आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 11 Variants Of Omicron Found In Foreign Passengers, 124 Passengers From Abroad Infected With Corona

कोरोना:परदेशी प्रवाशांत सापडले ओमायक्रॉनचे 11 व्हेरिएंट, परदेशाहून आलेले 124 प्रवासी कोरोनाबाधित

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२४ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत परदेशाहून आलेले १२४ प्रवासी कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यात ओमायक्रॉन विषाणूचे ११ सब व्हेरिएंट आढळले.

विमानतळ, बंदरावर एकूण १९ हजार २२७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची या कालावधीत कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १२४ प्रवासी कोरोनाबाधित आढळले त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. १२४ प्रवाशांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्या

मध्ये १४ नमुन्यांमध्ये एक्सबीबी आणि एका नमुन्यात बीएफ.७.४.१ हे विषाणू आढळले. परंतु कोरोनाचे हे सबव्हेरिएंट भारतात पूर्वीपासूनच आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...