आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरातमध्ये बडोद्यात ट्रक आणि कंटनेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 लोकांचा जागीच मृत्यू झाला. तब्बल 16 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. बडोद्यातील वाघोडीया क्रॉसिंग हायवेजवळ ही घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. हे लोक सूरतहून पावागड दर्शनासाठी निघाले होते. जखमींना तातडीने वडोदरा इथल्या एसएसजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील वाघोडिया चौक जवळ हा अपघात झाला. जखमींना बडोदा येथील एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातावेळी सर्व ट्रक प्रवासी झोपले होते. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अपघातानंतर महामार्गावर लांबच वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच डीएम-एसडीएम व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश दिले
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्वीट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी अशी प्रार्थना केली आहे. तसेच त्यांनी गरजूंना मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Saddened by the loss of lives due to a road accident near Vadodara. Instructed officials to do needful. May those who have been injured recover at the earliest. I pray for the departed souls.
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) November 18, 2020
Om Shanti...
सूरतच्या वराछा परिसरातील आणि पूणा गावातील रहिवासी होते
मिळालेल्या माहितीनुसार अपघात झालेले लोक सूरतच्या वराछा आणि पूणा परिसरात राहणारे होते. सूरतमध्येच कुटुंब हिरे आणि टेक्सटाइलच्या फॅक्ट्रीमध्ये नोकरी करायचे. सर्व लोक रात्री जवळपास 11 वाजता वडोदरा जवळील प्रसिद्ध शक्तिपीठ पावागडच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. रात्री जवळपास 3 वाजता हा अपघात झाला, तेव्हा सर्व लोक गाढ झोपेत होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.