आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्य तेल मिशन:खाद्य तेलांत आत्मनिर्भरता आणण्यासाठी 11 हजार कोटींची गुंतवणूक होणार : मोदी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोराेना महामारी असतानाही भारत पहिल्यांदाच कृषी निर्यातीच्या क्षेत्रात जगातील अव्वल १० देशांमध्ये आहे. एक कृषी उत्पन्न निर्यातक देश म्हणून ओळख तयार होत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता वाटप करताना नरेंद्र मोदी बोलत होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात देशातील ९.७५ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात १९५०० कोटी रुपये पाठवण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, आज शेतकरी व सरकारच्या भागीदारीमुळे देशाचा अन्नसाठा भरलेला आहे. मात्र गहू, तांदूळ आणि साखरेतील आत्मनिर्भरता पुरेशी नाही. आपल्याला डाळी, खाद्यतेलाच्या बाबतीतही आत्मनिर्भर व्हावे लागेल. ते म्हणाले, एक काळ होता की देशाला डाळींची आयात करावी लागायची. मात्र आता स्थिती बदलली आहे. गेल्या सहा वर्षांत डाळीच्या उत्पादनात जवळपास ५० टक्के वाढ झाली आहे. जे काम आपण डाळींबाबत केले तेच खाद्यतेलाबाबत करायचे आहे.

काश्मिरी केसर आता नाफेड दुकानांतही होईल उपलब्ध
खाद्यतेल मिशन- ऑइल पाम मिशन होईल :

खाद्यतेलात आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्रीय खाद्य तेल मिशन- ऑइल पाम मिशनची घोषणा पंतप्रधानांनी केली. ते म्हणाले, मोठा कृषी उत्पन्न निर्यातक म्हणून भारताची ओळख होत आहे. यामुळे खाद्यतेलाच्या गरजेसाठी आपल्याला आयातीवर निर्भर राहणे योग्य नाही. यामुळे राष्ट्रीय खाद्यतेल मिशनच्या माध्यमातून सरकार खाद्यतेलाशी संबंधित तंत्रात ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करेल. शेतकऱ्यांना उत्तम बियाणे तसेच इतर सर्व सुविधा मिळाव्यात याकडेही लक्ष देईल.

७०० कोटीच्या मधाची निर्यात
शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. मिशन हनी- बी असेच अभियान आहे. याद्वारे गेल्या वर्षी आम्ही जवळपास ७०० कोटी रुपयांच्या मधाची निर्यात केली. सरकारने हा निर्णय घेतला की, जम्मू-काश्मीरचे केसर देशभरात नाफेडच्या दुकानांवर उपलब्ध होईल. यामुळे जम्मू- काश्मिरात केसरच्या शेतीला प्रोत्साहन मिळेल. येत्या २५ वर्षांत देशातील शेती समृद्ध करण्यात लहान शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असेल.

बातम्या आणखी आहेत...