आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैन्य भरतीच्या 'अग्निपथ' योजनेवरुन देशातील 11 राज्यांत तणाव निर्माण झाला आहे. केंद्राने शुक्रवारी या योजनेतील वयोमर्यादेत वाढ करण्याची घोषणा केली. पण, त्यानंतरही हिंसाचार शमला नाही. उत्तर प्रदेश, बिहार व तेलंगात निदर्शकांनी रेल्वेंची जाळपोळ केली. अनेक ठिकाणी रस्ते व रेल्वे रोको करण्यात आला. या हिंसक आंदोलनामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे.
तेलंगणातील सिकंदराबाद येथे रेल्वे बोगी पेटवून देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्या डब्यातील सर्व 40 प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. प्रवाशांत काही लहान मुलांचाही समावेश होता.
फिरोजाबादेत आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर 4 बसेसची तोडफोड करुन चक्का जाम करण्यात आला. हरियाणातील नारनौलमध्येही तरुणांनी रास्ता रोको केला. तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरही जाळपोळ व तोडफोड करण्यात आली. येथे झालेल्या हिंसक निदर्शनांत एकाचा मृत्यू झाला. दुसरा मृत्यू बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात झाला.
L&T मेट्रो रेल लिमिटेड हैदराबादने एका ट्विटद्वारे शहरातील अनागोंदीमुळे तिन्ही मेट्रो मार्ग पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली.
राजस्थानातील भरतपूर जंक्शन रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी एका पोलिसांना रक्तबंबाळ केले. आंदोलनाचा 200 रेल्वेंच्या वेळापत्रकाला फटका बसला. देशभरातील 35 रेल्वे पूर्णतः रद्द करण्यात आल्या, तर 13 अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
यूपीच्या बलियात पहाटे 5 वाजल्यापासून निदर्शने सुरू झाली. येथे अनेक वाहनांचे काच फोडण्यात आले. पोलिसांनी एका दंगेखोराला ताब्यात घेतले आहे.
अग्निपथविरोधी आंदोलनातील 4 मोठे अपडेट्स
लष्करप्रमुख म्हणाले- 2 दिवसांत अधिसूचना
अग्निपथ योजनेवरुन अवघ्या देशात रान पेटले असताना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अग्निवीरांच्या भरतीसाठी येत्या 2 दिवसांत अधिसूचना काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 'अग्निवीरांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल. पुढील 2 दिवसांत joinindianarmy.nic.in वर अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर आमची सैन्य भरती संस्था नोंदणी आणि रॅलीचे तपशीलवार वेळापत्रक जारी करेल,' असे ते म्हणाले. भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी 24 जूनपासून हवाई दलासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.