आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 10,492 Cases So Far: Railways Also Said After Lock Down Increased In The Country No Trains Will Run Till May 3

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:आतापर्यंत 10 हजार 956 प्रकरणे: देशात लॉकडाउन वाढल्यामुळे रेल्वे, बस आणि विमान सेवाही 3 मेपर्यंत बंद

नवी दिल्ली एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 27 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेशांमध्ये पसरले संक्रमण

देशात कोरोना संक्रमणाची वाढती प्रकरणे पाहता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर काही वेळाने रेल्वेनेदेखील सांगितले की, लॉकडाउनदरम्यान देशभरात ट्रेन चालणार नाही. मालगाड्या चालत राहतील.

मंगळवारी महाराष्ट्र 121, मध्यप्रदेश 93, राजस्थान 48, गुजरात 46, पश्चिम बंगाल 38, आंध्रप्रदेश 34, जम्मू-काश्मीर13 आणि ओडिशामध्ये 1 रुग्ण सापडला. हे आकडे covid19india.org वेबसाइट आणि राज्य सरकारच्या आकड्यानुसार आहे. तसेच आरोग्या मंत्रालयानुसार, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशात 10 हजार 363 लोक संक्रमित आहेत. यांपैकी 8 हजार 988 लोकांचे उपचार सुरु आहेत. 1035 बरे झाले आहेत आणि 339 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

नौसेनेने रुग्णांना दुसऱ्या शहरात शिफ्ट करण्यासाठी पॉड बनवला

भारतीय नौसेनेच्या कोच्चीमधील दक्षिण कमांडने एअर इवॅक्युशन पॉड तयार केला आहे. हे कोरोनाच्या रुग्णांना एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर नेण्यास मदत करेल. यामुळे संक्रमणाचा धोकाही कमी होईल.

पाच दिवस जेव्हा संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणे आली होती... 

दिवस - रुग्ण 

13 एप्रिल     - 1242

10 एप्रिल     - 871

11 एप्रिल     - 854

09 एप्रिल     - 813

12 एप्रिल     - 758

27 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेशांमध्ये पसरले संक्रमण..... 

कोरोना व्हायरस आतापर्यंत देशातील 27 राज्यांमध्ये पसरला आहे, तसेच देशाच्या 7 केंद्र शासित प्रदेशात (यूटी) देखील हे संक्रमण पोहोचले आहे. यामध्ये दिल्ली, चंदीगड, अंदमान-निकोबार, दादरा आणि नगर हवेली, जम्मू-कश्मीर, लद्दाख आणि पुडुचेरी सामील आहेत. 

बातम्या आणखी आहेत...