आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 109 Proposals To Run Private Railways, Initially Targeting Rs 30,000 Crore Investment News

ग्रीन सिग्नल:109 खासगी रेल्वे चालवण्यासाठी प्रस्ताव, प्रारंभी 30 हजार कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याचा रेल्वेचा उद्देश

रेल्वेने खासगीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. रेल्वे मंत्रालयाने १०९ जोडी खासगी रेल्वे चालवण्यासाठी रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशन (आरएफक्यू) मागवले आहे. याचा प्रारंभ १५१ आधुनिक रेल्वेने होईल. संपूर्ण देशात रेल्वेच्या या जाळ्याला १२ क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. याच क्लस्टरमध्ये खासगी रेल्वे धावतील.

प्रत्येक रेल्वे किमान १६ डब्यांची असेल. याचा वेग जास्तीत जास्त ताशी १६० किमी असेल. या रेल्वेंचा रोलिंग स्टॉक खासगी कंपन्या खरेदी करतील. या रेल्वेंची देखरेख त्याच कंपन्या करतील. रेल्वे या गाड्यांसाठी केवळ चालक आणि गार्ड पुरवणार आहे. यात प्रारंभी खासगी गुंतवणुकीचे लक्ष्य ३० हजार कोटी रुपयांचे ठेवण्यात आले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याचा रेल्वेचा उद्देश

आधुनिक तंत्रज्ञान लागू करणे या यामागील उद्देश आहे. यामुळे देखभाल-दुरुस्तीचा भार कमी होऊ शकेल. शिवाय ट्रान्झिट टाइमही कमी होईल. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. शिवाय रेल्वे सुरक्षा अधिक भक्कम होईल आणि प्रवाशांना एक विश्वासपात्र प्रवासाचा अनुभव येईल.    

0