आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 11 COVID 19 Patients Die In Andhra Pradesh Hospital Due To Problem In Oxgen Supply

आंध्र प्रदेशातील घटना:ऑक्सिजन सिलेंडर रिलोड करण्यात 5 मिनीटांचा उशीर, 11 रुग्णांचा मृत्यू

तिरुपतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी चौकशीचे आदेश दिले

आंध्र प्रदेशातील एका हॉस्पिटलच्या ICU वार्डात ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटना सोमवारी रात्री तिरुपतीमधील रुइया गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घडली. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या लिसिप्रियाने या घटनेनंतर रुग्णालयात उडालेल्या गोंधळाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर असलेले रुग्ण दिसत आहेत.

चित्तूरचे जिल्हा कलेक्टर एम हरी नारायणन यांनी सांगितले की, ऑक्सिजन सिलेंडर रिलोड करण्यात 5 मिनीटांचा उशीर झाला. या कारणामुळे रुग्णांना श्वास घेता आला नाही आणि यात 11 रुग्णांनी जीव गमावला.

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा मोठा साठा

त्यांनी पुढे सांगितले की, रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा साठा आहे. फक्त रिलोड करण्यात उशीर झाल्यामुळे ही घटना घडली. या रुग्णालयात ICU आणि ऑक्सिजन बेडवर 700 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...