळे अहमदाबाद-मुंबईमार्गे अमेरिकेला जाणारी उड्डाणे रद्द होत आहेत. यामुळे सुट्या घालवण्यासाठी किंवा लग्न सोहळ्यासाठी आलेले १० हजार एनआरआय गुजरातमध्ये अडकले आहेत. तथापि, रद्द उड्डाणांतील प्रवाशांना मुंबईहून न्यूयार्क किंवा दिल्ली ते शिकागे कनेक्टिंग तिकिट देण्याची ऑफर एअर इंडिया देत आहे.

एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप काही दिवस ही स्थिती राहू शकते. आम्ही प्रवाशांना पूर्ण रिफंड किंवा त्यांच्या सोयीनुसार सवलत देत आहोत. एअर इंडियाची फ्लाइट रद्द झाल्यास तिकिट ऑटो जनरेट करत इतर तारखांमध्ये रि-शेड्युल करत आहोत. प्रवाशांना रि-शेड्युलमध्ये सवलत न मिळाल्यास आम्ही ठराविक मार्गावर फ्लाइट ओपन झाल्यानंतर तिकिट त्यामध्ये ट्रान्सफर करण्यास मदत करत आहोत.

इतर कंपन्यांकडून भाडेवाढ, एका मार्गाचे तिकिट एक लाख : एअर इंडियाच्या अमेरिकेतील अनेक शहरांची उड्डाणे रद्द झाल्याचा फायदा इतर विमान कंपन्या घेत आहेत. कंपन्यांनी मार्चचे शिल्लक दिवस आणि एप्रिलमध्ये अमेरिकेच्या प्रवासासाठी एका मार्गाचे दर वाढवले आहेत. ते एक लाख रुपयांपर्यंत आकारले जात आहे. इमर्जन्सीत प्रवास करणाऱ्यांना यापेक्षाही जास्त महाग तिकीट खरेदी करावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...