आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन फ्रॉड:हैदराबादमध्ये 1100 कोटींच्या ऑनलाइन गॅम्बलिंग रॅकेटचा भांडाफोड, चीनी नागरिकासह चौघे ताब्यात

हैदराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादमध्ये 1100 कोटी रुपयांच्या ऑनलाइन गॅम्बलिंग रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी एका चीनी नागरिकासह चौघांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी या चौघांना दिल्लीतून ताब्यात घेतले आणि गुरुवारी सायंकाळी हैदराबादमध्ये आणले.

या रॅकेटला एक चीनी कंपनी चालवत होती. हैदराबादचे पोलिस कमिश्नर अंजनी कुमार यांनी सांगितले की, दोघांनी एका ऑनलाइन गॅम्बलिंग बेवसाइटविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांचा आरोप होता की, वेबसाइटने त्यांना 97 हजार आणि 1 लाख 64 हजार रुपयांचा गंडा घातला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि यात चीनी कंपनीचा हात असल्याचे समोर आले.

तीन भारतीय ई-वॉलेट कंपनीचे डॉयरेक्टर्स आहेत

पोलिसांनी चीनी नागरिक या हाओला ताब्यात घेतले. हा Linkyun अॅपचा साउथ ईस्ट एशियाचा ऑपरेशन हेड आहे. तसेच, त्याचे साथीदार धीरज सरकार, अंकित कपूर आणि नीरज तुली दिल्लीतील ई-वॉलेट कंपनी डूकीपेचे डायरेक्टर्स आहेत.

ऑनलाइन गॅम्बलिंग चायनीज गेमिंग कंपनी 'बीजिंग टी पॉवर कंपनी'च्या माध्यमातून केली जात होती. यासाठी वेगवेगळ्या कंपन्या बनवल्या होत्या. पोलिसांनी आतापर्यंत 1100 कोटींच्या ट्रांजेक्शनचा खुलासा केला आहे. यातील अनेक ट्रांजेक्शन लॉकडाउनदरम्यान झाले.

तपासात समोर आले की, बीजिंग टी पावर नवीन कंपनी बनवते. रिफ्रेंसशी संबंधित मेंबर्सद्वारे ऑनलाइन गॅम्बलिंग केली जाते. पेमेंट वेगवेगळ्या ई-पेमेंट गेटवेजद्वारे केले जाते.

कलर प्रिडिक्शनद्वारे फ्रॉड केला जायचा

ऑनलाइन गॅम्बलिंग कलर प्रिडिक्शनद्वारे केली जात होती. कलर प्रिडिक्शन गेमचा एक असे अॅप्लिकेशन आहे, ज्यात एका कलरवर पैसे लावले जातात. नंतर एक कलर किंवा कलर कॉम्बिनेशनची भविष्यवाणी केली जाते. तुमचे प्रिडिक्शन बरोबर आल्यास, तुम्हाला पैसे मिळतात.

बातम्या आणखी आहेत...