आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 12 Handmade Silk Carpets Will Be Installed In The New Parliament, One Carpet Cost 50 Lakhs | Marathi News

काश्मिरी वारसा:नव्या संसदेत बसवणार 12 हस्तनिर्मित रेशमी गालिचे, एका कार्पेटची किंमत तब्बल 50 लाख रुपये

श्रीनगर,हारुण रशीदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील खानपूर गावात ५० कारागीर ८ महिन्यांपासून दुहेरी शिफ्टमध्ये १२ रेशमी गालिचे बनवण्याचे काम करत आहेत. हे सिल्क ऑन सिल्क (रेशीमवर रेशीम) कार्पेट म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. ते हाताने बनवले जातात. विशेष बाब म्हणजे ११ बाय ८ चौरस फूट आकाराचे हे कार्पेट नवीन संसद भवनात बसवले जाणार आहेत.

मुख्य विणकर कमर ताहिरी म्हणाले - डिझाइनद्वारे समृद्ध काश्मिरी वारसा दर्शवला आहे. आमच्यापैकी बहुतेक जण संसदेतच काय, दिल्लीतही गेलेले नाहीत. आता हे गालिचे संसदेत आमचे प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे ते विशेष असावेत. ९ गालिचे बनवण्यात आले आहेत. ३ पुढील आठवड्यात तयार होतील. १५ सप्टेंबर रोजी ते दिल्लीला पाठवले जातील. संसदेसाठी हे कार्पेट कोणत्या किमतीला विकत घेतले जात आहेत हे जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु ते ज्या दर्जाचे आहेत, त्यांची किंमत ५० लाखांपर्यंत आहे.

नवीन संसद सेंट्रल व्हिस्टा अ‌ॅव्हेन्यू येथे बांधली जात आहे. हा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. त्याचा बाह्यभाग पुढील आठवड्यात लोकांसाठी खुला केला जाऊ शकतो. त्याचे उद्घाटन ८ सप्टेंबर रोजी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...