आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 11 Lakh 97 Thousand 500 Rupees Worth Of Oxygen Is Obtained From A Tree In 50 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाड तोडल्यामुळे 1.21 कोटींचा दंड:50 वर्षात एका झाडापासून 11 लाख 97 हजार 500 रुपयांचा ऑक्सिजन मिळतो, झाडांचे महत्त्व समजावे यासाठी लावला मोठा दंड

रायसेन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात ऑक्सिजन संकट लोकांच्या जीवावर बेतले आहे. तरीही लोकांना झाडांचे महत्त्व लक्षात येत नाहीये. ही परिस्थिती लक्षात घेत मध्यप्रदेशच्या सिंघोरी वन अभयारण्यमध्ये दोन झाडे तोडणाऱ्या एक आरोपी छोटेलालवर बम्होरी वन विभागाने 1 कोटी 21 लाख 7 हजार 700 रुपयांचा दंड लावला आहे. ही दोन्ही झाडे सागवानाची होती.

वन विभागाने ही वन संपदा सांगून एक झाडाचे वय 50 वर्ष मानून दंडाचे कॅल्क्युलेशन केले आहे. याच आरोपीने या वर्षात जानेवारी महिन्यात अभयारण्यातील बीट पहरिया भागात सागवानाची दोन झाडे तोडली होती. तेव्हापासून हा आरोपी फरार होता.

एक झाड 50 वर्षात आपल्याला काय-काय देते, या आधारावर दंड
बम्हौरी वन क्षेत्राचे अधिकारी महेंद्र कुमार पचेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायरेक्टर जनरल इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट ट्री रिसर्च अँड एज्युकेशननुसार एका झाडाचे वय 50 वर्ष असते. 50 वर्षात एक झाड 52 लाख 400 रुपयांची सुविधा प्रदान करते.

यामध्ये 11 लाख 97 हजार 500 रुपयांचे ऑक्सिजन आहे, जे झाडापासून मिळते. हेच ऑक्सिजन प्राणवायूचे काम करते. एवढ्या वर्षात हेच एक झाड 23 लाख 68 हजार 400 रुपयांचे वायू प्रदूषण नियंत्रित करते. यासोबतच 19 लाख 97 हजार 500 रुपयांचे भूक्षरण नियंत्रण करते. इतरही काही फायदे देऊन आपल्याला अशाप्रकारचे एक झाड 50 वर्षात 52 लाख 400 रुपयांचा फायदा मिळवून देते.

सध्या कोर्टात आहे प्रकरण
यामुळे छोटेलालवर सागवानाची दोन झाडे तोडल्यामुळे 1 कोटी 21 लाख 7 हजार 700 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. साधा हे प्रकरण कोर्टात आहे. यासोबतच झाड तोडल्यामुळे झालेल्या नुकसानाच्या आधारावर कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...