आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुली:जुलैमध्ये जीएसटी वसुली 1.16 लाख कोटी; कोरोनापूर्वीपेक्षाही 14% जास्त, संक्रमण मंदावताच अर्थव्यवस्था धावू लागली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज मागणी १२% वाढली, प्री कोविड स्तराहून जास्त

कोरोनाचे संक्रमण मंदावल्याने देशात पुन्हा एकदा आर्थिक घडामोडींनी वेग घेतला आहे. मागील महिन्यात १,१६,३९३ कोटी रुपये जीएसटी (वस्तू व सेवा कर) वसुली झाली आहे. ही वसुली मागील वर्षाच्या जुलैच्या तुलनेत ३३.१४% जास्त आणि जून २०२१ च्या तुलनेत २५.३६% जास्त आहे. तर कोरोनापूर्वी (जुलै २०१९) च्या तुलनेत ती १४.०२ टक्के जास्त आहे. जुलै २०१९ मध्ये १,०२,०८२ कोटी रु. जीएसटी वसुली झाली होती.

अर्थ मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या मासिक जीएसटी वसुलीच्या आकडेवारीनुसार जुलै २०२१ मध्ये एकूण जीएसटी वसुली १,१६,३९३ कोटी रुपये राहिली. यात केंद्रीय जीएसटीद्वारे २२,१९७ कोटी रुपये आणि राज्य जीएसटीद्वारे २८,५४१ कोटी रुपये मिळाले आहेत. तर इंटिग्रेटेड जीएसटी ५७,८६४ कोटी आणि सेसद्वारे मिळालेल्या ७,७९० कोटी रुपयांचा समावेश आहे. मागील वर्षी जुलैमध्ये जीएसटी वसुली ८७,४२२ कोटी रुपये आणि या वर्षी जूनमध्ये ९२,८४९ कोटी रुपये होती. मागील महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळणारी वसुली मागील वर्षी याच महिन्यातील तुलनेत ३६% अधिक राहिली.

रुपयांचा समावेश आहे. मागील वर्षी जुलैमध्ये जीएसटी वसुली ८७,४२२ कोटी रुपये आणि या वर्षी जूनमध्ये ९२,८४९ कोटी रुपये होती. मागील महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळणारी वसुली मागील वर्षी याच महिन्यातील तुलनेत ३६% अधिक राहिली.

तेजीमुळे सुधारणेचे संकेत
कोरोनातील निर्बंधात शिथिलतेबोबरच जुलै २०२१ मध्ये जीएसटी वसुली पुन्हा एकदा १ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. जीएसटी वसुलीत पुढील महिन्यांतही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारमण, अर्थमंत्री

वीज मागणी १२% वाढली, प्री कोविड स्तराहून जास्त
देशात वीज वापर जुलैमध्ये १२% वाढला. तो १२५.५१ अब्ज युनिटपर्यंत पोहोचला. तो महामारी पूर्वीच्या स्तरापर्यंत पोहोचला. जुलै २०१९ मध्ये ११६.४८ तर जुलै २०२० मध्ये १२.१४ अब्ज युनिट वापर होता.

बातम्या आणखी आहेत...