आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • 110 Crore People Worldwide Smoke, China Ranks First And India Second, An Increase Of 15 Crore In 30 Years; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:जगभरात 110 कोटी लोक करतात धूम्रपान, चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर, 30 वर्षांत 15 कोटींची भर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 204 देशांत अभ्यास, 12 देशांत धूम्रपान करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ

जगभरात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या ११० काेटींवर गेली आहे. ही संख्या गेल्या ३० वर्षांत वेगाने वाढतेय. १९९० नंतर जगभरात १५ काेटी एवढी धूम्रपान करणाऱ्यांची भर पडली. प्रत्येकी पाच पुरुषांपैकी एकाचा धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे हाेत आहे. एका नव्या अभ्यासात ही बाब समाेर आली आहे. संशाेधकांनी २०४ देशांतील आकड्यांचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. जागतिक आराेग्य संघटनेच्या दृष्टीने हा आकडा १३० काेटींहून जास्त आहे. धूम्रपान संपवण्यासाठी व्यापक पातळीवर हाेणारे प्रयत्न त्यामुळे किती ताेकडे आहेत हे स्पष्ट झाले. कारण दरवर्षी धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. हे व्यसन असलेल्यांमध्ये तरुण वर्ग माेठा आहे.

धूम्रपानाबद्दल जनजागृती करताना सरकारने तरुण वर्गावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यात ८९ टक्के २५ वर्षांपर्यंतचे आहेत. अभ्यास प्रकल्पाच्या प्रमुख मॅरिसा रेटस्मा म्हणाल्या, जगभर तरुणांना व्यसन जडलेले दिसते. २०१९ मध्ये सुमारे ८० लाख लाेकांचा धूम्रपानामुळे मृत्यू झाला. धूम्रपानातून हृदयराेगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० लाख ७० हजारांवर आहे.

श्वासनलिका, फुप्फुसाचा कर्कराेग इत्यादींमुळे १० लाख ३० हजार लाेकांचा मृत्यू झाला. हृदयाघातामुळे सुमारे १० लाख लाेकांचा मृत्यू झाला. गेल्या तीन दशकांत धूम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. बारा देशात ही स्थिती आहे. सिगारेट पिणाऱ्या लाेकसंख्येपैकी दाेन तृतीयांश १० देशांत आहेत. त्यात चीन, भारत, इंडाेनेशिया, अमेरिका, रशिया, बांगलादेश, जपान, तुर्की, व्हिएतनाम, फिलिपाइन्सच्या नावाचा समावेश आहे. प्रत्येकी तीनपैकी एक व्यक्ती धूम्रपान करणारी आढळून येते.

टॉप 5 देश, चीनमध्येही धूम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या जास्त

पुरुष

 • चीन 31.81 कोटी
 • भारत 11.58 कोटी
 • इंडोनेशिया 5.8 कोटी
 • रशिया 2.59 कोटी
 • बांगलादेश 2.5 कोटी

महिला

 • चीन 2.32 कोटी
 • अमेरिका 2.01 कोटी
 • भारत 1.49 कोटी
 • रशिया 90 लाख
 • फ्रान्स 76 लाख

बातम्या आणखी आहेत...