आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयागराजमध्ये रस्त्यावर आली महाकाय मगर:12 फुटी मगरीला पाहून नागरिकांना घाम; रेस्क्यूदरम्यान वन विभागाची दमछाक

प्रयागराज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या कानपूर, प्रयागराज आणि वाराणतीस गंगा आणि यमुनेला पूर आला आहे. प्रयागराजमध्ये गंगा-यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पुराच्या पाण्यातून आलेली एक मगर शनिवारी प्रयागराजच्या सलोरी या निवासी भागात शिरली. सुमारे 12 फुटांची ही महाकाय मगर पाहून नागरिकांची भितीने गाळण उडाली. मगर रस्त्यावर येताच नागरिकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद करून घेतले. लगेचच पोलिस आणि वनविभागाला माहिती देण्यात आली. मगरीला पकडताना वन विभागाची टीमची चांगलीच दमछाक झाली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला पकडून पुन्हा गंगेत सोडण्यात आले.

प्रयागराजमधील गंगेला लागून असलेल्या सलोरी भागात शनिवारी मगरी दिसली. सुमारे 12 फूट लांब मगरीला पाहून लोक घाबरले आणि छतावर चढले.
प्रयागराजमधील गंगेला लागून असलेल्या सलोरी भागात शनिवारी मगरी दिसली. सुमारे 12 फूट लांब मगरीला पाहून लोक घाबरले आणि छतावर चढले.

वाराणसीत गंगेची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा 24 सेंटीमीटरने जास्त आहे. मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाट पुरात बुडाले आहेत. कानपूरमध्येही यमुनेची पाणीपातळी वाढली आहे. घाटमपूर तहसीलमध्ये यमुनेच्या पुरामुळे कानपूर-बांदा राज्य महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
वाराणसीत गंगेची पातळी वाढणार
वाराणसीत गंगेची पाणी पातळी दर तासाला दोन सेंटीमीटरने वाढत आहे. त्यामुळे गंगेची पाणीपातळी आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रयागराजमध्ये गंगा-यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तर कानपूरमध्ये पुरामुळे अनेक गाव पाण्यात बुडालेत. घाटमपूर तहसीलमधील अमीरेतपूर, मोहाटा, गडाथा आणि इतर गावांचे बेट झाल्याची स्थिती दिसत आहे. पुरातून नागरिकांना वाचवण्यासाठी बचावकार्य राबवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...