आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 11 Year Old 'Tamanna' Was Sitting Behind The Driver's Seat, When The Window Peeped The Truck Blew His Head, Death, The Truck Driver Absconded

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू:उलटी करण्यासाठी बसच्या खिडकीतून बाहेर काढले डोके, ट्रकच्या धडकेने क्षणार्धात शरीरापासून वेगळे झाले शिर

खंडवा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई आणि मोठ्या बहिणीसह नातेवाईकाच्या लग्नात जात होती
  • खंडवाजवळ इंदौर-इच्छापूर मार्गावर हा अपघात झाला

मध्य प्रदेशातील इंदूर-इच्छापूर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 वर्षांची तमन्नाचे शिर धडापासून वेगळे झाले. देशगाव चौकीच्या रोशिया फाट्याजवळ ही घटना घडली. बसमध्ये बसलेल्या मुलीने उलट्या करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकच्या जोरदार धडकेने तिचे शिर कापले गेले. यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला.

देशगाव चौकी प्रभारी रमेश गवले यांनी प्रभात सेवेची बस मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास खंडवा येथून सोडली व रोशिया फाट्यासमोर काश्मिरी नाल्याजवळ पोहचली तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकने नाल्यावरील बस क्रॉस करण्यास सुरुवात केली. इतक्यात ट्रक बसच्या एकदम जवळून बाहेर निघाला. यावेळी बसमध्ये मागे बसलेल्या तमन्नाचे डोके खिडकीच्या बाहेर होते, ट्रकची धडक तमन्नाच्या डोक्याला बसली आणि तिचे डोके धडापासून वेगळे होऊन रस्त्यावर पडले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि ट्रक ताब्यात घेतला आहे.

नातेवाईकाच्या लग्नात जात होती
तमन्नाच्या काकूने सांगितले की मुलगी नातेवाईकाच्या लग्नात आई आणि मोठ्या बहिणीबरोबर होती. त्यांनी सांगितले की तमन्नाला सायकल चालवण्याची आवड होती. खांडवाच्या बंगाली कॉलनीतील गल्ली क्रमांक -3 मध्ये तमन्नाचे कुटुंब राहते. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नाही. तमन्नाचे वडील हैदर कृषी उत्पन्न बाजारात हमाली करतात आणि आई लोकांच्या घरांमध्ये झाडू-पोछा करते.

वडिलांना तमन्नाला अधिकारी बनवायचे होते
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार तमन्ना आणि तिची बहीण रुबीना एकत्र शाळेत जात असत. तमन्ना परदेशीपुरा येथील पाणी कार्यालयातील शाळेत सहावीत शिकत होती. परिसरातील या दोन बहिणीच शाळेत जातात आणि बाकीच्या मुली मदरशामध्ये शिकत होत्या. तमन्नाच्या वडिलांना तिला शिकवून अधिकारी बनवायचे होते.

बातम्या आणखी आहेत...