आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ विमान अपघात:देशातील 12 धावपट्ट्या धोकादायक; पाटणा, जम्मू विमानतळावरही धोका

शरद पांडेय | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तज्ञ म्हणाले- ई-मास तंत्रज्ञानाने थांबू शकतात असे अपघात, धावपट्टीबाहेर फोम काँक्रीट लावावे

देशात ६ टेबलटॉपसह १२ विमानतळांच्या धावपट्ट्या धोकादायक आहेत. यात जम्मू व पाटणा सर्वात धोकादायक आहेत. पाटण्याची धावपट्टी सुमारे ६ हजार फूट लांब आहे. तिच्या एका बाजूला रेल्वेमार्ग, तर दुसरीकडे महामार्ग अाहे. यामुळे धावपट्टी वाढवता येत नाही. नागरी उड्डयन मंत्रालयाने यासाठी बोइंगच्या (लहान विमान) संचालनास परवानगी दिली आहे. मोठे विमान आणल्यास सुमारे ३०% आसने रिक्त ठेवण्याचा नियम आहे. तर, जम्मू विमानतळ सिव्हिल एन्क्लेव्हमध्ये आहे. म्हणजे यावरील धावपट्टी वायू सेनेची आहे. एकीकडे तवी नदी आहे. दुसरीकडे धावपट्टी वाढवली तर विमानाला टेकऑफ व लँडिंग करण्यासाठी पाकिस्तानच्या सीमेत जावे लागेल. यामुळे नदीकडे वाढवता येऊ शकते, यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. एअर इंडियाचे माजी मुख्य समन्वयक हर्षवर्धन यांनी सांगितले की, जगात सुमारे १५% विमानतळे धोकादायक गटात आहेत.

विमानतळासाठी धावपट्टी ९००० फूट लांब असावी

आयआय एव्हिएशन समितीचे सदस्य व तज्ञ अंकुर भाटिया यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी धावपट्टी ९००० फूट लांब हवी. कोझिकोडची लांबी निश्चित मानकानुसार आहे. ७५०० फूट लांब धावपट्टीवर एअरबस उड्डाण करू शकते. तर, बोइंग विमान ६ ते ७ हजार फूट लांब धावपट्टीवर उड्डाण करतात.

तज्ञ म्हणाले- ई-मास तंत्रज्ञानाने थांबू शकतात असे अपघात, धावपट्टीबाहेर फोम काँक्रीट लावावे

एएआयचे माजी अध्यक्ष आणि तज्ञ व्ही. पी. अग्रवाल यांनी सांगितले की, टेबल टॉप रनवेवरील असे अपघात रोखण्यासाठी ई-पास तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. सध्या ते विदेशात होते. यात धावपट्टीबाहेर सुरक्षित भागात फोम काँक्रीट लावले जाते, म्हणजे विमान धावपट्टीवर घसरल्यास जमिनीत फसून थांबेल. यावर अभ्यास करण्यासाठी वर्ष २०१२-१३ मध्ये एएआयचे पथक अमेरिकेत गेले होते. त्यांनी डीजीसीएला तंत्रज्ञान लागू करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. प्रत्येक विमानतळासाठी ४० ते ५० कोटी रुपये खर्च सांगितला होता. तो लालफितीत बंद आहे.

टेबल टॉप एअरपोर्ट

पॅकयांग विमानतळ(सिक्कीम),

कुलू व सिमला, लंेगपुई (मिझोराम),

करिपूर विमानतळ (कालिकत, केरळ),

मंगळुरू.

धोकादायक एअरपोर्ट

लेह (लडाख),

पोर्ट ब्लेअर,

अगरतळा (त्रिपुरा),

लातूर (महाराष्ट्र),

जम्मू (जम्मू-काश्मीर),

पाटणा (बिहार).

बातम्या आणखी आहेत...